८ जानेवारी १६५८कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज स्वत: माहुलीच्या किल्ल्यावर चालून निघाले माहुली - भंडारगड - पळसगड, छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूर बादशाहाकडून आज जिंकला.
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
८ जानेवारी १०२६
गझनिच्या मेहमुदाचे सोमनाथ मंदिरावर आक्रमण
महमूद गझनिच्या हिंदुस्तानवरील १७ हल्ल्यांपैकी १६ वा आणि सर्वात भयानक असा हल्ला म्हणजे सोमनाथ मंदिरवरील हल्ला होय. सोमनाथ मंदिर त्यावेळी त्याच्या संपत्तीसाठी प्रसिद्ध होते. सोमनाथाचे शिवलिंग अनेक पाचू, हिरे, माणके यानी सजवले होते. त्यामुळे ते शिवलिंग अक्षरशः लखलखत होते. डिसें.१०२५ च्या दरम्यान महमूद गझनी सोमनाथ मंदिराजवळ पोचला. ३ दिवसानी हिंदूंचा प्रतिकार मोडून काढण्यात मुस्लिम यशस्वी ठरले आणि त्यानी मंदिरात प्रवेश केला आणि काय???? मंदिरात होते ते फ़क्ति सोमनाथाच्या नावाने घंटानाद करणारे, कोणताही प्रतिकार करू न शकणारे असे हजारो निःशस्त्र हिन्दू....!!!
मग काय?? मेहमुदाने त्या सर्वांची थंड डोक्याने कत्तल केली. यावेळी सुमारे ५०००० हिंदूंची कत्तल करण्यात आली होती. तसेच त्याने शिवलिंग उपटून काढले. वैभव संपन्न असे सोमनाथ मंदिर पूर्णपणे लुटले गेले. तसेच त्यावेळी केलेल्या लुटित जवळपास ६.५ टन सोन्याचा समावेश होता एवढे ते मंदिर वैभव संपन्न होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
८ जानेवारी १६५८
कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज स्वत: माहुलीच्या किल्ल्यावर चालून निघाले. माहुलीचा किला असनगावच्या जवळ आहे. याच माहुलीगडावर शहाजी राजांनी निजामशाही टिकवण्यासाठी अखेरची झुंज मोगलांशी एकवीस वर्षापूर्वी दिली होती. त्यांत ते हरले होते. तो माहुली - भंडारगड - पळसगड, छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूर बादशाहाकडून आज जिंकला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
८ जानेवारी १६६४
सुरतेवरील स्वारी - लूटीचा तिसरा दिवस
इनायतखानाने दग्याचा प्रयोग केल्यामूळे मराठे सरसहा चवताळून उठले. हजारो मशाली पेटल्या व सुरतेच्या रस्त्यावरून हे मशालजी आगी लावीत धावत सुटले. मराठे ढोल बडवीत मशाली घेऊन धावत होते. शहारांत आता आगीचे राज्य होते. जिथे आग नव्हती, त्या घरात मराठ्यांचे राज्य होते. मराठे घराबाहेर पडतांच घरात आग घुसत होती.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
८ जानेवारी १६८९
हरिहर किल्ला मुघलांना जिंकला
नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरीच्या पश्चिमेस सुमारे २० कि.मी. अंतरावर वसलेला हरिहरगड ऊर्फ हर्षगड आहे. हा किल्ला प्राचीन काळात बांधला गेलेला आहे. अहमदनगरच्या निजामशाहाच्या ताब्यात हा गड होता. १६३६ साली शहाजीराजांनी शेजारचा त्र्यंबकगड घेताना हाही किल्ला जिंकून घेतला. मात्र नंतर याचा ताबा मोगलांकडे गेला. पुढे १६७० मध्ये मोरोपंत पिंगळे यांनी हा गड जिंकून स्वराज्यात मोलाची भर घातली. ८ जानेवारी १६८९ रोजी मोगल सरदार मातब्बरखान याने हा किल्ला जिंकला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
८ जानेवारी १६९५
गाजीउद्दीन बहादूर याने चौंद ( जावंद, चावंड)चा किल्ला जिंकून घेतला होता. त्याच्या सोन्याच्या किल्ल्या औरंगजेबाच्या नजरेखालून गेल्या.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
८ जानेवारी १६९७
छत्रपती राजाराम महाराजांनी इंदोरी हा गाव सरदार खंडाराव दाभाडेंना इनाम दिला. पुढे खंडाराव दाभाडे यांना छत्रपती शाहू महाराज यांनी सरसेनापतीपद दिलं. इंदोरीचं वतन त्यांना राजाराम महाराजांकडून आधीच देण्यात आलं
होतं. पुन्हा शाहू महाराजांकडूनही इंदोरी गाव दाभाडे
घराण्यास वतनात मिळालं. त्यानंतर इंदोरी गावात नऊ
बुरूजांचा भुईकोट प्रकारातला गड खंडेराव दाभाडे यांनी नदीकाठी बांधून घेतला. इंदोरी किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार पूर्व दिशेला असून, पश्चिम तटबंदी इंद्रायणी नदीला समांतर रेषेत बांधलेली आहे. त्यामुळे हा गड चौकोनी किंवा एकसलग काटकोनात दिसणाऱ्या शनिवारवाडा किंवा अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यासारखा न दिसता थोड्या प्रमाणात त्रिकोणी आकारात दिसत
८ जानेवारी १६५८
कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज स्वत: माहुलीच्या किल्ल्यावर चालून निघाले माहुली - भंडारगड - पळसगड, छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूर बादशाहाकडून आज जिंकला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.
"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩
Comments
Post a Comment