मुलींची पहिली शाळा आणि श्रेयवादाचे राजकारणतंजावूरच्या सरफोजी भोसले ( दुसरे )यांनी 1820 च्या दशकात स्थापन केलेली मुलींसाठीची शाळा ही भारतातील

मुलींची पहिली शाळा आणि श्रेयवादाचे राजकारण

तंजावूरच्या सरफोजी भोसले ( दुसरे )यांनी 1820 च्या दशकात स्थापन केलेली मुलींसाठीची शाळा ही भारतातील पहिली शाळा होती, हे ऐतिहासिक सत्य आज दुर्लक्षित आहे. आजही स्त्रीशिक्षणाच्या प्रारंभाची सुरुवात फक्त सावित्रीबाई फुले यांच्या शाळेपासून झाली, असा एकांगी प्रचार मोठ्या प्रमाणात केला जातो. याकमी फुले दांपत्याचे योगदान नक्कीच मोलाचं आहे, पण त्याआधीही देशात विविध ठिकाणी स्त्री शिक्षणाचे प्रयत्न झाले होते, हे विसरता कामा नये.

राजा सरफोजी भोसले हे आधुनिक दृष्टिकोनाचे, विज्ञाननिष्ठ आणि शिक्षणप्रेमी शासक होते. त्यांनी तंजावूर येथे इंग्रजी पद्धतीवर आधारित शिक्षणसंस्था स्थापन केल्या. त्यात मुलांसोबतच मुलींसाठी स्वतंत्र शाळेचीही स्थापना केली होती. या शाळेच्या स्थापनेचा कालखंड 1820 च्या आसपासचा असल्याचे अनेक इंग्रजी दस्तऐवज आणि प्रवाशांचे वर्णन स्पष्ट करतात.

या शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या गणवेशापासून अभ्यासक्रमापर्यंत सर्व गोष्टी शिस्तबद्ध होत्या. तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांनीही या शाळेचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. ही शाळा सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यातील भिडेवाडा शाळेच्या 28 वर्षांपूर्वी अस्तित्वात होती.

स्त्रीशिक्षणाच्या इतिहासात सरफोजी भोसले यांच्या योगदानाचा उल्लेख टाळून, केवळ विशिष्ट व्यक्ती आणि प्रवाहाला श्रेय देण्याचा प्रयत्न केला जातो. ही बाब केवळ ऐतिहासिक अन्यायच नव्हे, तर समाजमनाला चुकीच्या दिशेने नेणारी आहे.

म्हणूनच आज आवश्यक आहे की आपण इतिहासाकडे संपूर्ण दृष्टिकोनातून पाहावं. स्त्री शिक्षणाच्या वाटचालीत जे जे ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं, त्यांना त्यांच्या योग्य त्या स्थानावर गौरवाने मांडावं. श्रेयवादाच्या राजकारणापेक्षा सत्य इतिहासच समाजप्रबोधनासाठी उपयोगी ठरतो.

संदर्भ:

इंग्रज प्रवासी बिशप रेगिनॉल्ड हेबर यांचे तंजावूर दौऱ्याचे वर्णन
राजा सरफोजींच्या काळातील शाळांवरील प्रशासन अहवाल
तंजावूरच्या पुस्तकालयातील ऐतिहासिक नोंदी

-महेश पाटील बेनाडीकर

#सडेतोड_बेनाडीकर

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

महाराज शिवाजी राजे ऑफ तंजावर साहेबांचे आज पुण्यात स्वागत व सत्कार करण्याचे संधी मिळाली. विविध इतिहास अभ्यासकांना महाराज साहेबांनी आज मोलाचे मार्गदर्शन केले.

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४