शिंदे घराण्याचे संस्थापक राज्यकर्ते राणोजी शिंदे

👉1737 ते 1880 मध्ये उज्जैनवर शिंदे घराण्याचे एकछत्र  अमल होता. 
👉त्या काळात उज्जैनचा खुप विकास झाला.उज्जैन ही शिंदे राज्यकर्त्यांची राजधानी होती.
👉महाराष्ट्रात शिंदे घराने म्हणून आहे.
शिन्दे घराणे अथवा हिन्दीमध्ये सिन्धीया हे मध्य भारतातील ग्वाल्हेर येथील राज्यकर्ते होत. 

👉मराठेशाहीतील एक पराक्रमी घराणे व भूतपूर्व ग्वाल्हेर संस्थानचे संस्थापक राजघराणे. कण्हेरखेड (जि.सातारा) येथील पाटीलकी या घराण्याकडे होती.

   



👉शिंदे हे औरंगजेबाच्या पदरचे मनसबदार असल्यामुळे बादशहाने छत्रपती शाहूंशी त्यांची सोयरीक करून दिली होती. छ. शाहू औरंगजेबाच्या कैदेत असतानाच ही शिंद्यांची मुलगी मरण पावली. दत्ताजीचा मुलगा जनकोजी हा बाळाजी विश्वनाथ पेशव्यांच्या पदरी होता मात्र त्याविषयी फारशी माहिती ज्ञात नाही. ह्याचा मुलगा राणोजी होय. राणोजीपासूनच शिंदे घराणे पुढे आले.

👉राज्यकर्ते होण्याअगोदर मराठा साम्राज्याचे मुख्य सरदार घराणे होते. 

👉मराठा साम्राज्याच्या विस्तारामध्ये यांनी मोठी कामगीरी बजावली होती. शिन्दे हे मुळचे सातारा जिल्ह्यातील नीरा नदीच्या काठावरील कण्हेरखेडे या गावचे पाटील होते. राणोजी शिन्दे हे येथील होते. 

 
👉बाळाजी विश्वनाथच्या पदरी पायदळात राणोजी होत (१७१६). पहिल्या बाजीराव पेशव्याने त्यास बारगीर केले (१७२२). 

निजामाबरोबर झालेल्या १७२४ च्या साखरखेड येथील लढाईत राणोजीने भाग घेतला. ते १७२५ मध्ये शिलेदार झाले . कर्नाटकच्या मोहिमेतही ते होत .

👉 चिमाजी आप्पाने १७२८-२९ दरम्यान शिंदे, होळकर व पवार यांच्या मदतीने माळवा जिंकून या तीन सरदारांत त्याची वाटणी केली. राणोजी अत्यंत शूर व निष्ठावंत असल्यामुळे त्यास दीड कोटी वसुलापैकी ६५·५ लाखांचा मुलूख वाटणीस आला. शिंद्यांनी माळव्यात जम बसविला. राणोजीने निजामाविरुद्धच्या भोपाळ वेढयात (१७३७) तसेच वसईच्या प्रसिद्ध लढाईत (१७३७–३९) भाग घेतला होता.

👉 वसईच्या किल्ल्याला सुरुंग लावण्याची बहादुरी त्याने केली. राणोजी सुजालपूरजवळ १७४५ मध्ये निवर्तला. त्यास जयाप्पा, दत्ताजी व जोतिबा हे तीन औरस पुत्र व तुकोजी आणि महादजी हे दोन अनौरस पुत्र होते. त्यांपैकी तुकोजी हा राणोजीपूर्वी मरण पावला आणि ओर्छाच्या राजाने जोतिबास दगा करून १७४३ मध्ये मारले. त्यामुळे राणोजीनंतर जयाप्पाकडे घराण्याची सूत्रे आली.

