२५ आॅक्टोबर १२९६संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२५ आॅक्टोबर १२९६
संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२५ आॅक्टोबर १६४५
छत्रपती शिवाजी महाराज लालमहल येथे मुक्कामी

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२५ ऑक्टोबर १६७०
मोरोपंत पिंगळे पेशवे पंतप्रधान यांनी शिवनेरी जिंकण्यासाठी शिकस्त केली पण त्यात त्यांना अपयश आले. पण त्यांनी पुढे घुसून नाशिकजवळील ब्रह्मगिरी जिंकला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२५ ऑक्टोंबेर १६७९
छत्रपती शिवाजी महाराजांचे पायदळ आणि घोडदळाप्रमाणे आरमार ही त्याच दर्जाचे होते, शिवरायांच्या आरमाराचे हालचाली इतक्या प्रभावी होत्या की त्यांचे उल्लेख पोर्तुगीज, डच आणि ब्रिटिश साधनात आढळतात त्याचेच एक उदाहरण -
२५ ऑक्टोंबेर १६७९ ला सुरतवाले लिहतात की,
शिवरायांच्या आरमाराला आम्ही फार वेळ टक्कर देऊ असे आम्हास वाटत नाही
आरमार उभारणीच्या वेळी लाकडाचे महत्व मोठे होते, त्याकाळी जंगले दाट होती आणि लाकूड ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची यासंबधी आज्ञा अशी होती याचा उल्लेख आज्ञापत्र साधनात येतो " स्वराज्यातील आंबे, फणस हेही लाकडे आरमाराच्या प्रयोजनाची परंतु त्यास हात लावू देऊ नये. काय म्हणून तर ही झाडे वर्षा दोन वर्षात होतात असे नाही, रयतेनी ही झाडे लावून लेकरासारखी बहुतकाळ जतन करून वाढवली त्यांचे दुखास पारावार काय ? कदाचित एखादे झाड बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल तर त्याचे धन्यास राजी करून द्रव्य देऊन त्याचे संतोषे तोडून द्यावे " छत्रपती शिवरायांनी आपल्या आरमार उभारणी करताना सुद्धा रयतेची घेतलेली काळजी आणि नैसर्गिक समतोल या आज्ञापत्रातून दिसतो.
मराठा आरमार छोटे असले तरी मराठा लष्करी व्यवस्थेतील ते एक प्रमुख अंग होते. समकालीन साधनांवरून असे दिसून येते कि मराठा आरमारात लहान मोठी अशी विविध जातीची जहाजे होती. गुराबा, शिबार्डे, पगार अशी हि जहाजे होती..
गुराब हे १५० ते ३०० टन इतकी वजन क्षमता असलेले मध्यभागी रुंद आणि टोकाला निमुळते होणारे असे जहाज असते. ह्यावर २-३ डोलकाठ्या असतात. एकावेळी १५०-२०० सैनिक आणि खलाशी ह्यातून प्रवास करू शकत.
गलबत हे आकाराने अजून लहान असते. ७०-८० टन क्षमता असलेले हे जहाज फारतर १०० सैनिक वाहून नेत असे. मात्र जलद हलचालीच्या दृष्टीने हे अत्यंत उपयुक्त असे जहाज होते.
या दोन मुख्य नौकाशिवाय शिवाड, तरांडी, तारू, माचवा, पारव, जुग, फ्रिनेट अशा अनेक प्रकारच्या जहाजा मराठा आरमारामध्ये सामील होत्या,सभासदकार हा मराठा आरमारातील जहाजांची एकूण संख्या ७०० देतो परंतु अंदाजे ६४० नौका मराठा आरमारात असाव्यात ...
छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराची स्थापना आणि जलदुर्ग बांधणी केल्यानंतर त्याचा फायदा हा स्वराज्यासाठी होऊ लागला. कोकण किनार्यावरील प्रदेशाचे सिद्दी, पोर्तुगीज यांच्या आक्रमणापासून संरक्षण होऊ लागले. तसेच त्या काळात समुद्रात फुटून किनार्यास आलेल्या जहाजावर मराठयांना मालकी हक्क सांगता येऊ लागला. आरमार निर्मितीमुळे पायदळ, घोडदळ यांना आरमाराचे साहाय्य होऊ लागले अन्नधान्याची रसद पोहचवणे सोपे झाले ( उदा - बसनूर आणि सुरत मोहीम ). कल्याण, भिवंडी, वेंगुर्ला अशा अनेक ठिकाणी जहाज बांधणी उद्योगाचा पाया रचला गेला शिवाय अनेक लोकांना यातून रोजगार आणि आरमारात नोकऱ्या मिळू लागल्या होत्या. सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज यासारख्या परकीय सत्तांवर आपला वचक बसला तो वेगळाच...
छत्रपती शिवरायांनी आरमारासंबधी योग्य ती सावधगीरी आणि यंत्रणा ठेवली होती याचसाठी सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि इतर जलदुर्ग बांधत त्यांची मजबूती ही केली होती, हे किल्ल्ले बांधण्यात आणि मजबूतीचा हेतू म्हणजे आरमाराला संरक्षण मिळावे आणि सिद्दी , पोर्तुगीज आणि इतर सत्ता यांच्यावर वचक रहावा, याखेरीज शिवरायांनी आरमारात दर्यावर्दी, कोळी आणि इतर लोंकाची भरती ही केलेली होती.मध्ययुगात कोणत्याही राजाने एत्तदेशीय आरमार बांधले नव्हते एवढेच काय मोगल सुद्धा समुद्रावर हतबल होते अशा प्रतिकूल परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार बांधण्याचा यशस्वी प्रयत्न केला म्हणूनच आजही छत्रपती शिवाजी महाराजांना The Father Of lndian Navy म्हणून जगभर ओळखले जाते..

