Posts
मलवडी येथील शिवकालीन कमान
- Get link
- X
- Other Apps
मलवडी तालुका मान जिल्हा सातारा अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत खंडेराया यांचं बाराा मल्हार पैकी एक स्थान म्हणजे मलवडी चा खंडोबा होय. मलवडी हे 13 ते 14 व्या शतकामध्ये मनसबदार कामराज राजे घाटगे यांनी वसवलं असावे. मलवडे हे संपूर्ण घाटगे कुळाचे मुळगाव व मूळ पुरुष कामराज घाटगे हे आहेत. मलवडी म्हणजे राजेघाटगे प्रचीन संस्थान होय. येथील खंडोबाच्या मंदिरासमोर दिसणारे वरील चित्रात दाखवलेली इमारत. शिव कालामध्ये बांधली असून सुंदर स्थापत्यशैलीचा नमुना आहे. ही इमारत म्हणजे पूर्व देशाची कमान होय. घाटगे घराण्याचे यांचे कुलदैवत खंडोबा आहे. कमानीच्या वरती मधोमध भगवंत मारुती पाषणामध्ये मूर्ती असून खूप सुरेख आहे. मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजू वाघ प्राण्याचे शिल्प आहे. मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला उंच मनोरे आहेत. घोड्यावर बसून मनुष्य आत मध्ये जाऊ शकतो एवढे मोठी कमान असून लाकडी दरवाजा खूप मजबूत आहे. दरवाजाच्या डाव्या आणि उजव्या बाजूस स्तंभामध्ये दीवळ्या आहेत. या कमान निर्मिती मागे अनेक दंतकथा सांगितल्या जातात. ©® लेखक:-नितीन घाडगे
दक्षिण भारतात ज्या प्रमाणे वीरांच्या आठवणीत विरगळीची निर्मिती झाली. त्याचप्रमाणे अश्या सती गेलेल्या स्त्रियांच्या आठवणीत सतीशीळा घडवल्या गेल्या.आपण सतीशिळा अशी असते? त्याच्या मागील करणे? अधिक माहिती माडण्याचा प्रयत्न करणार आहोत.
- Get link
- X
- Other Apps
👉जुन्या काळी पत्नीने पती निधनानंतर सती जाण्याची म्हणजेच जिवंतपणी अग्निदाह करवून घेण्याची प्रथा होती.अशी पतिव्रता स्त्री देवपदाला पोहोचते, अशी त्या काळी जनमानसात समजूत असे. 👉 दक्षिण भारतात ज्या प्रमाणे वीरांच्या आठवणीत विरगळीची निर्मिती झाली. त्याचप्रमाणे अश्या सती गेलेल्या स्त्रियांच्या आठवणीत सतीशीळा घडवल्या गेल्या.आणि त्या आज आपणास प्रत्येक गावामध्ये पाहायला मिळतात. 👉सतिशीळा किंवा सतीचा दगड ओळखण्याची महत्वाची खूण कशी ओळखावी. विरगळी प्रमाणेच उभ्या दगडात कोरलेल्या सती शिळा सर्वत्र बघायला मिळतात, मुख्य शीळेवर आकाशाकडे पाचही बोटे केलेला काटकोनात दुमडलेला हाताचा कोपरा व चुडा भरलेला हाताचा पंजा ही सतिशीळा किंवा सतीचा दगड ओळखण्याची महत्वाची खूण आहे. 👉मुरबाड मधील किल्ले गोरखगडाच्या पायथ्याला असलेल्या डेरमाता मंदिरासमोरच अश्या दोन सतिशिळा बघायला मिळतात. प्रत्येक गावामध्ये अशा प्रकारच्या सती शाळा असाव्यात. असा निष्कर्ष आहे. 👉 मंदिरात प्रवेश करताना डाव्या बाजुला असलेल्या या सतीशिळेवर सर्वात खालच्या कप्यात चिता पेटलेली दाखवली आहे, चिते वरती विराचं शव असून त्याच्या शेजारी वीराच्या पाच
श्री कार्तिक स्वामी ही मूर्ती श्री कांटेश्वर देऊळ, नान्जनगूड, कर्नाटकातील आहे.
- Get link
- X
- Other Apps
श्रीक्षेत्र रामलिंग बेट, बहे बोरगाव....
- Get link
- X
- Other Apps
श्रीक्षेत्र रामलिंग बेट, बहे बोरगाव.... प्रभु रामचंद्रांनी अयोध्येत परत जात असताना या शिवलिंगाची पुजा केली व पाठीमागून वाहत येणाऱ्या कृष्णा नदीला आपल्या विशालकाय देहाने श्रीहनुमंताने दोन्ही बाजूने वाहण्यास भाग पाडले,आजही या शिवलिंगाच्या मंदिरामागे श्रीसमर्थ स्थापित 11 मारुतीपैकी एक मारुती मंदिर आहे.अश्या ऐतिहासिक आख्यायिका आपल्या अंगाखांद्यावर मिरवत सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असणारे हे रामलिंग बेट.विस्तीर्ण असणारे हे बेट आणि बाजूनी कृष्णा नदीचा मनाला एकाग्र करणारा आवाज.मनःशांतीसाठी आवर्जून भेट द्यावे असे हे ठिकाण....