२७ ऑगस्ट इ.स.१६५६*
*आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष* *२७ ऑगस्ट इ.स.१५३४* इस्माईल आदिलशहाचा मृत्यू छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कामी महत्वाचा अडसर राहिला तो विजापूरच्याआदिलशाहीचा आदिलशाहीत १४९० पासून १६८६ पर्यंत ९ सुलतान होऊन गेले. आदिलशाहीचा संस्थापक युसुफ शहानंतर १५१० मध्ये त्याचा वारस इस्माईल हा विजापूरचा सुलतान बनला. याने १५१० ते १५३४ अशी २४ वर्षे कारभार पहिला. याची बहुतांश कारकीर्द इतर सुलतानाशी लढायांत गेली. इस्माईल आदिलशहा मृत्यू पावला ती तारीख होती २७ ऑगस्ट १५३४. *२७ ऑगस्ट इ.स.१६५६* जावळी प्रांत जिंकून घेऊन महाराजांनी तेथील व्यवस्था लावून घेतली. जावळीहून पळालेला चंद्रराव मोरे रायरीवर जाऊन बसला होता. महाराजानी रायरीला वेढा दिला. एका महिन्याने शिळीमकरांच्या मध्यस्तीने रायरी उर्फ रायगड महाराजांच्या ताब्यात आला. महाराजानी मोरेचा घोडा,शिरपाव देऊन सन्मान केला व मोरेंच्याकडील पराक्रमी वीर म्हणजे मुरारबाजी देशपांडे व त्यांचे चार बंधू(त्रिंबकजी,शंकराजी,संभाजी व महादजी)यांना आपल्याकडे मागून घेतले. चंद्ररावना मात्र महाराजानी कैदेत ठेवले. महाराजांशी वरकरणी सख्य दाखवत चंद्ररावाने आपल्या सुटक...