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२५ ऑक्टोबर १६८०
राजापूरचे सुरतेला पत्र, 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर इंग्रजांच्या इस्ट इंडिया कंपनीने छ.संभाजी महाराजांकडे  बक्षिस चालू ठेवण्यासाठी विनंती केली होती. ह्या गोष्टीचा पाठपुरावाही ते अगदी न चुकता करताना दिसतात. ह्या बाबतीतला एक संदर्भ आॅक्टोबर १६८० मधील, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनी पाहायला मिळतो.
राजापूरच्या वखारीचे एक पत्र दिसते ज्यात रायरीवर संभाजीशी झालेल्या भेटीअंती त्याने बक्षिस चालू ठेवण्यास नकार दिल्याचे कळते. त्या नकारामागचे कारणही स्पष्टपणे दिले आहे. सिद्दीला मुंबई बंदरात नांगर टाकून देणे व त्याला साधन सामग्री पुरवणे हे शिवाजी व इंग्रजांच्यातील कराराविरुद्ध असल्याचे म्हटले आहे.

Our last to your Honour was dated the 26th June... wherein wee advised your Honour that wee had sent againe unto Sombagee Rajah, about recovering of the remainder of the Bucksiss, according to your Honour orders; since which our servants have been at Rairy, expecting of the Rajah's answers, soe that wee had nothing of any importance to advise in this time worthy of your Honour notice, untill the 25th instant arrived to us our servants from the Rajah, with letters, but could gett noe orders for any more Bucksiss, for this reason; that the Syddy his enemy is harboured in our port or Bombay where he is furnished with ammunition, provisions, contrary to our artioles made with Sevagee Rajah soe that he declares he will beare us noe manner of respect, or take any notice of us till the Siddy be turned out, and not suffered to have any reoruites from thence; but if the Syddy still continues in that port, he will be very seveere and demand the amount of what hath been allready delivered of the Busksiss, but contrary if the Siddy deserts the Island, he hath promised to order us the Bucksiss, with satisfaction for what was robbed up the Gaut, in Hattanee, and that wee shall have the same liberty in his country as formerly in the Sevagee Rajahs time of government, soe that what to doe in this affaire wee know not.

