आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासिक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२३ एप्रिल १६५७*
मराठ्यांनी रघुनाथ बल्लाळ अत्रे समवेत दाभोळ व आसपासची ठाणी जिंकली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२३ एप्रिल १६५७*
औरंगजेबाचे शिवाजीराजांना मेहेरबानीचे पत्र
शिर्षक वाचून कदाचित आश्चर्य वाटले असेल परंतु, असे खरेच झाले होते. मात्र त्यामागची पार्श्वभूमी व त्यानंतर काय घडले हे लक्षात घेणे अगत्याचे ठरेल.
अगदी लहान वयातच शिवाजीराजांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले व त्याद्रुष्टीने पाऊले टाकायला सुरुवात केली. हळुहळु काही प्रदेश तसेच किल्ले त्यांनी जिंकुन घेतले. इस १६३६ मधे मुघल व आदिलशहात एक महत्वाचा तह झाला होता. त्या तहानुसार जिंकलेल्या निजामशाहीतील बालाघाट प्रदेशातील बरेचसे किल्ले मुघलांकडे तर, कोकणातील किल्ले आदिलशहाकडे राहणार होते. मात्र मधल्या काही वर्षात शिवाजीराजांनी जे किल्ले कधी भेद करून तर कधी लढुन जिंकले त्यातले बरेचसे किल्ले हे त्या १६३६ च्या तहानुसार मुघलांकडे असायला हवे होते. पण प्रत्यक्षात ते आदिलशहाकडे होते व शिवाजीराजांनी ते स्वराज्यात आणले याचे कारण नेमके समजत नाही पण बादशहा शहाजहानचे दख्खनकडे झालेले दुर्लक्ष व आदिलशहाने तह न पाळणे या दोन गोष्टी संभवतात. इस १६५२-५३ मधे शहाजहानने शाहजादा औरंगजेबाला दुसर्यांदा दख्खनचा सुभेदार म्हणुन पाठवले. नोव्हेंबर १६५६ मधे विजापुरचा मोहंमद आदिलशहा वारला त्यावेळी आदिलशाहीत अंतर्गत कलह चालु होता. सत्तेवर कोणाला बसवायचा यावरून मारामारी सुरु होती. औरंगजेबचे लक्ष आदिलशाहीकडे वळाले. त्यानुसार त्याने शहाजहानच्या परवानगीने युद्ध आरंभले व आदिलशहाच्या ताब्यातील बीदरचा किल्ला जिंकला.
त्याच सुमारास शिवाजीराजांनी नगरचा मुघल अधिकारी मुल्तफतखान याला पत्र लिहिले की, 'माझ्या मागण्या मान्य होत असतील तर मी शाही फौजेत (मुघलांच्या) दाखल होयला तयार आहे' 
त्याच्याकडून अनुकूल उत्तर आल्यावर शिवाजीराजांनी औरंजेबाकडे आपले वकील सोनोपंत डबीर पाठवले व आपलै म्हणणे मांडले ते असे
"विजापुरकरांकडील जो मुलुख व किल्ले माझ्याकडे आहेत ते मलाच मिळावेत व नुकताच उत्तर कोकणचा दाभोळ बंदरावरील जो भाग मी जिंकून घेतला आहे त्यालाही औरंगजेबाने मान्यता द्यावी"
या वेळेपर्यंत 'शिवाजी' म्हणजे काय पाणी आहे हे औरंगजेबाला बहुदा नीटसे माहीत नव्हते. म्हणुनच त्याने ही वरची महाराजांची 'मागणी' मान्य केली व तसे मान्यतादर्शक व मेहेरबानीचे पत्र २३ एप्रिल १६५७ रोजी महाराजांना पाठवले त्यात तो लिहितो "......सांप्रत जे किल्ले व मुलुख (आदिलशहाचा) तुमचे हाती होते ते पेशजीप्रमाणे होऊन तुमचे मनोगतान्वये बंदर दाभोळ व त्याजखालील मुलुखाचा महसूल तुम्हास दिला असे."
