छत्रपती संभाजी महाराजाचा आज11मार्च छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिन...!!!







👉बालपण :-


महापराक्रमी, कर्तृत्वान माणसांच्या बाबतीत तुकाराम महाराज एका अभंगात असं म्हणतात.   न लगे चंदना सांगावा परिमळ वनस्पतिमेळ हाकारूनी अंतरीचे धावे स्वभावें बाहेरी  धरिता ही परी आवरे ना....   किल्ले पुरंदराचे भाग्य उजळले १४ मे १६५७ रोजी किल्ले पुरंदराचे जणू भाग्य उजळले आणि त्याच्या साक्षीने स्वराज्याचा वारसा पुढे नेणारा ‘संभाजी’ नामक महापराक्रमी, जगातला सर्वोत्तम पुत्र,जन्माला आला. शिवाजी महाराज आणि राणी सईबाई यांच्या आनंदाला तर पारावार उरला नाही. चंद्रकोरीप्रमाणे लहानग्या संभाजी राजांच्या लीला वाढत होत्या. पण आपल्या पुत्राची वैभवशाली कारकीर्द कर्तबगार महाराणी सईबाईंना पाहता आली नाही. 

    पुण्याजवळील कापूर होळ येथील धाराऊ गाडे पाटील यांनी संभाजी महाराजांना लहानपणी स्वतःचं दूध आई होऊन पालन केले . शिवाय राजमाता जिजाऊ यांनी सांभाळ व शिक्षण दिले. त्यांच्या सावत्र आई पुतळाबाई यांचा खूप जीव संभाजी राजा वरती होता.

👉 कोवळ्या वयात वडील छत्रपती शिवाजी महाराजांकडून  संभाजी महाराजांना राजकारणाचे धडे 

           मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेट  वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते.
            शिवाजी महाराज कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांनी सोसू नये आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना मोरोपंत पेशवे याच्या मेहुण्याच्या घरी मथुरेला ठेवले होते. ते महाराष्ट्रात पोहोचल्यानंतर काही काळाने संभाजी महाराज सुखरूपपणे स्वराज्यात येऊन पोहोचले.

👉 छत्रपती संभाजी महाराजांनी लहान वयात ग्रंथ लिहिले:-

संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण-राजनीती हा संस्कृत ग्रंथ लिहिला होता.

 बुधभुषण या ग्रंथात अतिशय सुंदर आणि अलंकारिक भाषेत आपले वडील छत्रपती शिवाााजी महाराज यांचा उल्लेख आहे :

'कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: ।

जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: ॥

अर्थ-"कलिकालरूपी भुजंग घालितो विळखा, करितो धर्माचा ऱ्हास

तारण्या वसुधा अवतरला जगत्पाल, त्या शिवप्रभूंची विजयदुंदुभी गर्जू दे खास ॥ "

याचबरोबर संभाजी महाराजांनी  नाखशिखा , यातीकाभेद, सातशतक  ग्रंथांचे लिखाण केले.


तारुण्य :-

👉शंभूराजांनी गुजरातमध्ये वयाच्या दहाव्या वर्षी पहिली लढाई केली. याची नोंद फ्रेंच पर्यटक ॲबेकॅरे याने ‘युद्धसन्मुख राजा’ अशी केली.

 शंभूराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी ‘बुधभूषण’ हा राजनीतीवर मार्गदर्शक असा जो संस्कृत ग्रंथ लिहिला त्याच्या गोष्टी सांगितल्या. त्रिचनापल्लीचा (तमिळनाडू) कावेरीचे विस्तीर्ण पात्र आणि समोरील पाषाणकोट किल्ल्यापलीकडे शत्रू दिसत नसतानाही बाणाला स्फोटके लावून जय मिळवला. देशाच्या इतिहासात पहिला तरंगता आरमारी तोफखाना, पहिला सागरी सेतू बांधणारा आणि युद्धकाळात ३० दिवसांत सैनिकांना चिलखत पुरवणारा राजा म्हणजे छत्रपती संभाजी अशा शब्दांत पेंडसे एका व्याख्यानामध्ये यांनी गौरव केला आहे.

👉त्यांची असीम बुध्दीमत्ता आणि पराक्रम पाहून गागाभट्टांनी राजेंच्या इच्छेखातर लिहलेला *समननय* हा ग्रंथ संभाजीराजेंनाच अर्पण केला होता.

