११ नोव्हेंबर १६७५छत्रपती शिवरायांनी "सातारा" प्रांत जिंकला.
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ नोव्हेंबर १६५७ औरंगजेबची पत्नी दिलरास बानूचे निधन औरंगजेबाने तख्त काबीज करण्याचा जणू चंगचं बांधला. तो बिदरहून उत्तरेकडे झेपावण्याकरिता संधी शोधत होता आणि त्याला ती मिळाली. ११ नोव्हेंबर, १६५७ रोजी त्याची पत्नी दिलरास बानू त्याच्या पाचव्या मुलास जन्म देताना मरण पावली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ नोव्हेंबर १६५९ छत्रपती शिवरायांनी अफझलखानाला ठार मारले आणि नंतर लगेच त्यांनी "वाई" सोडली. त्यांच्या घोड्यांच्या टापा वळाल्या त्या थेट कराडच्या दिशेने. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ नोव्हेंबर १६७५ छत्रपती शिवरायांनी "सातारा" प्रांत जिंकला. ११ नोव्हेंबर १६७५ रोजी सातारा काबीज झाला. महाराज साताऱ्यात गेले आणि गंभीर आजारी झाले. या आजराचे स्वरूप एवढे भयंकर होते की, त्यांच्या मृत्यूची अफवा झाली. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ नोव्हेंबर १६७५ विजापूरचा सरसेनापती बहलोलखान खवासखानाचे कोणतेच हुकुम पाळीत नव्हता. खावासखानाने अफगाण गटाचा बिमोड करण्यासाठी गुप्तपणे मोगलांचा दक्षिण सुभ्याचा सुभेदार बहादुरखान यास मदत मागितली. तसे बहादूरखान १९ ऑक्टोबर १६७५...