Posts

३० जुलै १६८२छत्रपती संभाजी महाराजांनी "नाशिक" येथील "किल्ले रामशेज" ला १००० मावळ्यांची तुकडी पाठवली.गडाखाली जोरदार लढाई.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३० जुलै १६७७ "दक्षिण दीग्विजय मोहीम" छत्रपती शिवरायांनी "नागोजी भोसले" यांस सालाना १२५ होन मंजूर करून "उटकुर" चा हवालदार नेमले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३० जुलै १६८२ कारवारच्या इंग्रजांचे सुरतेच्या इंग्रजांना पत्र.  "मोगल बादशाह छत्रपती संभाजी महाराजांविरूध्द इतका चिडला आहे की, त्याने आपल्या डोक्याची पगडी खाली उतरली आणि शपथ घेतली, की त्याला मारल्याशिवाय किंवा राज्यातून हाकलून दिल्याशिवाय मी ती डोक्यावर घालणार नाही." अशी त्याने प्रतिज्ञा केली आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३० जुलै १६८२ कारवारकर इंग्रजांनी सुरतकर इंग्रजांना पाठविलेल्या पत्राची नोंद ! "छत्रपती संभाजी महाराजांना जोराचा हल्ला करून दंडाराजपुरी घेईन अशी फार आशा होती. दादाजी प्रभू व इतर सेनापती व आपले निधड्या छातीचे ४ हजार लोक घेऊन, त्यांच्याकडे वेढा घालविला. या दुर्घट कामासाठी उत्तेजित व्हावे म्हणून त्यांस अर्धा शेर सोने किंवा चांदीची कडी बक्षिस दिली. परंतु यश आले नाही. बरेच लोक मारले गेले अवघे ५०० लोक वाचले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ३० जुलै

२८ जुलै १६८२छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगिजांची जहाजे पकडली! छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगिजांची जहाजे पकडली. मुजोर पोर्तुगिजांना धाकात ठेवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी ही जहाजे पकडली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २८ जुलै १६०६ राजे मालोजीराजे व राजे विठोजीराजे यांच्या पत्रांत सरगुऱ्हों" असा उल्लेख ! धामधुमीचा काळ पराक्रमी पुरुषांस भाग्योदय करून घेण्यासाठी अत्यंत अनुकूल असतो. कारण यावेळी धडाडी दाखविल्यास त्वरित मोबदला मिळण्याची शक्यता असते. राजे मालोजीराजे यावेळी तरुण होते. स्वाभाविकपणेच त्यांच्या महत्वाकांक्षी तरुण मनाला ही राजकीय अस्थिरता भाग्योदयार्थ अनुकूल वाटली व त्यांनी शेती टाकून तरवार हाती धरली. राजे मालोजीराजे व राजे विठोजीराजे यांची जी पत्रे उपलब्ध आहेत. त्यांत या दोघा महापराक्रमी बंधूंना "सर" असे म्हटले आहे. सरगुन्हो हे सरगिरोह चे मराठी रुप आहे. गिरोह म्हणजे जमाव. त्यांचा प्रमुख म्हणजे सरगिरोह. उपरोक्त पत्रांमध्ये राजे "मालोजीराजे व राजे विठोजीराजे सरगुन्हो यासी गुन्होथलयास मुकासा दिधले असे असा उल्लेख करून काही गावे दिली आहेत. याचा अर्थ स्वतःचा जमाव किंवा सैन्य तुकडी घेऊन सरकार चाकरी करायची, व त्या मोबदल्यात सरकारकडून काही स्थळे खर्चासाठी मागून घ्यायची अशी पद्धत त्याकाळी रुढ होती. त्यानुसार राजे मालोजीराजे

२३ जुलै १६७७"दक्षिण दिग्विजय मोहीम"छत्रपती शिवराय "तिरूमलवाडी" येथील "वैद्यनाथ स्वामी" मंदीरात पोचले

