Posts

धारासुर येथील गुप्तेश्वर मंदिरावर या सर्वांपेक्षा अगदी वेगळी अशी ही माता शिल्पा पाहताच त्यातील मातृ भाव आपणास सहज लक्षात येतो. बालक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.

Image
थिक भाषेमध्ये या शिल्पास मातृ शिल्प या नावाने ओळखले जाते. मंदिराच्या बाह्य अंगावर आपल्या तान्हुल्या बाळाला खेळवत असलेल्या या माता वेगवेगळ्या रूपांमध्ये आम्हाला आढळून येतात. परंतु धारासुर येथील गुप्तेश्वर मंदिरावर या सर्वांपेक्षा अगदी वेगळी अशी ही माता आपल्या बाळाच्या नाजूक ओठांची गोड चुंबन घेत असलेली दिसून येते. बालकाचे आणि आईचे नाते यावर अधिक भाष्य करण्याची आवश्यकताच नसते. शिल्पा पाहताच त्यातील मातृ भाव आपणास सहज लक्षात येतो. बालक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 🌹🌹🌹 

ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज

Image
मूळ नाव गणपती रावजी घुगरदरे (कुलकर्णी) जन्म १९ फेब्रुवारी १८४५ (माघ शुद्ध द्वादशी, शके १७६६) गोंदवले (सातारा, महाराष्ट्र) निर्वाण २२ डिसेंबर १९१३ (मार्गशीर्ष कृष्ण दशमी, शके १८३५) गोंदवले (सातारा, महाराष्ट्र) समाधिमंदिर गोंदवले (सातारा, महाराष्ट्र) उपास्यदैवत श्रीराम संप्रदाय समर्थ संप्रदाय गुरू श्रीतुकामाई (येहळेगाव) शिष्य श्रीब्रह्मानंद, आनंदसागर भाषा मराठी साहित्यरचना प्रवचने, अभंग प्रसिद्ध वचन जेथे नाम तेथे माझे प्राण। ही सांभाळावी खूण॥ संबंधित तीर्थक्षेत्रे गोंदवले वडील रावजी लिंगोपंत कुलकर्णी आई गीताबाई पत्नी सरस्वती एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धांत जे विख्यात महाराष्ट्रीय संत होऊन गेले त्यांच्यापैकीं श्रीब्रह्मचैतन्य तथा गोंदवलेकर महाराज हे एक होत. त्यांचा जन्म माघ शुद्ध द्वादशी शके १७६६ (इ.स. १८४५) या दिवशी गोंदवले बुद्रुक या गावी झाला. हे गांव सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात असून ते सातारा-पंढरपूर रस्त्यावर सातार्‍यापासून चाळीस मैलांवर आहे. त्यांच्या घराण्यांत विठ्ठलभक्ती व पंढरीची वारी असून पूर्वज सदाचारसंपन्न व लौकिकवान होते. ते घरी थोडी शेती करून कुलकर्णीपणाचे

श्री क्षेत्र निवखन मूळ ठाण,पुरातन मंदिर जाणाई देवी व इतिहास

Image
#जानाई# 👉जानाई व भैरवनाथ हे ग्रामदैवत म्हणून पूजले जातात. 👉 त्यातले त्यात जानाई स्त्री दैवत आहे व त्यामुळे अधिक कनवाळू आहे म्हणून बऱ्याच घरात ग्रामदैवत म्हणून भैरवनाथाऐवजी जानाईची पूजा केली जाते. 👉भैरवनाथ हेही काहींच्या घरात पूजले जातात   भैरवनाथ हेही काहींच्या घरात पूजले जाते पण ते अधिक कडक दैवत आहे. त्याचे अंगात येणे इत्यादी प्रकार होत असल्याने देवघरात पुजण्याचे प्रमाण कमी आहे. 👉देवघरातील जाणाई देवीचा टाक कसा असतो. ह्या देवीचे नीट निरीक्षण केले असता, एका बाजूला बाजरीचे कणीस दिसते व हातात कापलेले पिक दिसते. म्हणजे ही मुबलक अन्नधान्य प्रदान करते. दुसऱ्या बाजूला लहान मुल दिसते आहे. म्हणजे पुत्रपौत्र लाभ देणारी अशी ही देवी आहे. सोबत सूर्य व चंद्र दर्शविले आहेत म्हणजे दिवसरात्र ही देवी गावाचे रक्षण करते. सोबत एक पशु दर्शविला आहे. म्हणजे दूधदुभते उत्तम देणारी ही देवता आहे. त्याचबरोबर घरातील भांडी दर्शविली आहेत. म्हणजे तुमचे संसार भांडीकुंडी सुरक्षित राहोत अशी मनोकामना ह्या देवीकडे केली जाते.थोडक्यात ग्राम किवा गाव यामध्ये जे जे अंतर्भूत होते त्याचे रक्षण करणारी अशी ही ग्रामदेवता जानाईद