 👉राजमुद्रा
*श्री शंभोः शिवजातस्य मुद्राद्यौरिव राजते !*
*यदं कसेविना लेखा वतर्ते कस्यनोपरी !*
ही राजेंची मुद्रा होती.

 👉 स्वराज्याचे चलन
संभाजीराजेंच्या कालखंडात *होन आणि शिवराई* हे चलन होते.
   
  
 👉 स्त्री-पुरुष समतेचा पहिलं पाऊल

   समतेचे पहिले पाऊल उचलणारे संभाजीराजेंचा एक निर्णय म्हणजे येसूबाईंराणीसाहेबांना त्यांनी *कुलमुखत्यार* नेमले.त्यांना शिक्केकट्यारीचे हक्क दिले.
*श्री सखी राज्ञी जयते* ही मानाची उपाधीही दिली.
विशेष म्हणजे राजे महाराणींच्या कुठल्याही न्यायनिवाड्यात हस्तक्षेप करत नसत.


👉 बंडाळी मोडून काढली:- अष्टप्रधान मंडळ  व सरदारांचे अंतर्गत बंड मोडून छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याची घडी व्यवस्थित बसवली. यामध्ये दोषी असणास कडक शिक्षेची अंमलबजावणी केली.

👉 सरसेनापती हंबीरराव मोहिते छत्रपती संभाजी महाराजांच्या पाठीशी खंबीर
 छत्रपती संभाजी महाराज त्यांचा थोरली युवराज  युवराज अभिषेक झाला होता. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महानिर्वाणानंतर तेच स्वराज्याचे धर्म सिद्ध प्रथम वारसदार होते. असं असताना सुद्धा.
 कारस्थानी मंडळींनी  अल्पवयीन छत्रपती राजाराम महाराजांना गादीवर घेऊन राज्याची सूत्रे हातात घेण्याचे स्वप्न पाहिले होते. या कटकारस्थानाला ओळखून. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी अनाजी पंत, प्रल्हाद पंत, मोरोपंत, कैद करून पन्हाळगडावर संभाजी महाराजांच्या समोर हजर केले.
 यामध्ये सख्खा भाचा असणारे छत्रपती राजाराम महाराज यांच्या पाठीशी सरसेनापती हंबीरराव मोहिते राहतील असं कटकारस्थान करणाऱ्या मंडळींना वाटले. परंतु हंबीरराव मोहिते हे खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालमीत तयार झालेले होते. स्वराज्याचे हित कुठे आहे. हे त्यांना चांगलंच ठाऊक होतं. त्यामुळे सख्या भाच्याच्या पाठीशी न राहता. छत्रपती संभाजी महाराजांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. अशा या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना मानाचा मुजरा.

 👉संभाजी महाराजांचं मंच कारोहन :-
 20 जुलै 1680 रोजी नागपंचमी दिवशी शक्ती सोळाशे दोन श्रावण शुद्ध पंचमी. या दिवशी छत्रपती  संभाजी महाराजांचे मंचकारोहन झाले.
👉 संभाजी महाराजांचा राज्याभिषेक :-
 जानेवारी 14,15,16 सण 1681. माघ  शुद्ध 7,शके 1602 रोजी संभाजी महाराजांचा विधियुक्त राज्याभिषेक झाला. ते महाराष्ट्राचे दुसरे छत्रपती झाले.

👉 छत्रपती संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर, तसेच औरंगजेब वरती दहशत बसवली.
 
बुऱ्हाणपूर पार लुटून अचानक औरंगाबाद वर धडक देणे, सोलापूर नळदुर्ग कडे धुमाकूळ घालणे * म्हणजे एकाच वेळी शत्रू स हैरान करून त्याची युद्धाची तयारी हाणून पाडणे. हे अर्थशास्त्रातील  तंत्र छत्रपती संभाजी महाराज व हंबीराव मोहिते यावेळी अवलंबलेले दिसते.




