पुरातन काळी वाटसुरुना अश्या प्रकारच्या पान पोया होत्या.

शिरवळ येथील ऐतिहासिक पानपोई खालीलप्रमाणे दोन फोटो 



पुरातन कालीन पाणपोई 1200 वर्षांपुर्वी  ह्या परिसरातून व ह्या घाटातून व्यापारी मार्ग होता.असं अभ्यासा अति लक्ष्यात येते.

 हा मार्ग मोठा व वर्दळीचा असणार हे ह्या पाणपोईच्या मोठ्या आकारावरुन लक्षात येते.
ही पाणपोई सध्या भग्नावस्थेकडे वाटचाल करीत आहे. स्थानिक नागरिक प्रशासन व इतिहासप्रेमींनी जतन करण्यासाठी प्रयत्न करायला हवे.

पाणपोईचे बांधकाम हे दगड उत्तमरीत्या योग्य आकारात घासून  व दगडावर दगड रचून चुना, सीमेंट ना वापरता केलेले आहे व ते आजदेखील दिसुन येत आहे .आत दोन रांजण होते बहुतेक , त्या पैकी आत्ता एकच दिसतोय.

 तसेच सगळीकडे कोणीतरी गुप्तधनाच्या आशेने उकरून ठेवले आहे.की काय असंच जाणवतय.

तिथे पहारेकरी नाही अन आजुबाजूला दारूच्या रिकाम्या बाटल्या कचरा पडलेला आहे. पूर्वीच्या काळात या ठिकाणी व्यवस्था पाहण्यासाठी पहारेकरी असावेत असा अंदाज बांधता येईल.

ही पाणपोई थोडीशी झाडीत लपलेली असल्याने पावसाळ्यात दिसत नाही.

👉पोईचा घाट

ही वास्तु स्थानिक लोकांना देखील माहित नाही किंवा नसावी?
👉कसे जाल 
 पण पुणे - सासवड- यवत मार्गे विचारत जावे व कुसेगावात स्थानिक वयस्कर व्यक्तीला विचारावे.

 घाटाच्या माथ्यावर ह्या दिवसात पानगळ झाल्याने थोडे लक्ष दिल्यास सापडू शकेल त्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

अशाच प्रकारची पाणपोई शिरवळ( सातारा रस्ता) व फलटण परिसरात आहे...
वरील दोन फोटो तेथील आहेत. अशाच महाराष्ट्रभर अनेक पाणपोयी अनेक असाव्यात. जतन संवर्धन  करण्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन. इतिहासप्रेमींनी अशा वास्तू जतन करण्याचे सहकार्य कार्य करावे.

माहिती संकलन :-नितीन घाडगे 

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...