लोकराजा श्रीमंत सयाजीराव राजेगायकवाड

👉महाराजा सयाजीराव गायकवाड.



👉भारताच्या मातीमध्ये एक असा राजा जन्माला आला होता, ज्या राजाला राजेपद अनपेक्षितपणे मिळाले होते. परंतु अनपेक्षितपणे मिळालेले राजे पद कर्तुत्वाने अजरामर करणारा हा एकमेव राजा होता , त्यांचे नाव होते महाराजा सयाजीराव राजेगायकवाड.

1)सल्लागार नेमून कल्याणकारी योजना अंमलात आणल्या (१८८३).
2)न्यायव्ववस्थेत सुधारणा केल्या.
3)ग्रामपंचायतींचे पुनरुज्जीवन केले (१९०४);
4 )सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना सुरू करून (१८९३) अल्पावधीतच ती सर्व राज्यभर लागू केली (१९०६). अशा क्रांतिकारी निर्णय घेणारी राजे सयाजीराव गायकवाड यांची दूरदृष्टी मुळे बडोदा संस्थानाची कीर्ती भारतभर पसरली.



 👉थोर समाज सुधारक म्हणून महाराजा सयाजीराव गायकवाड यांच नाव घ्यावाच लागत.

1पडदापद्धतिबंदी,
 2बालविवाहबंदी,
 3मिश्रविवाह,
4स्त्रियांचा वारसा,
5कन्याविक्रयबंदी,
6अस्पृश्यतानिवारण,
7विधवाविवाह इ. सुधारणा प्रत्यक्ष अंमलात आणल्या व तशी प्रशासनामध्ये तरतूद करून ठेवली व राबवली.

 👉घटस्फोटासंबंधीचा कायदा सर्व भारतात पहिल्यांदाच त्यांनी जारी केला.

👉 (१८८२) दरम्यान हरिजनांसाठी 18 शाळा सुरु केल्या.

👉डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली आणि त्यांची संस्थानात उच्च पदावर नेमणूकही केली होती.

👉महाराजा सयाजीराव गायकवाड नाशिक जिल्ह्यातील  रावळगाव येथे महाराजांनी त्या काळात साखर कारखाना सुरु करुणा औद्योगिक विकासाला चालना देण्याचं काम केलं होतं.

👉जमशेदजी टाटा यांनी ताज हॉटेल सुरु केले परंतु ते उभे करायची कल्पना महाराजा सयाजीराव गायकवाड यांची होती.

👉शिकागो च्या पहिल्या सर्वधर्म परिषदेत त्यांचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली होती.

परंतु ह्याच शिकागो तल्या दुसर्या सर्वधर्म परिषदेचे अध्यक्ष स्थान महाराजा सयाजीराव गायकवाड यांना मिळाले होते त्यांच्या निधन नंतर अमेरिकन वर्तमान पत्रांनी त्यांच्यावर लेख लिहून ठेवले आहेत.

👉सुधारणांच्या प्रत्यक्ष पुरस्कारामुळे त्यांना ‘राष्ट्रीय सामाजिक परिषदे’च्या अध्यक्षपदाचा मान मिळाला होता. (१९०४).

👉लंडनला भरलेल्या पहिल्या दोन गोलमेज परिषदांनाही ते हजर होते. 
👉पंडित मदनमोहन मालवीय यांनी अखंड हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा अशा शब्दांमध्येमहाराजांचे वर्णन केलं होतं.

ज्ञानवृद्धी, समाजसुधारणा व शिस्तबद्ध प्रशासन या सर्वच बाबतींत ते यशस्वी ठरले.

👉सुधारणांच्या प्रत्यक्ष पुरस्कारामुळे त्यांना ‘राष्ट्रीय सामाजिक परिषदे’च्या अध्यक्षपदाचा मान मिळाला (१९०४).




बडोदे ही कलापूर्ण प्रेक्षणीय नगरी होती याचे कारण महाराजांनी बांधलेल्या सुंदर वास्तू खालील प्रमाणे.
1लक्ष्मीविलास राजवाडा,
2वस्तुसंग्रहालय,
3कलावीथी,
4श्री सयाजी रुग्णालय,
5 नजरबाग राजवाडा,
6 महाविद्यालयाची इमारत वगैरे वास्तूंनी बडोद्याची शोभा वाढविली आहे.


 लेखन& माहिती संकलन
 नितीन घाडगे 

संदर्भ पुस्तके : १. दा. ना. आपटे श्री. महाराज सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांचे चरित्र, ३ खंड, मुंबई, १९३६.

२. चिं. वि. जोशी श्री सरकार सयाजीराव महाराज गायकवाड यांचे चरित्र व सूक्तिसंग्रह, बडोदे, १९३६.

३. वि. पां. दांडेकर सयाजीराव गायकवाड, पुणे, १९३३

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...