👉राज्यकारभार :-

महत्त्वकांक्षेच्या जोरावर गनिमांना पिटाळले केवळ २४ वर्षांचे असताना संभाजी महाराजांना औरंगजेब, पोर्तुगीज, सिद्दी आणि इंग्रजांसारख्या कपटी गनिमांनी घेरेले गेले होते. गनिमांकडे दांडगा अनुभव होता पण संभाजी महाराजांकडे होती महत्त्वकांक्षा! याच महत्त्वकांक्षेच्या जोरावर त्यांनी पुढे सर्वच गनिमांना सळो की पळो करून सोडले होते. 
   राज्यकारभार हाती घेतल्यानंतर १६८० ते १६८९ या नऊ वर्षांच्या कारकिर्दीत धर्मवीर संभाजी महाराज एकही लढाई हरले नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकत मराठी साम्राज्याचा दसपटीने विस्तार केला. त्यांच्या रूपाने महाराष्ट्राला सर्वोत्तम राजा मिळाला. त्या वेळी गोवा, कर्नाटक, तमिळनाडू, गुजरात, मद्रास, आंध्र प्रदेश या ठिकाणी मराठी साम्राज्य विस्तारले, असे स्पष्ट मत इतिहास अभ्यासक श्रीनिवास पेडसे यांनी व्याख्यानांमध्ये सांगितले आहे.

👉संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.


संभाजी महाराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजी महाराजांविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. तसेच त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरुद्ध उलटू शकला नाही. 


👉 छत्रपती संभाजी महाराजांचे धार्मिक धोरण:-

1) छत्रपती संभाजी महाराजांनी दिला संतजनांस राजाश्रय:

१. संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराााम महाराजयांचे पुत्र महादोबा गोसावी यांस छत्रपती संभाजी महाराजांनी वर्षासनाची नेमणूक करून दिली. (दि. १९ ऑगस्ट १६८०)

२. शिवकालातील प्रसिद्ध पाटगावचे मौनीबाबा यांच्या पालखीस भोई व वाजंत्रीची कायमची व्यवस्था लावून दिली. त्यासाठी वार्षिक १२५ होनांचे आज्ञापत्र करून दिले. (दि.१३ सप्टेंबर १६८०)

३. समर्थ रामदास स्वामींनी अंगापूरच्या डोहात मिळालेल्या राममूर्तीची चाफळ येथे स्थापना करून मंदिर उभारले. तेथील पूजेअर्चेसाठी व नैवेद्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी चैत्र शु. १ शके १५९७ रोजी सनद करून दिली. तीच पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी चालू ठेवली. तसेच चाफळच्या यात्रेस जमणाऱ्या भाविकांना लष्करातील लोकांचा अथवा मुसलमानी सैन्याचा त्रास होऊ नये व यात्रा यथासांग पार पडावी म्हणून वासुदेव बाळकृष्ण या आपल्या अधिकाऱ्यास आज्ञापत्र लिहिले. (दि. १८ ऑक्टोबर १६८०)

४. चिंचवडचे श्री मोरया गोसावी यांच्या 'माणसांस, शेतापोतांस तसेच गुरांढोरांस काडीचाही तसविज देऊ नये' यासाठी आपल्या लष्करी अधिकाऱ्यास ताकीदपत्र लिहिले. (दि. ६ नोव्हेंबर १६८०)

५. प्रचंडगडाच्या पायथ्याशी गडाच्या संरक्षणासाठी आलेल्या लोकांच्या गाई व म्हशी यांची चराई (वणी) छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच संभाजी महाराजांनी पण माफ केली (दि. ३१ मार्च १६८१)

६. श्री समर्थांनी अवतारकार्य पूर्ण केल्यावर त्यांच्या मागे सज्जनगड व चाफळ येथील धर्मादाय ऐवज, उत्सव, देवस्थानांची व्यवस्था, यात्रा, समर्थांच्या निर्वाणस्थळी हनुमानाचे देवालय उभारणे इत्यादी गोष्टींकडे जातीने लक्ष पुरविले. त्या संबंधी आपल्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी सूचना, आज्ञा, प्रसंगी ताकीद व कडक शब्दात कानउघाडणी देखील केली आहे. या संबधी एका पत्रात संभाजी महाराजांनी कऱ्हाड प्रांताचा सुभेदार रंगो विश्वनाथ यांस श्री चे कार्यास हैगै कराया तुम्हास काय गरज?... अशा स्पष्ट शब्दात खडसावले आहे.

७. चिंचवडच्या देवस्थानास आपल्या लष्कराकडून उपद्रव होतो अशी तक्रार आल्यावर छत्रपती संभाजी महाराजांनी पुणे प्रांताच्या सुभेदार व जुमलेदारांना ..जो धामधूम करील त्याला स्वामी जीवेच मारतील... अशी अत्यंत परखड शब्दात समज दिली आहे.

