✍️✍️✍️*सावरकरांची समुद्रात मारलेली उडी घराघरात पोहोचली,* *पण अजूनही इंग्रजांना चुकवणा-या खालील चार जणांच्या उड्या लोकांना माहीत नाहीत, हे दुर्दैव नाही का?*

✍️✍️✍️
*सावरकरांची समुद्रात मारलेली उडी घराघरात पोहोचली*

 *पण अजूनही इंग्रजांना चुकवणा-या खालील चार जणांच्या उड्या लोकांना माहीत नाहीत, हे दुर्दैव नाही का?*

1) क्रांतिसिंह नाना पाटील यांनी अटकेत असताना रेल्वेतून कृष्णेच्या पात्रात मारलेली उडी.

2) वसंतदादा पाटील यांनी पाठीमागून सुरू असलेला इंग्रज पोलिसांचा गोळीबार चुकवत (यात वसंतदादांचे दोन साथीदार शहिद झाले होते) दुथडी भरून वाहणाऱ्या कृष्णा नदीत चाळीस फुटांवरून मारलेली उडी. यावेळी कुंडलचे क्रांतिकारक मामासाहेब पवार यांचाही सहभाग होता.

3) सातारा सेल्युलर जेल फोडून नागनाथअण्णा नायकवडी यांनी कारागृहाच्या तीस फुटी भिंतीवरून मारलेली उडी.

4) आणखी एक उडी आहे ज्याची फारशी चर्चा नाही. शिवाजीराव पाटलांनी धुळ्याच्या जेलमधील भिंती वरुन मारलेली उडी. भिंत तीस एक फूट तरी नक्कीच होती. ते चिमठाणा येथील साडे पाच लाखाच्या दरोड्यांतले आरोपी होते त्यासाठी क्रांतीवीर नाना पाटलांनी काही माणसे पाठवली होती. पैसे पत्री सरकारलाच जाणार होते. शिवाजीराव आणि विद्याताईंची द्वितीय कन्या म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील. पण दुर्दैवाने हे फक्त खांदेशातच माहीत आहे. 

जातीयवादी व कट्टरतावादी मानसिकतेच्या लोकांनी सावरकरांच्या उडीचं मोठं भांडवल केल

 महासभेच्या कार्यकर्त्यांनी बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठा यांची सोय करणाऱ्या, गावगुंडांचा बंदोबस्त करणाऱ्या, बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करणाऱ्या नाना पाटील यांच्या तुफान दलातील लोकांना पकडून देण्यासाठी कशाप्रकारे इंग्रजांना मदत केली त्याची माहिती लपवून ठेवली. 

खासकरून नागनाथअण्णा नायकवडी यांना इंग्रजांनी पकडल्यावर त्यांना पोलिसांनी कसा अमानुष शारीरिक त्रास दिला याची माहिती फार कमी जणांना आहे. आणि हा त्रास सावरकरांच्या कोलू ओढण्यापेक्षा भयानक होता.

अनेकवेळा जेलमध्ये गेल्यावरही नाना पाटलांनी कधीच माफी मागितली नाही उलट इंग्रजांच्या तावडीतून पलायन करून हिंदू महासभेच्या खबऱ्यांना चुकवत भूमिगत राहून कार्य केलं. अजूनही नाना पटलांबद्दलची आपुलकी ही पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक घरात आहे

खरतर लोकांनी #मी_पण_क्रांतिसिंह_नाना_पाटील" हा ट्रेंड सोशल माध्यमांवर  चालवायला हवा 

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...