मलवडी येथील शिवकालीन कमान

            मलवडी तालुका मान जिल्हा सातारा अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत खंडेराया यांचं बाराा मल्हार पैकी एक स्थान म्हणजे मलवडी चा खंडोबा होय. 
           मलवडी हे 13 ते 14 व्या शतकामध्ये मनसबदार कामराज राजे घाटगे यांनी वसवलं असावे. मलवडे हे संपूर्ण घाटगे कुळाचे मुळगाव व मूळ पुरुष कामराज घाटगे हे आहेत. मलवडी म्हणजे राजेघाटगे प्रचीन  संस्थान होय.
           येथील खंडोबाच्या मंदिरासमोर दिसणारे वरील चित्रात दाखवलेली इमारत. शिव कालामध्ये बांधली असून सुंदर स्थापत्यशैलीचा नमुना आहे. ही इमारत म्हणजे पूर्व देशाची कमान होय. घाटगे घराण्याचे यांचे कुलदैवत खंडोबा आहे.
           कमानीच्या वरती मधोमध भगवंत मारुती पाषणामध्ये मूर्ती असून खूप सुरेख आहे. मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजू वाघ प्राण्याचे शिल्प आहे. मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला उंच मनोरे आहेत. घोड्यावर बसून मनुष्य आत मध्ये जाऊ शकतो एवढे मोठी कमान असून लाकडी दरवाजा खूप मजबूत आहे. दरवाजाच्या डाव्या आणि उजव्या बाजूस स्तंभामध्ये दीवळ्या आहेत. या कमान निर्मिती मागे अनेक दंतकथा सांगितल्या जातात.
©® लेखक:-नितीन घाडगे 
    

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४