८. वाई प्रांताचा सुभेदार येसाजी मल्हार यास निंब येथील सदानंद गोसावींच्या मठास दरसाल नेमून दिलेला ऐवज पोचता न केल्याचे कळताच संभाजी महाराजांनी धर्मकार्यात खलेल न करणे. अशा शब्दांत ताकीद दिली आहे. व तेथील आनंदगिरी गोसावी यांना पत्र लिहून धर्माच्या कार्यास अंतर पडणार नाही... असे अभिवचन दिले आहे.






2) 👉सक्तीच्या धर्मांतराला विरोध केला.

छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांप्रमाणेच सक्तीने धर्मांतर करणाऱ्या इंग्रज, पोर्तुगीज, व मुसलमान सत्ताधीशांना कडाडून विरोध केलेला दिसतो. छत्रपती संभाजी महाराज व हेनरी ग्यारी यांच्यात इ.स. १६८४ साली झालेल्या तहातील एक कलम आहे,'That the English shall buy none of my people belonging to my dominion, to make them slaves or Christians'

👉अंत्रुज परगण्यातील अडकोळण गावचा शिलालेख:

छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठी राज्याचा अंमल गोमंतक परिसरात सुरु झाला. तेव्हापासून व्यापारी माणसांकडून घेण्यात येणारा अंगभाडे कर संभाजी महाराजांच्या आज्ञेने माफ करण्यात आला. या संबंधी फोंड्याजवळ अंत्रुज येथील हडकोळण या गावी एक शिलालेख आहे. या शिलालेखात संभाजी महाराजांनी मुख्याधिकारी मामले फोंडा धर्माजी नागनाथ यास करमाफीसंबंधी आज्ञा करताना मराठी अंमलाला उद्देशून खालील वाक्य कोरले आहे.

'...आता हे हिंदुराज्य जाहलेपासोन...पुढे या प्रमाणे सकळाहि चालवावे सहसा धर्मकृत्यास नाश करू नये करतील त्यांसी महापातक आहे...'

👉 दगाफटका फितुरी यामुळे छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले.


सरदार मुकर्रबखान याने फितूर सरदार यांच्या साथीने संगमेश्वरावर हल्ला केला. या कारवाईसाठी गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजीपूर्वक केली. मराठ्यांत आणि शत्रूच्या सैन्यात चकमक झाली. मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. प्रयत्‍नांची शर्थ करूनही मराठे शत्रूचा हल्ला परतवून लावू शकले नाहीत. शत्रूने संभाजीराजांना व त्यांच्यासोबत असलेल्या कवि कलश यांना जिवंत छत्रपती  संभाजी महाराज संगमेश्वरी पकडले.

 पकडले गेल्यानंतर  वाचवण्याचे प्रयत्न झाले नाही असे नाही.

 महाराजांना वाचवण्यासाठी प्रयत्न मावळ्यांनी केले पण ते त्यात यशस्वी झाले नाही. यात सर्वात पहिला प्रयत्न हा जोत्याजी केसरकर यांनी केला. पुढे जाऊन अप्पा शास्त्री यांनी देखील महाराजांना सोडवण्याचा प्रयत्न केला पण हे दोन्ही प्रयत्न अयशस्वी ठरले. पुढे जाऊन रायप्पा यांही बहादूरगडावर महाराजांना वाचवण्याचे धाडस केले यात त्यांना वीरमरण आले.



👉आपले छत्रपती संभाजी महाराज यांचे स्वराज्यासाठी बलिदान.

पाच लाखाची फौज घेऊन चालून आलेल्या औरंगजेबाला तुटपुंज्या ७० हजारांच्या फौजेनिशी सामोरे जात स्वराज्याचे रक्षण केले. विचार करा कुठे ती पाच लाखांची फौज आणि कुठे ते ७० हजार सैन्य! पण त्यांना आपल्या छत्रपतीवर विश्वास होता, त्यामुळे प्रत्येक जण मोघलांशी लढला आपल्या स्वराज्यासाठी आणि आपल्या छत्रपती संभाजी महाराजांसाठी! औरंगजेबाला चरफडत रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले. पण १६८९ साली स्वराज्याचा अमुल्य हिरा आपले छत्रपती संभाजी महाराज फितुरांमुळे त्यांच्या हाती लागले आणि ११ मार्च १६८९ रोजी स्वराज्य रक्षणासाठी, स्वराज्याच्या या तेजस्वी सूर्याने बलिदान दिले.
     संभाजीराजेंना टक्कर देणारा योध्दा तत्कालीन हिंदुस्थानात कोणीही नव्हता.आपल्या कारकिर्दीमध्ये मराठा साम्राज्याचा विस्तार वाढवला होता  


©®लेखन व माहिती संकलक
नितीन घाडगे.