आमचे ह्याआधीचे पत्र २६ जूनला लिहिले होते ... ज्यात आम्ही संभाजी राजाकडे बक्षिस मिळवण्यासाठी वकील पाठवल्याचे सांगितले होते. तेव्हापासून आमचे नोकर रायरीला संभाजी राजाच्या पत्राची वाट पाहत होते त्यामुळे तुम्हाला कळवण्यासारखे काही नव्हते. एवढ्यातच राजाकडून आमचे नोकर परत आले व त्यांनी पत्रही आणली आहेत. पण राजाने आमचे बक्षिस चालू ठेवण्यास ह्या कारणासाठी नकार दिला आहे - राजाचा शत्रू सिद्दी ह्याला आमच्या बंदरावर आम्ही नांगर टाकू दिला आहे व तिथे त्याला युद्धसामग्री व इतर सामानाच पुरवठा केला जातो जे आपल्या व शिवाजीमध्ये झालेल्या कराराच्या विरुद्ध आहे. त्यामुळे जोवर सिद्दीला तिथून हकलून दिले जात नाही व त्याला त्यामुळे अडचण होत नाही तोवर आपल्या विनंतीकडे लक्ष दिले जाणार नाही. तसेच सिद्दीला जर तिथे आश्रय मिळत राहिला तर तो [संभाजी] अधिक नाराज होऊन आपल्याला आधी दिलेल्या बक्षिसाचीही भरपाई मागेल. पण सिद्दी जर तिथून निघून गेला तर बक्षिस मिळेलच व त्याबरोबर घाटावर झालेल्या अथणीतील छाप्याची भरपाईही मिळू शकेल. तसेच शिवाजीच्या वेळी ज्या सवलती आपल्याला मिळत होत्या त्या चालू ठेवल्या जातील. ह्यामुळे आता नेमके काय करावे ते आम्हाला कळत नाही.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२५ ऑक्टोबर १७६०
कुंजपुरा हस्तगत झाल्यावर तेथे आठवडा राहून मराठ्यांनी १९ ऑक्टोबरचा दसरा सण मराठ्यांच्या इतमामास शाजेशा रितीने मोठ्या आनंदाने साजरा केला. तद्नंतर मराठ्यांनी कुरुक्षेत्री जाऊन तीर्थविधी उरकून दिल्लीस परत जाण्याचा बेत केला. भाऊसाहेबाच्या मनात हेही होते
की, कुरुक्षेत्रावरून सरहिंदकडे जाऊन तो प्रांत काबिज करून तिकडील शीख, जाट वगैरे जमीनदार सामिल करून फौज ताजी करावी. हा मनसुबा करून मराठे दिनांक २५ ऑक्टोबरला कुंजपुऱ्याहून निघून त्याच संध्याकाळी तरावरी येथे मुक्कामास आले. हे ठिकाण कुंजपुरा व कुरुक्षेत्र याच्या मध्यावर आहे. तिथे त्यांना बातमी मिळाली की, अबदालीने उत्तरतीरी बागपत गावाजवळ यमुना उतरण्यास सुरुवात केली असून भाऊची दिल्लीकडून येणारी रसद तोडली. आपली पाठीमागिल रसद तुटल्याचे भाऊस समजताच त्यांनी पानिपतच्या बाजूने कूच केले आणि त्यांनी अबदालीच्या हालचाली संबंधी माहिती मिळविण्यासाठी माणसे पाठविली तो त्यांस कळाले की, अबदालीने दिनांक २३ ऑक्टोबर रोजी यमुना उतरण्यास सुरुवात केली व त्याने २९ ऑक्टोबर रोजी फौजेनिशी पानिपतपासून दोन कोसावर येऊन तळ दिला. अशा रितीने दोन्ही सैन्ये पानिपती आले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

२५ ऑक्टोबर १८०२
यशवंतरावांनी २५ आक्टोबर १८०२ रोजी पुण्यावर स्वारी करुन शिंदे व पेशव्यांचा दणदणित पराभव करुन कन्या भिमाबाई आणि पत्नी लाडाबाईची सुटका केली.
दौलतराव शिंदेंनी सत्तालालसेमुळे मल्हारराव होळकर (दुसरे) यांचा पुण्यात खुन केला. यशवंतराव व विठोजींच्याही जीवावर शिंदे उठल्याने उभयतांना पुण्यातुन निसटुन जावे लागले. शिंद्यांनी त्याचा सुड असा घेतला कि नवजात भीमाबाई आणि माता लाडाबाईला कैदेत टाकले.  तब्बल सहा वर्ष या वीरांगनेला मातेसह कैदेत रहावे लागले. सुटकेनंतर मात्र यशवंतरावांनी भीमाबाईच्या शिक्षनाची व लष्करी प्रशिक्षणाची सुरुवात केली. भीमाबाईंचा जन्म १७९७ साली पुणे येथे झाला. आईचे नांव लाडाबाई तर पिता भारताचे आद्य स्वातंत्र्य सेनानी यशवंतराव होळकर.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.

"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री" 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

महाराज शिवाजी राजे ऑफ तंजावर साहेबांचे आज पुण्यात स्वागत व सत्कार करण्याचे संधी मिळाली. विविध इतिहास अभ्यासकांना महाराज साहेबांनी आज मोलाचे मार्गदर्शन केले.

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...