Posts

Showing posts from February, 2021

लोकराजा श्रीमंत सयाजीराव राजेगायकवाड

Image
👉महाराजा सयाजीराव गायकवाड. 👉भारताच्या मातीमध्ये एक असा राजा जन्माला आला होता, ज्या राजाला राजेपद अनपेक्षितपणे मिळाले होते. परंतु अनपेक्षितपणे मिळालेले राजे पद कर्तुत्वाने अजरामर करणारा हा एकमेव राजा होता , त्यांचे नाव होते महाराजा सयाजीराव राजेगायकवाड. 1)सल्लागार नेमून कल्याणकारी योजना अंमलात आणल्या (१८८३). 2)न्यायव्ववस्थेत सुधारणा केल्या. 3)ग्रामपंचायतींचे पुनरुज्जीवन केले (१९०४); 4 )सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना सुरू करून (१८९३) अल्पावधीतच ती सर्व राज्यभर लागू केली (१९०६). अशा क्रांतिकारी निर्णय घेणारी राजे सयाजीराव गायकवाड यांची दूरदृष्टी मुळे बडोदा संस्थानाची कीर्ती भारतभर पसरली.  👉थोर समाज सुधारक म्हणून महाराजा सयाजीराव गायकवाड यांच नाव घ्यावाच लागत. 1पडदापद्धतिबंदी,  2बालविवाहबंदी,  3मिश्रविवाह, 4स्त्रियांचा वारसा, 5कन्याविक्रयबंदी, 6अस्पृश्यतानिवारण, 7विधवाविवाह इ. सुधारणा प्रत्यक्ष अंमलात आणल्या व तशी प्रशासनामध्ये तरतूद करून ठेवली व राबवली.  👉घटस्फोटासंबंधीचा कायदा सर्व भारतात पहिल्यांदाच त्यांनी जारी केला. 👉 (१८८२) दरम्यान हरिजनांसाठी 18 शाळा सुरु केल्या