Posts

Showing posts from December, 2025

२३ डिसेंबर इ.स.१६७०*छत्रपती शिवाजी महाराजांनी अहिवंतगड जिंकला.

*आजचे ऐतिहासिक शिवदिनविशेष* *२३ डिसेंबर इ.स.१५३४* बहादुरशहाबरोबर वाटाघाटी करुन २३ डिसेंबर १५३४ ला वसई पोर्तुगिजांकडे आली. तेथील स्थानिक जनतेने प्रथम त्यांचे स्वागत केले कारण मुघली सत्तेला ते वैतागले होते. पण पोर्तुगिजांनी सक्तीचे धर्मांतर, मंदिरे उध्वस्त करून, हिन्दु पूजा व उत्सवांना बंदी सुरु केल्यानंतर तेथील जनतेने पेशव्यांपुढे आपली कैफियत मंडली आणि त्यानंतर १७३७ साली पेशव्यांनी मोहिम सुरू केली. *२३ डिसेंबर इ.स.१६७०* छत्रपती शिवाजी महाराजांनी अहिवंतगड जिंकला.१६७० मध्ये मोगलांच्या बरोबर संघर्ष सुरू झाल्यावर शिवाजी राजांनी बागलाणातील किल्ले जिंकून घेण्याचा सपाटा सुरू केला. डिसेंबर १६७० मध्ये राजांनी अहिवंतचा किल्लाही जिंकून घेतला यावेळी खानदेशचा मोगल सुभेदार दाऊदखान कमालीचा अस्वस्थ झाला. 'मराठे बर्‍हाणपूरची पेठ लुटणार आहेत', अशी बातमी शिवाजी महाराजांच्या सहकार्‍यांनी हेतुपुरस्पर पसरवली होती त्याचा परिणाम म्हणजे दाऊदखान प्रचंड फौज घेऊन बर्‍हाणपूरच्या रोखाने निघाला परंतु अजिंठ्याच्या लेण्याजवळ आल्यानंतर त्याला कळले की मराठे अहिवंतच्या रोखाने गेले आहेत. दाऊदखानाने मोठ्या शीघ्र गती...