३० मे १६७४छत्रपती शिवाजीराजांचा राजाभिषेकाच्या ८ दिवस आधी ''विनायक शांती विधी'' संपन्न.राज्याभिषेक सोहळ्या प्रित्यर्थ संस्काराचा एक भाग म्हणून सोयराबाई, सकवार बाई, पुतळाबाई यांच्याशी छत्रपती शिवाजी महाराजांचे समंत्रिक विवाह झाले
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३० मे १५५६ अकबराचा मुलगा सलीम व राणा प्रताप यांच्यामध्ये हळदीघाट येथे घनघोर लढाई झाली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३० मे १६६४ मुघल सरदार महाराजा जसवंतसिंह याने किल्ले सिंहगडला घातलेला वेढा उठवल्याची बातमी हेरांमार्फत छत्रपती शिवरायांना समजताच स्वतः छत्रपती शिवाजी राजे राजगडाहून सिंहगड पाहण्यास आले. त्यांनी तो आपला अत्यंत प्रिय किल्ला नव्या कौतुकाने पाहिला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३० मे १६७४ छत्रपती शिवाजीराजांचा राजाभिषेकाच्या ८ दिवस आधी ''विनायक शांती विधी'' संपन्न. राज्याभिषेक सोहळ्या प्रित्यर्थ संस्काराचा एक भाग म्हणून सोयराबाई, सकवार बाई, पुतळाबाई यांच्याशी छत्रपती शिवाजी महाराजांचे समंत्रिक विवाह झाले. या प्रसंगी इंग्रज अधिकारी 'हेन्री ओक्सिडीन' हा गडावर हजार होत. तो आपल्या रोजनिशीत लिहून ठेवतो कि, "छत्रपती शिवाजी राजेंनी राज्याभिषेकापुर्वी काही स्त्रियांशी विवाह केले". राज्याभिषेक म्हणजे राजाचे भुमिशी लग्न. पण अभिषेकापुर्वी विवाह करावा असा धर्मसंकेत आहे. शिवकालात लग्ने बालपणीच होत असत. महाराजांना त्या