२ ऑगस्टला सन १६४८ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी शिरवळ जिंकून स्वराज्यात जोडले.

  आदिलशाहीचा वजीर मुस्तफाखानाने 25 जुलै इसवी सन १६४८ साली दगा फटक्याने शहाजीराजांना बेसावध वेळेला गाठून कैद केले. त्याचबरोबर आदिलशाहीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात पारिपत्य करण्यासाठी सरदार फत्तेखानाला पाठवला.

यावेळी छत्रपती शिवाजी महाराज किल्ले पुरंदर वर होते. साहजिकच पुरंदरच्या आसपास लढाई होणार.

  शिरवळ परिसर स्वराज्य विस्तारासाठी सुरुवातीच्या  मोहिमां पैकी महत्त्वाचे यश होत.

ज्यावेळेस सरदार फत्तेखान छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती स्वारीस रवाना झाला त्यावेळेस त्याच्यासोबत रतन शेख , मिलिंद शेख, बाळाजी हैबतराव, फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर, मताजी घाटगे असे आदिलशाहीतील मातब्बर सरदार होते.

आदीलशाहाने केदारजी खोपडे यास ८ ऑगस्ट १६४८ रोजी फत्तेखानास मदत करण्यासाठी पत्र पाठवले होते.ते उपलब्ध आहे.

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत कावजी मल्हारी, भीमाजी वाघ, गोदाजीराजे जगताप, संभाजीराव काटे, शिवाजीराव इंगळे, भिकाजी चोर, भैरव चोर, बाजी पासलकर अशी नावे कवी परमानंद शिवभारत ग्रंथ मधून मिळतात.

आदिलशहाच्या अज्ञानुसार मोहिमेच नेतृत्व करणाऱ्या फत्तेखान व व तत्कालीन प्रचंड बलाढ्य ताकतीचे सरदार त्याच्यासोबत होतेच. त्याने स्वराज्यात आल्यावर बेलसर खळद जिंकले आणि त्याच ठिकाणी त्यांना त्यानं तळ ठोकला.

फत्तेखानाने लगेच आपला सहकारी बाळाजी हैबतराव यास शिरवळला पाठवले. हैबतराव याने ही संधी न दवडता शिरवळचा सुभानमंगल हा भुईकोट किल्ला हस्तगत केला.

 या फत्तेखानला  धडा शिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी शिरवळ घ्यायचे ठरवले .

महाराजांनी  कावजी मल्हारी याच्या नेतृत्वाखाली गोदाजी जगताप, भीमाजी वाघ, संभाजी काटे, भीकाजी चोर यांना हैबतरावार हल्ला करण्यासाठी सांगितलं. 

 हे सैन्य पहाटेच्या वेळी पुरंदरवरून शिरवळला पोहचले आणि गडावर हल्ला चढवला..

जबरदस्त प्रतिकार सहन करत  मावळ्यानी किल्ल्यात  भिंती पाडून आत प्रवेश करून कापाकापीस सुरूवात केली प्रचंड रणकंदन करत शत्रूचे जवळपास १०० ते१२५लोक मारले गेले. त्यामुळे हैबतरावच सैन्य घाबरून पळून गेलं. मराठ्यांनी गड ताब्यात घेतला.

   पुढे बेलसर येथे ही फत्तेखानाच्या सैन्याने मराठा सैन्यावर हल्ला चढवला यात बाजीनाईक जेधे यांनी शत्रुवर हल्ला चढवला आणि शत्रूचे पाच सात स्वार ठार केले व खासाचे निशाण शत्रूच्या हाती न लागू देता पुरंदर किल्ल्यावर आणले.. 

शिरवळचा पराभव फत्तेखानाच्या खूप जिव्हारी लागला .

२ऑगस्टला सन १६४८ साली छत्रपती शिवाजी महाराजांनी शिरवळ जिंकल.  

यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिरवळ विजयाची वार्ता विजापुरी दरबारी पोहचली. 

महाराजांना शिरवळचा सुभान मंगळ किल्ला आणी शिरवळ ठाण्याच्या आजूबाजूची गाव स्वराज्याला जोडली. शिरवळ परिसर स्वराज्य विस्तारासाठी सुरुवातीच्या मोहिमां पैकी महत्त्वाचे यश होत.छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला मैदानी लढाईतील विजय म्हणता येईल .


युद्धकौशल्याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे फत्तेखानावर मिळवलेला विजय...
साभार संकलन लेखन 
नितीन घाडगे.


Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

महाराज शिवाजी राजे ऑफ तंजावर साहेबांचे आज पुण्यात स्वागत व सत्कार करण्याचे संधी मिळाली. विविध इतिहास अभ्यासकांना महाराज साहेबांनी आज मोलाचे मार्गदर्शन केले.

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...