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ जुलै १६६६ आग्रा कैदेत असताना छत्रपती शिवरायांना "विठ्ठलदास"च्या हवेलीत हलविण्याची औरंगजेबाची गुप्त मसलत हेरांमार्फत छत्रपती शिवरायांच्या कानावर आली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ जुलै १६७१ छत्रपती शिवाजी महाराजांचे पाटीलकीवरून चाललेल्या तंट्याविषयी पत्र पुणे परगण्याच्या कर्‍हेपठार तरफेतील वणपुरी या गावच्या पाटीलकीवरून चाललेल्या एका तंट्याविषयी त्या तरफेच्या कचेरीतून त्या तरफेतील सासवड वगैरे सहा गावांना पाठविण्यात आलेले २३ जुलै १६७१ या तारखेचे एक पत्र उपलब्ध आहे. त्यात या प्रकरणी “मागे… दादाजी कोंडदेव यांचे कारकीर्दीत ऐसे चालिले असेली, राजेश्री साहेबांचे कारकीर्दीस चालिले असेली तेणेप्रमाणे हाली वर्तवणे, जो न वर्ते त्याची ताकीद करणे’‘ असा हुकूम राजश्री साहेबी (म्हणजे शिवाजी महाराजांनी ) केला असल्याचे नमूद केले आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ जुलै १६७७ "दक्षिण दिग्विजय मोहीम" छत्रपती शिवराय "तिरूमलवाडी" येथील "वैद्यनाथ स्वामी" मंदीरात पोचले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २३ जुलै १६८३ छत्रपती संभाजी महाराजांचा प

२२ जुलै १६८३पोर्तुगीजांच्या वाढत्या हालचालींना पायबंध घालण्यासाठी मराठ्यांनी छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली ८००० सैन्यासह उत्तर कोकणात रेवदंड्यावर पुन्हा स्वारी केली व चौलच्या किल्ल्याला वेढा घातला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २२ जुलै १६५७ मे महीन्यात मराठे अहमदनगरपर्यंत घुसले आणि लुट करुन परतले. औरंगजेब कमालीचा संतापला. त्याचे सैन्य कल्याणीच्या वेढ्यात गुंतले होते त्याचाच फायदा शिवाजीराजांनी घेतला. आदिलशहाने कल्याणीच्या रक्षणार्थ तीस हजार फौज पाठवली. दोन महिने मुघल - आदिलशहा लढत राहीले. २२ जुलै रोजी महंमद सुलताने व मीर जुम्ल्याने संयुक्त हल्ला करुन आदिलशाही सैन्याला हरवले. २९ जुलै रोजी कल्याणी किल्यात मुघलांना प्रवेश मिळाला पण पुढले ३ दिवस किल्लेदार दिलावरखानाने बालेकिल्यातून निकराचा लढा दिला. अखेर नाईलाजाने त्याने किल्ला सोडला. कल्याणी सारखा भक्कम आधार गेल्यावर आदिलशहाने तह करण्याची तयारी दाखवली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २२ जुलै १६६६ सत्पुरुष कवींद्र परमानंदांचा सत्कार आग्रा कैदेत असताना थोर सत्पुरुष कवींद्र परमानंद नेवासकर यांचा सत्कार करण्याचे छत्रपती शिवाजी महाराजांनी ठरविले. हा सत्कार समारंभ दिनांक २२ जुलै १६६६ च्या सुमारास झाला असावा, कारण ह्याचा उल्लेख दिनांक २२ जुलैच्या राजस्थानी पत्रात आहे. दिनांक २२ जुलै रविवारी छत्रपती शिवाजीराजे यांनी राहत्या

