चंद्रसेन देवांची यात्रा किल्ले वसंतगड -तळबीड 2021
कुलदैवत चंद्रसेन महाराज:-
किल्ले वसंतगडावर वरती जाण्याचे दोन मार्ग आहे. वसंतगड गावातून आणि दुसरा सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या तळबीड गावातून. गडावर जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. अंदाजे अर्धा तास चालून सर्वसामान्य माणूस किल्ल्यावर पोचतो. किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या चंद्रसेन मंदिर प्राचीन व बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असून. शेकडो वर्षापासून मंदिर प्राचीन बांधकामाचा उत्तम नमुना आहे. मंदिर सुरेख असून आत गाभाऱ्यात चंद्रसेन महाराजांची मूर्ती आहे. चैत्रातल्या दुसऱ्या पंधरवड्यात वसंतगडावर मोठी जत्रा भरते. अनेक गावात चंद्रसेन देवाची यात्र भरावली जाते. वरील फोटो मध्ये मुख्य गाभारा मध्ये असणारे प्राचीन मूर्ती आहेत. डाव्या बाजूने चंद्रसेना ची बहिण जानाई देवी असून. मध्य मुख्य भागी पाषणातील मूर्ती श्री चंद्रसेन महाराजांच्या असून. डाव्या बाजूस जोगेश्वरी देवींची मूर्ती आहे.
👉 चंद्रसेन जोगेश्वरी विवाह:-
अनादी काळापासून किल्ले वसंतगडवर असणाऱ्या चंद्रसेनदेव जोगेश्वरी देवींची यात्रेच्या दिवशी. हळदीचा कार्यक्रम. लग्नाचा विधी असतो. प्रमुख मानकर, पुजारी भक्त, सेवेकरी यांच्या हस्ते. हा सोहळा संपन्न होत आलेला आहे. हा सोहळा मुखी यात्रेदिवशी सकाळी चार पासून चालू करतात.
👉चंद्रसेन देवांची सासन काठी :-
चंद्रसेन देवाचे दूर दूर गावामध्ये भक्तमंडळी असून. आपापल्या गावी. चंद्रसेन महाराजांची मंदिरे. भक्त मंडळींनी उभारलेले आहेत. निमसोड मध्ये चंद्रसेन महाराजांची तीन मंदिरे असून निमसोड ला महाराजांची स्वतंत्र यात्रा असते. रथ उत्सव पाण्यासारखा असतो. तसेच धोंडेवाडी पळसगाव रायगाव विटा पुसेसावळी इस्लामपूर कोळ मसुराची वाडी खोदड, गुरसाळे अशा अनेक गावांमध्ये चंद्रसेन देवाची भव्य मंदिर उभारलेली आहेत. विविध गावातील भक्तमंडळी अनादी काळापासून चंद्रसेन महाराजांचे मूळ स्थान असणारे किल्ले वसंतगड येथील यात्रेला सासन काठी घेऊन जाण्याची परंपरा आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना परक्या महाभयंकर रोगामुळे यात्रा भरली नाही.
👉 किल्ले वसंतगड वरील कृष्णा-कोयना तळी भक्तांची तहान भागवतात.
मंदिराच्या पलीकडेच जुन्या राजवाड्याचे अवशेष दिसतात. या वाड्यांमध्ये छत्रपती राजाराम महाराजांचे वास्तव्य होतं असे उल्लेख मिळतात.मंदिर परिसर पाहून डाव्या बाजून मंदिराच्या बाहेरील वाटेने पुढे गेल्यास वाटेत चुन्याच्या घाणीचे अवशेष दिसतात. पुढे कोयनातळे व कृष्णातळे अशी दोन तळी आहेत. त्यांच्या काठावर जुन्या समाध्या व सतीशिळा आहेत. किल्ले वसंतगडवर जगदाळे घराण्याचे समाधी असावी. असे तर्क लागतात.चारी बाजूंनी चार डौलदार बुरूज असून त्यावर चढण्यासाठी दगडी जिनेही आहेत. गडाच्या पश्चिम भागात गोमुखी बांधणीचा दरवाजा असून ह्या दरवाज्याचे व त्याच्या तटबंदीचे बांधकाम आजही चांगल्या अवस्थेत आहे.
👉 किल्ले वसंतगड वर इतर देव-देवतांची मंदिरे :-
किल्ले वसंतगड चंद्रसेन मंदिराजवळ विठ्ठल रुक्मिणी, शंकर-पार्वती, महालक्ष्मी, गजलक्ष्मी, प्रभू रामचंद्र सीता माता, सूर्य मंदिर, नरसिंह मंदिर, हनुमंत मंदिर, गणेश मंदिर असून या ठिकाणी उत्तम प्रकारे व्यवस्था आहे.
👉 किल्ले वसंतगडावरील गोमाता :- अंदाजे तीस-पस्तीस खिल्लार जातीच्या गोमाता आहेत. कृष्णा कोयना तळ्यामध्ये बारमाही पाणी असल्यामुळे. या गाण्यांचे वास्तव्य गडावरती आहे. गडावर पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय येथील प्रशासनाने केली आहे. पाण्याची मोठी टाकी असून. तळ्यापासून मंदिरापर्यंत पाईप लाईन आहे.
👉 मंदिरासमोर असलेल्या दिपमाळा व वीरगळी, सतीशिळा प्राचीन मुर्त्या.
मंदिरासमोर असणाऱ्या दिपमाळा यात्रेच्या वेळेस प्रज्वलित करण्यात येतात. भक्तमंडळी भक्तिभावाने तेल वाहतात. दीपमाळा प्राचीन असून. थोडीशी पडझड झाली आहे. या दीपमाळ लगत मंदिराकडे तोंड करून काही वीरगळी किंवा सतीशीळा प्राचीन मुर्त्या मंदिराच्या वैभवा मध्ये भर घालत आहेत. गोल दगड किंवा एक विशिष्ट शब्द आहे त्याला भक्तमंडळी गोल दगडे उचलतात. मंदिराच्या सभामंडपामध्ये आल्यानंतर देवाकडे तोंड करून नंदी आहे. या ठिकाणी नारळ फोडण्यासाठी विशिष्ट जागा आहे.
👉 कोरूना सारख्या भयंकर लाटेमुळे मागील व या चालू 2021सालात चंद्रसेन यात्रा गडावर ठराविक भक्तमंडळी मानकरी पुजारी मोजक्या मंडळीं याच्या उपस्थितीमध्ये पार पडली. यावर्षी व्हाट्सअप द्वारे. कार्यक्रमाचे फोटो. उपलब्ध झाले. ते खाली जोडत आहे.
यावर्षी मुख्य गाभारा मधील फरशीचा जीर्णोद्धार झालेला आहे.
चंद्रसेन देवाच्या मूर्ती यात्रेदिवशी पालखी सोहळा संपन्न होण्याची परंपरा अनादी काळापासून चालत आलेली आहे. मागील वर्षापासून अगदी मोजक्या मंडळींनी पालखी सोहळा संपन्न केला. अनुभवला.
जागतिक संकट असलेला कोरोना वर विजय मिळवण्यासाठी भक्ता वरती कृपा करावी देवा. 🙏
©©लेखक :नितीन घाडगे
8888494588
Comments
Post a Comment