Posts

Showing posts from March, 2026

२७ मार्च १७५२दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा !कनोज येथे होळकर-शिंदेंशी दिल्लीच्या तख्ताच्या रक्षणाचा करार केला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २७ मार्च १६६३ शिवतेज दिन - शाईस्तेखानाचा बिमोड... दस्तुरखुदद आलमगीराचा 'मामा' व मुघल सेनेतील  मातब्बर सरदार असलेल्या शाईस्तेखानाची छत्रपती शिवरायांनी "गनिमी कावा" या रणनीतीने पुण्यातील लालमहाल येथे तळ ठोकुन बसलेल्या अंदाजे दिड लाखाच्या सैन्यात घुसुन रातोरात बोटे छाटली. या असल्या गनिमी छाप्याचे दुसरे उदाहरण जगात नाही. खान व त्याच्या कुटुंबाने महाराजांची जबर धास्ती घेतली. पुणे व परीसरातील लुट व गाईंच्या कत्तली सर्व बाहेर पडल्या. त्याची बेगम रात्रीचीच "शिवाजी आला शिवाजी आला" म्हणून ओरडत असे. पुढे औरंगजेबाने बोटे तुटलेल्या मामाला इराणला पाठवून दिले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २७ मार्च १६६६ औरंगजेबाचे राज्यरोहन १६६६ हे वर्ष औरंगजेबाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे होते. यापूर्वीच बादशहा औरंगजेब स्वतःला मुघल सम्राट म्हणून सारे बादशाही सोपस्कार केले होते पण बादशाह शहाजहान जिवंत असल्यामुळे लोकांच्या दृष्टीने औरंगजेबाची ही बंडखोरीच होती. आता बादशाह शहाजहानच्या मृत्यूमुळे सिंहासनावर बसण्याची व शाही सोपस्कार करवून घेण्या...

१८ मार्च १६७९छत्रपती शिवरायांनी विजापुरांकडून बहाद्दुर बांडा किल्ला जिंकला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १८ मार्च १५९४ स्वराज्य संकल्पक महाराज साहेब शहाजीराजे भोसले यांचा वेरुळ (महाराष्ट्र) येथे जन्म (मृत्यू २३ जानेवारी १६६४) छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील व निजामशाही – आदिलशाहीतील एक मातब्बर सरदार. ऐतिहासिक कागदपत्रांत त्यांचा शाहजी किंवा स्याहजी असाही नामोल्लेख आढळतो. त्यांच्या जन्मतारखेविषयी एकमत नाही. बहुतेक तज्ज्ञ बिकानेर आणि जोधपूर येथील उपलब्ध जन्मपत्रिकांतील तारीख (१६ मार्च १५९४) ग्राह्य धरतात. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १८ मार्च १६७९ छत्रपती शिवरायांनी विजापुरांकडून बहाद्दुर बांडा किल्ला जिंकला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १८ मार्च १६८० आदिलशाहित सर्जाखानाला विजापुरी सैन्याचा मुख्य सेनापती केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १८ मार्च १६८८ हरजीराजे महाडिक त्रिणामल्लीहून कंचीवर गेले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १८ मार्च १७६० चैत्री पाडाव्याच्या शुभ मुहूर्तावर राजमाता जिजाऊंचे माहेरघर सिंदखेदराजा येथून सदाशीव भाऊ यांनी आपल्या सहकार्यांसह उत्तरेकडे प्रयाण केले. त्यावेळी ५० हजारांची फौज सोबत होती. शिंदे-होळकर मार्गात मिळणार होते. अहमदशाह अब्दाली याच्या आक्रमणापा...

१५ मार्च १६७०छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी मोगलांकडून जिंकून घेतली

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ मार्च १६६१ छत्रपती शिवाजी राजांनी राजापुरची इंग्रजांची वखार खणून काढून पन्हाळ्याचा सूड उगवला. राजापूरकर इंग्रजांनी सिद्दी जौहरला सहाय्य करून महाराज वेढ्यात आडकलेले असताना, निशाण लाऊन पन्हाळ्यावर तोफा डागल्या. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ मार्च १६६९ पैशाअभावी मुलीच्या लग्नाची टाळाटाळ करणाऱ्या विठोजी हैबतराव शिळीमकारास जिजाऊ साहेबांनी २५ होन रोख व ५०० माणसांचे सामान देवून त्याच्या मुलीचे लग्न गोमाजी नाईक यांच्या मुलासोबत झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ मार्च १६७० छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी मोगलांकडून जिंकून घेतली. कल्याण व भिवंडीकरांनी आजचा दिवस सणासारखा साजरा करावा. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ मार्च १६७० माहुली गडावर मनोहरदासने छत्रपती शिवरायांचा छापा हेरून मराठ्यांवर हल्ला चढवला व ह्या लढाईत १ हजार मराठे कापले गेले. हि गोष्ट छत्रपती शिवरायांच्या जिव्हारी सलू लागली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १५ मार्च १६८० छत्रपती राजाराम महाराजांचे जानकीबाईंशी लग्न वीरगती लाभलेल्या सरनौबत प्रतापराव गुजरांची लेक जानकीबाई. छत्रपती शिवाजी महाराजांच्या च...

४ मार्च १६७७"दक्षिण दिग्विजय मोहीम"छत्रपती शिवराय "हैदराबाद" शहरातील "गोवळकोंडा" किल्ल्याजवळ दाखल.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ४ मार्च १६७७ "दक्षिण दिग्विजय मोहीम" छत्रपती शिवराय "हैदराबाद" शहरातील "गोवळकोंडा" किल्ल्याजवळ दाखल. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ४ मार्च १६८० राजपुतांचे बंड मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने आपली तीन मुलं शहाआलम, आझमशाह आणि अकबर ह्यांना पाठविले. ४ मार्च १६८० रोजी अकबराला चितोडची बाजू सांभाळण्यासाठी पाठविण्यात आले. प्रत्येक ठिकाणी अकबराचा सारखा पराभवाचं होत होता. अकबराने राजपुतांविरोधात लढण्यात पाच महिने असेच फुकट घालविले. राजपुतांपुढे आता काही आपला निभाव लागत नाही असे पाहून अकबराने आपल्या बापास औरंगजेबास हे युद्ध बंद करण्याची विनंती केली. ह्या विनंतीने औरंगजेब भयंकर चिडला. आणि त्याने रागाने अकबराची चांगलीच कानउघडणी केले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ४ मार्च १७०६ छत्रपती शिवरायांचा संदेश, त्यांनी दिलेली स्पूर्ति, त्यानी तयार केलेली ही माणसं. एक मोठ नेता नाही, पण सामुदायीक नेतृत्व त्यांनी उभं केलं. त्याचाच परिणाम म्हणून मराठ्यांची घोडदौड जी अशी चालली की, ४ मार्च १७०६, रोजी धनाजी जाधवांने गुजराथचे द्वार मराठ्यांना मोकळं करू...