राष्ट्रकूट घराणे
राष्ट्रकुट राजघराण्यातील प्राचीन राजा 'मानाड्क' याने कुंतल देशात राज्य स्थापन केले. त्याची राजधानी होती 'मानपूर नगरी' सध्या राजेवाडीच्या तलावात स्थिरावली आहे. ब्रिटिश सरकारने इ.सन 1873 साली राजेवाडी तलाव निर्माण करून मानपूर नगरीचे उरलेसुरले अस्तित्व नष्ट करून टाकले. तथापि त्या ठिकाणच्या जवळच अद्याप शंभू महादेवाचे प्राचीन सुरेख मंदिर असून त्यात कोरीव कलेचा उत्कृष्ठ नमुना असलेला नंदी पाहायला मिळतो. त्यास नांगरतास असे नाव आहे . प्रत्यक्ष पाहून मग 'मानपूर नगरी' ची कल्पना येईल. या मानाड्क राजाचा देश 'माणदेश' म्हणून पुढे प्रसिद्ध पावला, असे काही इतिहासकारांच मत आहे.'मानाड्क' राजाने इ.स.375 च्या दरम्यान राज्य केले. मानपूरचे राष्ट्रकुट राज्य इ.स.974 च्या सुमारास मोडले. तेव्हापासून मानपूरचे अस्तित्व संपले. मानाड्क राजाचा पुत्र देवराज राज्य करत होता. याच देवराज राजाच्या नावावरून देवापूर नाव पडले. देवापूर गाव सध्या आहे.देवराज राजाचा पणतू अभिमन्यू, पुढे राजा गोविंद यांचे माणदेशावर राज्य होते. माणदेशावर चालुक्य, शिलाहार, देवगिरीच्या यादवांचे राज्य होते.