२९ मे १६७४राज्याभिषेकाच्या आधी राजेंचा तुलाविधी संपन्न ..
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
दि. २९ मे १६७४
सकाळी महाराजांची मुंज करण्यात आली. म्हणजेच त्या महान विश्वामित्रप्रणित गायत्री मंत्राचा अधिकार संस्कारपूर्वक ‘बटु‘स देण्यात आला. मुंजबटु ४४ वर्षांचे होते! महाराजांची यापूवीर्च आठ लग्ने झाली होती. त्यांना सहा मुली, दोन पुत्र आणि मुलींकडून काही नातवंडेही होती. इतका सगळा संसार झाला होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२९ मे १६७४
राज्याभिषेकाच्या आधी राजेंचा तुलाविधी संपन्न ....
राजांची सुवर्णतुला २९ मे १६७४
राजांच्या तुलादान विधीला प्रारंभ झाला. उजव्या बाजूचा पाय पारड्यात उजवा पाय प्रथम ठेवून राजांनी वीरबैठक घेतली. गागाभट्ट, बाळभट्ट, अनंतभट्ट ओंजळी-ओंजळींनी तबकातील झळझळीत सुवर्णमुद्रा तुलेच्या डाव्या पारड्यात सोडू लागले.
भोसालाई सोनसूर्य वर घेण्यासाठी सोने झटू लागले.
रोखल्या नजरेने संभाजीराजे पारड्याकडे बघत होते. "उभ्या रायगडाला सोनरूप देऊन तो डाव्या पारड्यात उचलून ठेवला तरी आबासाहेबांचं पारडं फरसबंदी सोडून उठू नये! " असे त्यांना वाटत होते.
राजांनी विरासनी बैठक घेतलेले पारडे फरसबंदी सोडून उचलले गेले.
राजांची सुवर्णतुला झाली. मंत्राचा घोषच घोष उठला. सतरा हजार तोलाल्या मोहरा तबकात उतरून त्यावर गागाभट्टानी मंत्रित फुले ठेवली. चांदी, तांबे, कापूर, शिसे, फळे, मध, मसाले, साखर अशा राजांच्या आखणी पंधरा तुला राजबैठकीत जोखण्यात आल्या
थोरल्या राजांची तुला झाली आता वेळ होती ती धाकल्या धन्याची.
गागाभट्टाने दिलेली फुलं तुलेवर वाहून वंदन करीत उजवा पाय उजव्या पारड्यात टाकून वीरबैठक घेतली. मंत्रांचे घोष उठू लागले सोनमोहरांच्या ओंजळीडाव्या पारड्यात पडू लागल्या. खणखणत पारड्यात उतरणाऱ्या मोहरा बघताना विचारांची एक ओंजळ कुठूनतरी संभाजी राजांच्या मनाच्या पारड्यात सोडली गेली.-
"आमच्या मासाहेब इथं येतील आणि 'शंभुबाळ' म्हणत शिवलिंगाला नेहमी वाहतात त्यांतील एकच बिल्वपान त्या पारड्यात सोडून आमच्याकडं बघतील तर आमचं पारडं हां हां म्हणता आभाळाला जाऊन थडकेल !!
आता संभाजीराजांनी वीरबैठक घेतलेले पारडे फरसबंदी सोडू लागले होते. मनात माजलेला काहूर कुठेतरी नाहीसा होत शंभूराजे भानावर आले. त्यानंतर थोरली राणीसाहेब सोयराबाई साहेब यांची सुवर्णतुला पार पडली.
ज्यांच्या शिकवणुकीमुळेच शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे स्वराज्य उभे राहिले ते थकलेले डोळे हा सोहळा आपल्या काळजात साठवत होते अन् मनाच्या कुठल्याशा कोपऱ्यात आपल्या कुंकवाची आठवण काढत पाणी गाळत होते. कारण स्वराज्यसंकल्पक तर खरे शहाजी राजेच होतेना.....
राजांची तुला करण्यासाठी १६००० होन लागले हे हेन्री ओक्झेंडनने नमूद करून ठेवले आहे. तर वेंगुर्लेकर डचांच्या वृत्तांतात मात्र १७००० होन लागल्याची नोंद आहे. राजांची सुवर्णतुला झाली तो दिवस होता. २९ मे १६७४.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२९ मे १६८०
छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर व्हॉईस रॉयने छत्रपती शंभूराजेंना पत्र पाठवून पुर्वीचा तह कायम राखण्याबाबत स्पष्ट केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
२९ मे १७३७
मनोरवर विजय...
तांदुळवाडी किल्ला जिंकल्यानंतर लगेच आपली विजयी घोडदौड मनोरच्या दिशेने निघाली, बरबाजी तपकीर, आवजी कवडे, विठ्ठल विश्वनाथ या धारकऱ्यांनी, १५ मे १७३७ मध्ये मनोर किल्ल्याला वेढा दिला आणि मदतीस नरवीर चिमाजी अप्पांनी, होनाजी बलकवडे या सरदारास पाठविले, आणि २९ मे १७३७ विजय मिळवला, पण पोर्तुगीजांची शिबाडे मनोरच्या मदतीस आली पण मराठ्यांच्या विजयाच्या धुंदी पुढे पोर्तुगीजांना पळ काढावा लागला...
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.
"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩
Comments
Post a Comment