म्हणजे बघा, मुलुख कोणाचा तर आदिलशहाच्या ताब्यातील , जिंकला कोणी तर शिवाजीराजांनी आणि त्याची मान्यता घेतली औरंगजेबाकडून म्हणजेच मुघलांकडुन.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२३ एप्रिल १६८३*
सुरतकर २३ एप्रिल १६८३ कळवितात की, 
"मोगलपादशाहा अद्यापि औरंगाबादेसच आहे, त्याने आपले सर्व सैन्य संभाजीराजा  यांच्या पारिपत्यार्थ पाठवले होते. परंतु ते त्याने माघारी घेतले आहे. हा एकाएकी निर्णय घेतल्याने लोकांत त्याबद्दल तर्ककुतर्क चालू आहेत... मोगलाने संभाजीराजे यांच्या विरुद्ध पाठविलेले सर्व सैन्य माघारी घेतले आहे, आणि आरमारचा बराच मोठा भाग येते परत आला असुन राहिलेला आरमार लवकरच परतेल असा म्हणतात."
वरील दिलेल्या पत्रावरुन १६८३ च्या पावसाळ्यापुर्वी औरंगजेबाची वृत्ती बरीच हताश झाली होती यात शंका नाही.त्यास जी कर्तृत्वाची घमेंड होती ती पुर्णपणे जिरली होती.त्याने दक्षिणेतील लढायांत व कारभारांत आपल्या मुलांना व सरदारांना शिवरायांच्या विरुद्ध मिळालेल्या अपयशाबद्दल जी दुषणे दिली होती त्यापेक्षाही जास्त फजिती त्याची आपल्या मुलांसमोर व सरदारांसमोर होत आहे हे पाहुन त्याचे मन साहजिकच अवमानाने त्रस्त झाले होते; आणि हि परिस्थिती संभाजीराजासारख्या एका लहान तरुण राजाने केलली पाहुन तर त्याला आपल्या मुलांच्या बाबतीतील आताताईपणाची जाणीव जशी होऊ लागली होती तशीच त्याबरोबर त्याची वृत्ती अधिकाधिक चिडखोर बनु लागली होती. हे त्याच्या विजापुर व गोवळकोंडाच्या लढायांतील हालचालींवरुन स्पष्ट होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२३ एप्रिल १६८९*
छत्रपती राजाराम महाराज हे राज्याचे स्वामी असले तरीही सदर राज्य हे फक्त स्वतःचे वा फक्त भोसले कुळाचे न मानता अवघ्या महाराष्ट्राचे मानत. व त्यांचे हे मनोगत अनेक पत्रात ही व्यक्त झाले आहे. त्यातील एकपत्र बहिर्जी नाईक घाटगे
(रायगडावरील रत्नशाळेचा हवालदार) यांना लिहलेआहे :
हे मऱ्हाठे राज्य. तुम्ही आम्ही मऱ्हाठे लोकी इनामासी खता न करिता मऱ्हाठेधर्माची दुरे धरून स्वामीकार्य करावे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२३ एप्रिल १६९४*
छत्रपती राजाराम महाराजांनी राज श.२० वैशाख शुद्ध नवमीला इ.१६९४ एप्रिल २३ काढलेले एक अभयपत्र व एक आज्ञापत्र आहे. त्यांवरून असे दिसते की, तांब्राचा(मुघलांचा) ज्या ज्या वेळी पंढरपुरास त्रास होई तेव्हा विठ्ठलाची मूर्ती पंढरपूरच्या जवळ देगांव या खेड्यात लपवून ठेवीत, पण या खेड्यास मराठा लष्कराच्या वर्दळीच्यामुळे वारंवार उपद्रव होई. तेथे मूर्ती ठेविल्या असतांना उपद्रव झाला तर देगांवच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बरे नव्हे म्हणून ही पत्रे आहेत.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२३ एप्रिल १७५२*
मोगल बादशहा आलमगीर याचे मराठ्यांस प्रथम मुखत्यारपत्र
मराठे व दिल्लीकर बादशाह यांच्यात कनोज मुक्कामी बादशाहीचे अंतर्गत तसेच बाह्य शत्रूंपासून संरक्षण मराठ्यांनी करण्यासंबंधी अहदनामा ( करार ) झाला.
