चऱ्होलीकर सरदार दाभाडे
चऱ्होलीकर सरदार दाभाडे
बजाजी दाभाडे पाटील तळेगाव दाभाडे यांना दोन मुले होती पहिले येसाजीराव व दुसरे सोमाजीराव होय सोमाजी बिन बजाजी दाभाडे च-होली गावच्या वतनावर आले च-होली सरदार दाभाडे घराण्यातील सोमाजीराव दाभाडे हे मूळ पुरुष होय सोमाजी दाभाडे यांना दोन मुले होती थोरले कृष्णाजी व धाकटे बाबुराव होय कृष्णाजी दाभाडे यांचा अनेक ऐतिहासिक पत्रांमध्ये उल्लेख आढळतो
छत्रपती_शाहू_महाराज शाहू महाराज १६९० पासून महाराणी येसुबाईसाहैब यांचे सोबत औरंगजेब च्या कैदेत होते. औरंगजेबच्या शेवटच्या काळात शाहू राजांना सोडवण्यासाठी ज्या मराठा सरदारांनी प्रयत्नांची शिकस्त केली त्यामध्ये सरदार कृष्णाजी दाभाडे चऱ्होलीकर ही होते.
छत्रपती शाहू महाराज यांनी सुटकेनंतर दाभाडे घरण्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविल्या होत्या स्व पराक्रमाचा जोरावर त्यांनी त्या सार्थ केल्या । शाहू महाराजांनी खंडेराव दाभाडे यांना सेनापती पदी नियुक्त केले तर कृष्णाजी दाभाडे यांना सुभेदार व सेनाबारासहश्री म्हणून नेमले . महाराणी येसूबाई यांची दिल्लीहून सुटका करण्यासाठी गेलेल्या मराठा सैन्यात कृष्णाजी दाभाडे हे सुभेलष्कर म्हणून सामील होते। सातारा व कोल्हापूर छत्रपतींमधील वारणेच्या तहात ते उपस्थित होते।
गुजरात, खान्देश, मिरज, बारामती, कोकण, दिल्ली, मधील, लढ्यात त्यांचा सहभाग होता त्यांच्या पराक्रमावर खुश होऊन शाहू छत्रपती कडून त्यांना अनेक गावची वतनदारी मिळाले होती त्यांना बारा गावांची जहागिरी होती त्यापैकी चऱ्होली हे प्रमुख वतनाचे गाव आहे
इ स 1725 मध्ये चऱ्होली येथील डोंगरावर वाघेश्वर महादेवाचे मंदिर कृष्णाजी दाभाडे यांनी बांधले
नुकतेच कृष्णाजीराव दाभाडे यांच्या तेल चित्राचा अनावरण सोहळा पार पडला हे तेल चित्र श्री सागर दाभाडे चऱ्होलीकर यांच्या प्रयत्नातून विश्वशील राजे दाभाडे सरदार यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकार विकास महाले यांनी बनविले आहे
कृष्णाजी दाभाडे यांचा कार्याचा सन्मान म्हणून चऱ्होली ग्रामस्थ च्या वतीने चऱ्होली येथील प्रमुख चौकाला "श्रीमंत सुभेदार कृष्णाजी दाभाडे सरकार" चौक असे नामकरण करण्यात आले आहे
माहिती सांभार
सरदार श्री विश्वशील साठे
दाभाडे सरकार चऱ्होलीकर🙏🚩
श्री सागर दाभाडे सरकार
Comments
Post a Comment