👉  शिंदे-होळकरांनी मिळून दिल्लीचा वजीर सफदरजंग याच्या मदतीसाठी गंगा-यमुना यांच्या दुआबात जाऊन रोहिल्यांची खोड मोडली. तेव्हा सफदरजंगच्या सल्ल्यावरून बादशहाने मोगल सत्तेचे रक्षण करण्याचे काम मराठ्यांवर सोपविले आणि त्या बदल्यात काही प्रदेश व काही प्रदेशांचे वसुली अधिकार मराठ्यांना बहाल केले. याच कामगिरीवर राजस्थानात असताना, जयाप्पा शिंदे राजपुतांविरुद्ध नागोर येथे लढत असताना विश्वासघाताने त्याची हत्त्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा धाकटा भाऊ दत्ताजी व मुलगा जनकोजी हे शिंदे घराण्याचा कारभार पाहू लागले.


👉महाराज राणोजी शिंदे यांनी महांकालेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला, शिंदे घराण्याचे संस्थापक राज्यकर्ते राणोजी शिंदे यांचे दिवान रामचंद्र शेणवी यांनी उज्जैन मध्ये असलेले महाकाल मंदिर बांधले. 

👉१८१० मध्ये शिंदे घराण्याची राजधानी ग्वाल्हेर मध्ये आली.

👉सुभेदार राणोजी शिंदे यांचे सरसेनापति सरदार यशोजी रेगे आरवंदेकर होते. 


👉दत्ताजी शूर होता. अब्दालीने दिल्ली लुटल्यानंतर (१७५७) पेशव्यांनी त्यास उत्तर हिंदुस्थानचा कारभार सुधारण्याचा आदेश दिला. त्याच्यावर नजीबखानाचे पारिपत्य, लाहोरचा बंदोबस्त, तीर्थक्षेत्रे मुक्त करणे आणि बंगालपर्यंत स्वारी करून कर्ज फेडण्यासाठी पैसा उभा करणे इ. जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या. त्यांपैकी नजीबखानास त्याने कैद केले पण मल्हारराव होळकरांच्या मदतीने नजीबखान सुटला. दत्ताजीने नंतर लाहोरचा बंदोबस्त केला व साबाजी शिंद्याकडे तेथील व्यवस्था सोपविली. पेशव्यांची आज्ञा असूनही होळकरांनी दत्ताजीला म्हणावे तसे सहकार्य दिले नाही. अखेर दत्ताजी नजीबखान रोहिल्याच्या कचाट्यात सापडला. त्यातून तो सुटला पण १० जानेवारी १७६० रोजी दिल्लीजवळ बुराडीच्या घाटात अब्दालीशी लढताना त्याला वीरमरण आले. त्याला अपत्य नव्हते. जयाप्पाचा मुलगा जनकोजी हा पानिपतच्या लढाईत मरण पावला (१७६१). यावेळी त्याची पत्नी काशीबाई पानिपतच्या स्वारीत हजर होती.

👉जयाप्पा, दत्ताजी, जनकोजी यांनी मर्दुमकी गाजविली पण महादजी (१७२७–९४) याने शिंदे घराण्याचे नाव इतिहासात अजरामर केले


👉मराठ्यांच्या उत्तरकालीन इतिहासात शिंदे घराण्याचे योगदान मोठे आहे. या घराण्यातील कर्तृत्ववान पुरुषांमुळे, विशेषतः राणोजी-महादजी यांच्यामुळे पानिपतचे अपयश धुऊन निघाले आणि उत्तर हिंदुस्थानात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित झाले. पेशव्यांनी या घराण्यास दौलतीचे आधारस्तंभ म्हणून गौरविले होते.

साभार & संकलन  

संदर्भ :-

ग्वाल्हेर संस्थान मराठा अंमल शिंदे, महादजी होळकर घराणे.

खरे, ग. ह. कुलकर्णी, गो. त्र्यं.



Comments

  1. Mahiti chan ahe..Holkarani burhadi ghatavar shindenchya madatisathi tukoji holkarana pathavale hote pan te pohcheparyant dattaji marale gele hote v tyaveli holkar he hi rajputanyat rajputanchya virudha mohimet vyast hote........pan malharraoncha mulaga jya yudhat marala gela tya kumherichya ladhait shindyani holkarancha paksha sodun sarvat mothya dukhachya veli jatanchi baju ka ghetali he ajparayant nahi samajal kay karan asel jyane malharraoncha mulaga marala ani tyach veli shindyani tya jatabarobr pagadi bhavache Nate jodale.....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४