संदर्भ ग्रन्थ :-
👉संभाजीमहाराजांविषयी इतिहास लेखन
  • ज्वलज्वलनतेजस संभाजीराजा - डॉ.सदाशिव शिवदे..
  •  छवा कादंबरी. 
  • अद्वितीय छत्रपती श्रीसंभाजी महाराज (संशोधनात्मक ग्रंथ - खंड १ ते ५) - अनंत दारवटकर
  • राजा शंभूछत्रपती - विजयराव देशमुख
  • पोर्तुगीज कागदपत्रे - डॉ.पांडुरंग पिसुर्लेकर
  • पोर्तुगीज-मराठे संबंध - डॉ.पांडुरंग पिसुर्लेकर
  • The Portuguese and The Marathas translated by P.R. Kakodkar
  • फ्रेंच-मराठा संबंध - लेखक ?
  • बिकानेर पुरालेखाभिगार - राजस्थान
  • संभाजीकालीन पत्रसार संग्रह (शा.१६०२ - शा.१६१०) : संपादक - शंकर जोशी प्रकाशक भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे) (पहिली आवृत्ती - १९४९; नवीन आवृत्ती - ऑगस्ट २०१५)
  • छत्रपती संभाजी महाराजांची पत्रे : डॉ. सदाशिव शिवदे यांच्या या पुस्तकात छत्रपती संभाजीराजांच्या ३१५ पत्रांचा परिचय करून देण्यात आला आहे.
  • बुधभूषण-राजनीती - संपादक : प्रा. रामकृष्ण आनंदराव कदम (कदंब), राजमयूर प्रकाशन, पुणे
  • शाक्तवीर संभाजी महाराज (ॲडव्होकेट अनंत दारवटकर)
  •  छत्रपती संभाजी महाराज प्रकाशन यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते (पृष्ठसंख्या ७५०, पहिली आवृत्ती १९६०,पी.पी.एच.बुक स्ट.प्रकाशन १९७१ २री-आवृती,मनोरमा प्रकाशन ३री आवृती २००१, लेखक: वा सी बेंद्रे  ( इ.स.१९१८ ते इ.स.१९५८म्हणजे सुमारे ४० वर्षे अथक मेहनत करून त्यांनी अखेर १९६० मध्ये संभाजी महाराजांचे सत्य चरित्र सर्वांसमोर आणले).
  • छत्रपती संभाजी महाराजांची राजनीती (डॉ. केदार महादेवराव फाळके)
  • छ. संभाजी स्मारक ग्रंथ - संपादन- डॉ. जयसिंगराव पवार
  • रणझुंजार : डॉ. सदाशिव शिवदे
  • शिवपुत्र संभाजी : डॉ. कमल गोखले
  • सभासद बखर, चिटणीस बखर, शेडगावकर बखर, पंतप्रतिनिधी बखर, बावडेकर अमात्यांची बखर, न्यायशास्त्री बखर इत्यादी निरनिराळ्या मराठी बखरींमध्येही संभाजीराजांसंबंधी माहिती मिळते. याशिवाय मनुचीसारख्या परकीय फिरस्त्याच्या Storio De mogor मधून सुद्धा माहिती मिळू शकते.
  • फारसी दस्तावेज -
*फुतूहाते आलमगिरी - ईश्वरदास नागर
*खुतूते शिवाजी मधील निवडक पत्रे
  • मुन्तखबुललुबाब महंमदशाही - खाफी खान
*तारीखे दिल्कुशा - भीमसेन सक्सेना
*मासिरे आलमगिरी - साकी मुस्तैदखान
*अहकामे आलमगिरी - इनायतुल्ला खान
  • मोगल दरबाराची बातमीपत्रे


  1. शापित राजहंस - (लेखक) अनंत तिबिले.
  2. पाटील, विश्वास (February 2018 16th edition). संभाजी. Pune: मेहता पब्लिशिंग हाऊस.
  3.  सरसेनापती हंबीरराव मोहिते डॉक्टर शिवदे सदाशिव.


Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...