Posts

Showing posts from January, 2026

११ जानेवारी १६८०रायगड जिल्ह्यामधील खांदेरी किल्ला बांधून पूर्ण.आज रोजी महाराजांकड़े ताब्यात आला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ जानेवारी १६६६ मुघल सरदार दिलेरखानाने छत्रपती शिवरायांना जीवे मारण्याचा कट रचल्याची खबर छत्रपती शिवरायांना गुप्तहेरामार्फत मिळाली. छत्रपती शिवराय मिर्झाराजे जयसिंगाची छावणी सोडून पन्हाळ्याकडे रवाना. पन्हाळा घेण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला.  🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ जानेवारी १६८० रायगड जिल्ह्यामधील खांदेरी किल्ला बांधून पूर्ण. आज रोजी महाराजांकड़े ताब्यात आला. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ११ जानेवारी १६८८ मातबरखानाने पट्टा गड जिंकला १६८८ साली मातबरखानाने बागलाणातील अनेक गड घेण्यास सुरवात केली होती. पट्टागडा संबंधी मातबरखान औरंगजेबाकडे अर्ज पाठवतो त्यात तो म्हणतो सेवकाने काही दिवसांपासून १००० कोळी, भिल्ल, व मावळे यांचे पथक सैन्यात घेतले आहे. मराठांच्या ताब्यात असलेले पट्टा व इतर किल्ल्यालगतच्या जमीनदारांना रकमा पुरवण्यात आल्या आहेत. ११ जानेवारी १६८८ ला खानाने काही पथके किल्ला घेण्याच्या मार्गावर धाडली. मध्यरात्रीच्या सुमारास किल्ल्याच्या तटाला दोर लावून किल्ला जिंकून घेतला. भगूरचा ठाणेदार गोविंदसिंग याची किल्ल्यावर नेमणूक करण्यात आली. मोगलांन...

८ जानेवारी १६५८कल्याणहून छत्रपती शिवाजी महाराज स्वत: माहुलीच्या किल्ल्यावर चालून निघाले माहुली - भंडारगड - पळसगड, छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूर बादशाहाकडून आज जिंकला.

⛳ आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष ⛳ 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ८ जानेवारी १०२६ गझनिच्या मेहमुदाचे सोमनाथ मंदिरावर आक्रमण महमूद गझनिच्या हिंदुस्तानवरील १७ हल्ल्यांपैकी १६ वा आणि सर्वात भयानक असा हल्ला म्हणजे सोमनाथ मंदिरवरील हल्ला होय. सोमनाथ मंदिर त्यावेळी त्याच्या संपत्तीसाठी प्रसिद्ध होते. सोमनाथाचे शिवलिंग अनेक पाचू, हिरे, माणके यानी सजवले होते. त्यामुळे ते शिवलिंग अक्षरशः लखलखत होते. डिसें.१०२५ च्या दरम्यान महमूद गझनी सोमनाथ मंदिराजवळ पोचला. ३ दिवसानी हिंदूंचा प्रतिकार मोडून काढण्यात मुस्लिम यशस्वी ठरले आणि त्यानी मंदिरात प्रवेश केला आणि काय???? मंदिरात होते ते फ़क्ति सोमनाथाच्या नावाने घंटानाद करणारे, कोणताही प्रतिकार करू न शकणारे असे हजारो निःशस्त्र हिन्दू....!!! मग काय?? मेहमुदाने त्या सर्वांची थंड डोक्याने कत्तल केली. यावेळी सुमारे ५०००० हिंदूंची कत्तल करण्यात आली होती. तसेच त्याने शिवलिंग उपटून काढले. वैभव संपन्न असे सोमनाथ मंदिर पूर्णपणे लुटले गेले. तसेच त्यावेळी केलेल्या लुटित जवळपास ६.५ टन सोन्याचा समावेश होता एवढे ते मंदिर वैभव संपन्न होते. 🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 ८ जानेवारी १६५८ ...