या "अहदनामा" नामक तहान्वये - 
 १) अब्दालीसारखा परकीय आक्रमक असो किंवा पठाण आणि रजपूत जाट असो, सर्व शत्रूपासून या डळमळीत साम्राज्याचं रक्षण करण्याच पेशव्यांनी मान्य केल आहे पेशवे बादशहाचा गेलेला मुलुख जिंकून त्याला परत करतील. 
२) अब्दालीची हकालपट्टी करण्याकरता तीस लाख आणि इथल्या बंडखोरांच्या बदोबस्ताकरता वीस लाख असे एकूण पन्नास लाख रुपये पेशव्यांना मिळावेत. 
३) पंजाब आणि सिंधची चौथाई (यात सियालकोट, पसरूर, गुजरात आणि अब्दालीला दिलेलं औरंगाबाद) तसंच हिसार, बदाऊं, संभळ आणि मुरादाबाद हे जिल्हे पेशव्यांना देण्याचं बादशहानं मान्य केलं आहे.
४) बादशहानं पेशव्यांची अजमेरची सुभेदारी (यात नारनौलची फौजदारी येते) आणिआग्र्याची सुभेदारी (यात मथुरेची फौजदारी येते) बहाल केली आहे. पेशव्यांनी तिथवसुली करून ह्या मुलुखातल्या असलेल्या हक्कांचा उपभोग घेणे आहे. 
५) परंपरागत चालत असलेल्या चालीरीति आणि नियम सांभाळून ह्या मुलुखांचा कारभार पेशव्यांनी बघावा.
६) मोगल मनसबदारांप्रमाणे पेशव्यांच्या सरदारांनी दरबारात यावं आणि बादशहाच्या मोहिमांत भाग घ्यावा.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२३ एप्रिल १७७४*
इ.स. १७५१ व १७७२ मध्ये मराठी फौजांनी रोहिलखंडात घुसून तो उदध्वस्त केला आणि दुसऱ्या वेळी मुलूख सोडण्यासाठी पन्नास लाख रुपयांची मागणी केली. तेव्हा रोहिल्यांनी शुजाउदौल्याकडे मदतीची याचना केली. शुजाच्या मनात पूर्वीपासूनच रोहिलखंड आपल्या अयोध्या प्रांतास जोडण्याचे होते. तेव्हा रोहिले व शुजा यांमध्ये जून १७७२ मध्ये तह ठरला की शुजाने मराठ्यांस रोहिलखंडातून घालवून द्यावे व त्याबद्दल रोहिल्यांनी शुजास ४० लक्ष रुपये द्यावेत. यानंतर मराठे रोहिलखंड सोडून गेले. पुढील वर्षी म्हणजे १७७३ मध्ये मराठे पुन्हा गंगा ओलांडून रामघाटापर्यंत आले. तेव्हा सर रॉबर्ट बार्कर यासह ब्रिटिशांचे लष्कर बरोबर घेऊन शुजा रोहिल्यांच्या मदतीस गेला. तोपर्यंत मराठे परत फिरलेले होते परंतु झालेल्या पूर्वीच्या करारान्वये शुजाने रोहिल्यांकडे ठरलेली रक्कम मागितली. ती रोहिल्यांनी नाकारल्यावरून इंग्रज आणि शुजा यांनी संयुक्तपणे रोहिल्यांवर स्वारी केली. २३ एप्रिल १७७४ रोजी मीरानपुरकम (शाहजहानपुर) येथे रोहिल्यांचा पराभव झाला. या लढायांत बरेच रोहिले मारले गेले व वीस हजार रोहिल्यांना रोहिलखंड सोडावा लागला. रोहिल्यांचा पराजय झाल्यानंतर शुजाने तो प्रांत आपल्या राज्यास जोडला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२३ एप्रिल १८१७*
त्रिंबकजीची फक्त ७० माणसे मारल्याबद्दल कर्नल स्मिथ स्वतःची पाठ थोपटून घेतो.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*२३ एप्रिल १८१८*
दोनशे युरोपियन व दोनशे एतद्देशीय शिपायांसह इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल प्रॉयर याने रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास पाठविले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड,*
*सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...