घाटगे घराण्याची काहीपत्र कोल्हापूर चिटणीस दप्तर मध्ये आहेत

Image
सर्व पत्र कोल्हापूर चिटणीस दप्तर मध्ये आहेत . कृष्णाजी घाटगे, जयसिंगराव घाटगे, तुळाजी बाजी घाटगे, दौलतराव घाटगे, नागोजीराव घाटगे, नानासाहेब घाटगे, नारायणराव घाटगे, नारायणराव बाजी घाटगे, भवानराव घाटगे, भोवानराव घाटगे, माहादजी घाटगे, माधवराव घाटगे, माधवराव बाजी घाटगे, यशवंतराव आंदनराव घाटगे, रखमाबाई घाटगे, रघुनाथराव घाटगे, रमाबाई घाटगे, राणोजी घाटगे, राधाबाई घाटगे, लक्ष्मीबाई घाटगे, सुबराव घाटगे (सर्जेराव), हिंदुराव घाटगे,

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी माता तुळजापूर

Image
महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तुळजापूर येथे वास्तव्य आहे. तुळजापूर हे गाव सोलापूर – औरंगाबाद रस्त्यावर असून सोलापूरहून ४२ कि.मी. तर उस्मानाबादहून २२ कि.मी. अंतरावर आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देउन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद देणारी तुळजापूरची हि देवी भवानी माता महिषासुर मर्दिनी, तुकाई, रामवरदायिनी, जगदंबा अदी नावानी ओळखली जाते. जगदंबा मातेची मूर्ती गडकी शिळेची असून ती अष्टभुजा आहे. आश्विन व चैत्र पूर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. यात्रेला देशभरातून लाखो भाविक येत असतात. सरदार निबाळकर दरवाजा शहाजी राजे तुळजा भवानी माता

वै.ह. ब. प गोविद महाराज केंद्रे समाधी आळंदी पुणे

Image
वै.ह. ब. प गोविद महाराज केंद्रे समाधी आळंदी पुणे 

✍️✍️✍️*सावरकरांची समुद्रात मारलेली उडी घराघरात पोहोचली,* *पण अजूनही इंग्रजांना चुकवणा-या खालील चार जणांच्या उड्या लोकांना माहीत नाहीत, हे दुर्दैव नाही का?*

Image
✍️✍️✍️ *सावरकरांची समुद्रात मारलेली उडी घराघरात पोहोचली*  *पण अजूनही इंग्रजांना चुकवणा-या खालील चार जणांच्या उड्या लोकांना माहीत नाहीत, हे दुर्दैव नाही का?* 1) क्रांतिसिंह नाना पाटील यांनी अटकेत असताना रेल्वेतून कृष्णेच्या पात्रात मारलेली उडी. 2) वसंतदादा पाटील यांनी पाठीमागून सुरू असलेला इंग्रज पोलिसांचा गोळीबार चुकवत (यात वसंतदादांचे दोन साथीदार शहिद झाले होते) दुथडी भरून वाहणाऱ्या कृष्णा नदीत चाळीस फुटांवरून मारलेली उडी. यावेळी कुंडलचे क्रांतिकारक मामासाहेब पवार यांचाही सहभाग होता. 3) सातारा सेल्युलर जेल फोडून नागनाथअण्णा नायकवडी यांनी कारागृहाच्या तीस फुटी भिंतीवरून मारलेली उडी. 4) आणखी एक उडी आहे ज्याची फारशी चर्चा नाही. शिवाजीराव पाटलांनी धुळ्याच्या जेलमधील भिंती वरुन मारलेली उडी. भिंत तीस एक फूट तरी नक्कीच होती. ते चिमठाणा येथील साडे पाच लाखाच्या दरोड्यांतले आरोपी होते त्यासाठी क्रांतीवीर नाना पाटलांनी काही माणसे पाठवली होती. पैसे पत्री सरकारलाच जाणार होते. शिवाजीराव आणि विद्याताईंची द्वितीय कन्या म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील. पण दुर्दैवाने हे फक्त खांदेशातच माहीत आहे.