२३ जुलै १६७७"दक्षिण दिग्विजय मोहीम"छत्रपती शिवराय "तिरूमलवाडी" येथील "वैद्यनाथ स्वामी" मंदीरात पोचले

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२३ जुलै १६६६
आग्रा कैदेत असताना छत्रपती शिवरायांना "विठ्ठलदास"च्या हवेलीत हलविण्याची औरंगजेबाची गुप्त मसलत हेरांमार्फत छत्रपती शिवरायांच्या कानावर आली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२३ जुलै १६७१
छत्रपती शिवाजी महाराजांचे पाटीलकीवरून चाललेल्या तंट्याविषयी पत्र
पुणे परगण्याच्या कर्‍हेपठार तरफेतील वणपुरी या गावच्या पाटीलकीवरून चाललेल्या एका तंट्याविषयी त्या तरफेच्या कचेरीतून त्या तरफेतील सासवड वगैरे सहा गावांना पाठविण्यात आलेले २३ जुलै १६७१ या तारखेचे एक पत्र उपलब्ध आहे. त्यात या प्रकरणी “मागे… दादाजी कोंडदेव यांचे कारकीर्दीत ऐसे चालिले असेली, राजेश्री साहेबांचे कारकीर्दीस चालिले असेली तेणेप्रमाणे हाली वर्तवणे, जो न वर्ते त्याची ताकीद करणे’‘ असा हुकूम राजश्री साहेबी (म्हणजे शिवाजी महाराजांनी ) केला असल्याचे नमूद केले आहे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२३ जुलै १६७७
"दक्षिण दिग्विजय मोहीम"
छत्रपती शिवराय "तिरूमलवाडी" येथील "वैद्यनाथ स्वामी" मंदीरात पोचले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२३ जुलै १६८३
छत्रपती संभाजी महाराजांचा पोर्तुगीजांना जबरदस्त दणका
छत्रपती संभाजी महाराजांनी २२ व २३ जुलै सन १६८३ साली चौलला वेढा घातला असता वेढा उठवावा यासाठी पोर्तुगीजांनी मराठ्यांना शह देण्याचा प्रयत्न म्हणून गोव्याचा व्हाॅइसराॅय दों प्रान्सिश्कु कौंट द आल्व्होर याने १०,००० सैन्यासह फोंड्याला वेढा घातला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२३ जुलै १७२४
कान्होजी आंग्रेंचे इंग्रज गव्हर्नर फिप्स यास पत्राद्वारे उत्तर
इंग्रज वा पाश्चात्य देशातील लोक सर्व समुद्र स्वतःच्या मालकीचा मानीत. शत्रूचा उल्लेख चोर, चाचे, लुटारू, दरोडेखोर असाच करत असत.
इंग्रजांच्या पत्राद्वारे आलेल्या उद्दाम उत्तराला सरखेल कान्होजी आंग्रे यांचे इंग्रजांचा मुंबईचा गव्हर्नर फिप्स यास 
२३ जुलै सन १७२४ पत्राद्वारे उत्तर.
"आमचा कारभार चोरीच्या धंद्यावर चालला आहे हें म्हणणें तुमच्यासारख्या व्यापाऱ्यांस शोभत नाही. शिवाजीमहाराजांनी चार पातशहांशी युध्द करून मराठी राज्य स्थापिलें, त्यांचा मी केवळ एक चेला आहें. कायदेकानू पाळून जे कोणी व्यापार करतील त्यांस आमचेकडून उपद्रव होणार नाही."

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२३ जुलै १८५६
लोकमान्य बाळ (केशव) गंगाधर टिळक यांचा जन्मदिन
समाजसुधारक आणि प्रखर राष्ट्रवादी. (मृत्यू: १ ऑगस्ट १९२० – मुंबई)

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२३ जुलै १९०६
चंद्रशेखर आझाद यांचा जन्मदिन
स्वातंत्र्यलढ्यातील आघाडीचे क्रांतिकारक (मृत्यू: २७ फेब्रुवारी १९३१)

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२३ जुलै २०१२
नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांच्या 'आझाद हिंद सेने'तील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन कै. लक्ष्मी सहगल ह्यांचा स्मृतिदिन !

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४