११ जानेवारी १६८०रायगड जिल्ह्यामधील खांदेरी किल्ला बांधून पूर्ण.आज रोजी महाराजांकड़े ताब्यात आला.
⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ जानेवारी १६६६ मुघल सरदार दिलेरखानाने छत्रपती शिवरायांना जीवे मारण्याचा कट रचल्याची खबर छत्रपती शिवरायांना गुप्तहेरामार्फत मिळाली. छत्रपती शिवराय मिर्झाराजे जयसिंगाची छावणी सोडून पन्हाळ्याकडे रवाना. पन्हाळा घेण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ जानेवारी १६८० रायगड जिल्ह्यामधील खांदेरी किल्ला बांधून पूर्ण. आज रोजी महाराजांकड़े ताब्यात आला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ जानेवारी १६८८ मातबरखानाने पट्टा गड जिंकला १६८८ साली मातबरखानाने बागलाणातील अनेक गड घेण्यास सुरवात केली होती. पट्टागडा संबंधी मातबरखान औरंगजेबाकडे अर्ज पाठवतो त्यात तो म्हणतो सेवकाने काही दिवसांपासून १००० कोळी, भिल्ल, व मावळे यांचे पथक सैन्यात घेतले आहे. मराठांच्या ताब्यात असलेले पट्टा व इतर किल्ल्यालगतच्या जमीनदारांना रकमा पुरवण्यात आल्या आहेत. ११ जानेवारी १६८८ ला खानाने काही पथके किल्ला घेण्याच्या मार्गावर धाडली. मध्यरात्रीच्या सुमारास किल्ल्याच्या तटाला दोर लावून किल्ला जिंकून घेतला. भगूरचा ठाणेदार गोविंदसिंग याची किल्ल्यावर नेमणूक करण्यात आली. मोगलांन...