३० मे १६७४छत्रपती शिवाजीराजांचा राजाभिषेकाच्या ८ दिवस आधी ''विनायक शांती विधी'' संपन्न.राज्याभिषेक सोहळ्या प्रित्यर्थ संस्काराचा एक भाग म्हणून सोयराबाई, सकवार बाई, पुतळाबाई यांच्याशी छत्रपती शिवाजी महाराजांचे समंत्रिक विवाह झाले

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३० मे १५५६
अकबराचा मुलगा सलीम व राणा प्रताप यांच्यामध्ये हळदीघाट येथे घनघोर लढाई झाली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३० मे १६६४
मुघल सरदार महाराजा जसवंतसिंह याने किल्ले सिंहगडला घातलेला वेढा उठवल्याची बातमी हेरांमार्फत छत्रपती शिवरायांना समजताच स्वतः छत्रपती शिवाजी राजे राजगडाहून सिंहगड पाहण्यास आले. त्यांनी तो आपला अत्यंत प्रिय किल्ला नव्या कौतुकाने पाहिला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३० मे १६७४
छत्रपती शिवाजीराजांचा राजाभिषेकाच्या ८ दिवस आधी ''विनायक शांती विधी'' संपन्न.
राज्याभिषेक सोहळ्या प्रित्यर्थ संस्काराचा एक भाग म्हणून सोयराबाई, सकवार बाई, पुतळाबाई यांच्याशी छत्रपती शिवाजी महाराजांचे समंत्रिक विवाह झाले. या प्रसंगी इंग्रज अधिकारी 'हेन्री ओक्सिडीन' हा गडावर हजार होत. तो आपल्या रोजनिशीत लिहून ठेवतो कि, "छत्रपती शिवाजी राजेंनी राज्याभिषेकापुर्वी काही स्त्रियांशी विवाह केले".
राज्याभिषेक म्हणजे राजाचे भुमिशी लग्न. पण अभिषेकापुर्वी विवाह करावा असा धर्मसंकेत आहे. शिवकालात लग्ने बालपणीच होत असत. महाराजांना त्यांच्या वयास सांधर्म्य साधणारी मुलगी मिळणे अशक्य होते. पण म्हणून शिवरायांनी या ठिकाणी कुठल्याही लहान मुलीशी विवाह केलेला नाही. आता कळले का ? समर्थ छत्रपती शिवरायांना "आचारशिल - विचारशिल - सर्वज्ञ पणे सुशिल" असे का म्हणतात ? 
महाराज थोर विवेकी पुरूष होते !

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३० मे १७३७
वसईवर मराठयानी पहिला हल्ला केला पण फिरंग्यानी तो परतवून लावला. त्यानंतर ९ जून, २८ जून, ४ सप्टे. १९३७ हल्ला अयशस्वी राहिला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

३० मे १८०८
बापु गोखलेंनी वासोटा ताब्यात घेतला...
"बापू विरुद्ध प्रतीनिधी व ताई तेलीण...
प्रतिनिधी पद :- मुळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात प्रतिनिधी हे पद नाही. १६८९ ते १७०० या दरम्यान छत्रपती राजाराम जिंजीस आश्रयास गेलेला असताना हे पद निर्माण करण्यात आले. राजारामच्या अनुपस्थितीत प्रतिनिधीच्या आज्ञेत सर्वांनी राहावे व राज्य कारभार चालवावा असा संकेत ठरला. त्यामुळे प्रतिनिधी हा पेशवे व इतर मंत्र्यांच्या ही वरच्या हुद्द्याचा होता.
रावबाजीचा संबंध प्रतिनिधीशी आला त्याचे नाव परशुराम पंत. हा अत्यंत हूड प्रवृत्तीचा असल्याने नाना फडणीसाने  त्याला पुण्यास आपल्या नजरेखाली ठेवले होते. १७९५ मध्ये हा परशुराम १८ वर्षाचा झाला व स्वतः काभार पाहू लागला. त्यानेच नेमलेला कारभारी बळवंतराव आणि त्याची स्वतः ची आई यांच्या सल्ल्याने कारभार चालू झाला. पण पुढे परशुरामाचे त्यांच्याशी पटेना. कारभारी बळवंतराव आणि त्याची स्वतःची आई रावबाजीकडे परशुरामाच्या तक्रारी करत असत. तेव्हा  रावबाजीने  शिंद्यांच्या मदतीने त्याच्या वाड्याला वेढा घातला व कारभारी बळवंतराव आणि आई  यांच्या आज्ञेतच राहीन असे परशुरामाकडून वचन घेऊनच उठवला. मात्र आपले वचन पाळले नाही व पुन्हा आपले रंग तो दाखू लागला (१८०३). त्याला वठणीवर आणण्यासाठी पेशव्याने बापूस पाठवले.  बापूचे प्रत्यक्षात प्रतिनिधीशी काही वैयक्तिक वैर नव्हते. बहुदा नाईलाजास्तव ही कामगिरी स्वीकारली. १८०४ ते  १८०८ अशी प्रलंबित हि कारवाई होती. १८०७ मध्ये ताई तेलीण हिने स्वतःची फौज जमवली व प्रतिनिधीच्या जहागिरीचे रक्षण करण्यासाठी शस्त्र उपसले. वासोटा हा दुर्गम दुर्ग तिने आपली लष्करी राजधानी केली. शिवाय आजूबाजूच्या ३०-४० मैलाचा प्रदेश हि ताब्यात घेतला. बापूने तिच्या विरुद्ध मोहीम उघडली आणि वासोटा सोडून बहुतेक सर्व प्रदेश मुक्त केला.
मार्च १८०८ पासून बापूने वासोट्या वर कारवाई तीव्र केली. ताई तेलीणीने कडवा प्रतिकार करीत किल्ला लढवला.  अखेर उपासमारीने हतबल होऊन ३० मे १८०८ रोजी तिने शरणागती पत्करली आणि वासोटा बापूच्या ताब्यात आला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...