Posts

Showing posts from February, 2026

१७ फेब्रुवारी १६६३छत्रपती शिवरायांनी केळशी जिंकले.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १७ फेब्रुवारी १६६३ छत्रपती शिवरायांनी केळशी जिंकले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १७ फेब्रुवारी १६७९ सुरतचे मुंबई इंग्रजकरांना पत्र युवराज शंभुराजे दिलेरखानाच्या छावणीत... सुरतेचे इंग्रज अधिकारी मुंबईच्या इंग्रज अधिकाऱ्यांना कळवितात, "दख्खनमध्ये बादशाही सेनापतींनी छत्रपती शिवाजी महाराजांवर मोठा विजय मिळविला आहे. सर्वात छत्रपती शिवाजी महाराजांची मनःशांती अधिक ढवळणारी गोष्ट घडली ती म्हणजे त्यांचा ज्येष्ठ पुत्र युवराज शंभुराजे बादशाही सरदार दिलेरखान यांच्याकडे गेले." 'याची नोंद मल्हार रामराव चिटणीस, बुसातिनुस्सलातीन, विजापुरची अदिलशाही, इंग्रज, भीमसेन सक्सेना, जेधे शकावली, या सर्वांनी घेतली असली तरी महाराजांचा अभ्यास करताना असे निदर्शनास येते की, "युवराज शंभुराजे दिलेरखानाच्या गटात जाणे म्हणजे महाराजांचेच राजकारण होय". युवराज संभाजीराजे दिलेरखानापासी गेले. दिलेरखानाने त्यांसी ७,०००, हप्त (सप्त) सात हजारी मनसब दिली व सन्मान केला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १७ फेब्रुवारी १६८९ छत्रपती शंभूराजे व कवी कलश यांचे हालहाल करण्यास सुर...