२१ जुलै १६७२"अब्राहम लेफेबर" हा डच वकील किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांसमोर हजर.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २१ जुलै १६५८ औरंगजेब दिल्लीमधे तख्तनशीन गेल्याच महिन्यात औरंगजेबाने बाप शहाजहानला आग्र्यात तुरूंगात टाकले होते व त्यानंतर ६ जुलै रोजी औरंगजेब दिल्लीला आला व तेथील व्यवस्था लावुन तो २१ जुलै रोजी तख्तनशीन झाला. याच दिवशी त्याने स्वतःला 'आलमगीर गाझी' अशी पदवी धारण केली. आलमगीर म्हणजे जग जिंकणारा व गाझी म्हणजे धर्मवीर. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २१ जुलै १६६२ देशबांधवांना सोडवण्यासाठी इंग्रजांचा प्लॅन !  विजापूरची राणी बडी बेगम साहिबा आपल्या मक्केच्या यात्रेवरून हिंदुस्थानला परतायच्या बेतात होती आणि तिच्या आगमनावर इंग्रज लक्ष ठेऊन होते ! पण कशासाठी ? बड्या साहेबीणीचा आणि रायरी वर अडकून पडलेल्या इंग्रजांचा एकमेकांशी काय संबंध होता ? या दोघांचा काहीही संबंध नसला तरी इंग्रजांना असे वाटत होते की बड्या साहेबिणीला जर आपण पकडले तर आदिलशहा तिच्या सुटकेसाठी शिवाजी महाराजांवर दबाव आणेल आणि त्या बदल्यात आपल्याला रायरीच्या तुरुंगातील आपल्या देशबांधवांना सोडवून घेता येईल ! वास्तविक पाहता शिवाजी महाराजांवर अशा प्रकारे दबाव टाकून आपल्या देशबांधवा

२० जुलै १६६२मराठ्यांनी "नाशिक" आणि आसपासचा प्रदेश जिंकला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० जुलै १६६२ मराठ्यांनी "नाशिक" आणि आसपासचा प्रदेश जिंकला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० जुलै १६८० छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर छत्रपती संभाजीराजांचे किल्ले रायगडवर "मंचकारोहण" झाले. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० जुलै १६८५ गुजरातच्या मार्गाने आग्र्यास प्रयाण करण्याची तयारी शहजादा अकबराने केली आहे अशी बातमी औरंगजेबास कळली तेव्हा त्याने अहमदाबादच्या सुभेदार कारातलबखान यास हुकुम पाठवला कि, "अकबर त्या बाजूस आढळला कि त्यास एकदम पकडून द्यावा बिलकुल हयगय करू नये". 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० जुलै १६९१ आसदखान व कामबक्ष यास जिंजीवर स्वारी करण्याचा औरंगजेबाचा आदेश. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० जुलै १७६१ माधवराव यांनी पेशवेपदाची सुत्रे हाती घेतली. पानीपतच्या युद्धानंतर नानासाहेब पेशवे यांचा मृत्यू झाला. रघुनाथराव यांनी पेशवेपदावर दावा सांगितला पण माधवरावांना पेशवेपद मिळाले. खचलेल्या मराठा साम्राज्याला नवी उभारी देण्यासाठी वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी माधवराव पेशवे झाले होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 २० जुलै १८३७ नाशिकचा नासक हिरा या दिवशी ल

१९ जुलै १६७६"छत्रपती शिवराय" आणि "आदिलशहा" यांच्यात तह.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १९ जुलै १६४७ महादभट मुद्गल पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडे येऊन सांगितले की, मला पर्वती, पिंपळे सौदागर आणि पिंपरी या प्रत्येक गावात एक एक चावर जमीन याप्रमाणे तीन चावर जमीन आणि पुणे परगण्याच्या जकातखात्यातून दिवाबत्तीकरिता रोज तीन रुके असे इनाम आहे. हे इनाम निजामशाही फर्माने, मलिकअंबराचे खुर्द्खत, वाजीरांनी दिलेली भोगवट्याची पत्रे आणि शहाजीराजांनी दिलेले खुर्दखत यांच्याप्रमाणे शुहूर सन १०४७ पर्यंत चालले आहे. यावर्षी सुभेदार दादाजी कोंडदेव यांना देवाज्ञा झाली म्हणून महालीचे कारकून नवीन खुर्दखत आणा असा आक्षेप घेतात. तरी कृपा करून हे इनाम चालू ठेवण्याची आज्ञा व्हावी. हि सर्व विनंती शिवाजीमहाराजांना या पत्रात उद्धृत केली आहे आणि गतवर्षीपर्यंत ज्याप्रमाणे हे इनाम चालत आले आहे, त्याप्रमाणे पुढे हि चालू ठेवावे असा हुकुम केला आहे. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 १९ जुलै १६५९ गोव्याच्या किल्ल्यातील दालनात वाचले गेलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे पत्र- छत्रपती शिवाजीराजांचे दंडयाच्या सिद्दी व त्या बंदरातील हबशी (सिद्दीची प्रजा) यांच्याशी वितुष