Posts

Showing posts from April, 2025

१४ एप्रिल १६६७ किल्ले रांगण्याला आदिलशाहीचा वेढा. १४ एप्रिल ते १२मे १६६७ या काळामध्ये रांगण्याला बेहलोलखान व व्यंकोजी राजे यांनी वेडा दिला होता. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीने येऊन हा वेढा मोडून काढला. छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाच्या मजबुतीकरणासाठी 6000 होन खर्च केल्याचा पुरावा इतिहासामध्ये सापडतो.#

१४ एप्रिल १६६७ किल्ले रांगण्याला आदिलशाहीचा वेढा. १४ एप्रिल ते १२मे १६६७ या काळामध्ये रांगण्याला बेहलोलखान व व्यंकोजी राजे यांनी वेडा दिला होता. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी  जातीने येऊन हा वेढा मोडून काढला. छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाच्या मजबुतीकरणासाठी 6000 होन खर्च केल्याचा पुरावा इतिहासामध्ये सापडतो.#किल्लेरांगणा #आदिलशाही #छत्रपतीशिवराय #व्यंकोजीराजे #होण @nitinghadge9

घडामोडी ज्याच्या साक्षीनं घडलाय तो यमाईचा डोंगर मात्र खंबीरपणे उभाय...औंधमध्ये राजा मात्र नाही.. आज औंधच्या राजाची पुण्यतिथी...अभिवादन..

"बाळ, तू शिकला नाहीस तरी चालेल. पण तू टाकीत जा." विद्यार्थी असलेल्या गजानन दिगंबर माडगूळकर यांना औंधच्या राजांनी सांगितलं. औंधचा राजा या धड्यातील एक वाक्य.पुढे गदिमानी त्यांच्या शब्दाचं सोनं केलं.कथा -कादंबऱ्या लिहिल्याच पण अनेक चित्रपटकथा लिहून'टाकीत जा'हा राजाचा आदेश सत्यात उतरवला. गावाकडे जाताना औंधच्या यमाई डोंगरावर जाणाऱ्या रस्त्यावरचे लाईटचे खांब डिसतात.याच देवीच्या दर्शनासाठी अगदी कन्नड मुलुकातून लोक येतात.इथून औंधच्या राजाने राज्यकारभार केला.महात्मा गांधी यांच्याकडून त्यांनी आपल्या राज्याची घटना लिहून घेतली होती.देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या अगोदर राजाने प्रजेला राज्य दिल होतं. 72 गावात ग्रामपंचायती स्थापन केल्या होत्या.आमचं गाव याच संस्थानात होतं. गावात ग्रामपंचायत होती अगोदरच. याच प्रदेशात ब्रिटिश सरकारला हादरा देणारा उठाव झाला.कुकुडवाड भागात बाज्या बैज्याने बंड केलं.तर पश्चिम भागात प्रतिसरकारची चळवळ उभा राहिली. औंधचे राजे या चळवळीच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. ब्रिटिश राजवट आणि औंध सरकार यांच्यात एक अलिखित करार होता की, पोलीस खात्याने एकमेकांच्या राज्यात ...