पुण्याजवळच्या पिपळे सौदागर सारख्या आधुनिक शहरी भागात आज ही परंपारिक रूढी,परंपरा,शेती,आणि मातीची सेवा करणारे व्यवसायीक महेंद्र व महेशशेठचे वडील प्रगतशील शेतकरी कै.बाळकृष्ण झिंजुर्डे यांचा पशुसंवर्धनाचा आणि सेवेचा वारसा आणि मुलांना केलेल्या आदर्श संस्कारामुळेच आणि झिंजुर्डे बंधु नी नित्य नियमाने जपला या सेवेचे फळ म्हणूनच यंदाच्या जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या निमित्त झिंजुर्डे परीवाराच्या राजा व सोन्या या बैल जोडीला मान लाभला आहे.याचा सर्वांना अभिमान आहे.
श्री संत तुकाराम महाराजांच्या 338 व्या पालखी देहू सोहळ्याचे प्रस्थान यंदा 10 जूनला होणार असून हा सोहळा 28 जूनला पंढरपूरला दाखल होईल. येथे 19 दिवसांचा प्रवास करून पालखी सोहळा 29 जून 2023 ते 3 जुलै 2023 या कालावधीत हा पालखी सोहळा पंढरपूर येथे मुक्कामी राहील.
पालखी रथ ओडण्यासाठी बैल जोड्या कश्या निवडतात.
बैलजोडीची निवड कोण करतात?
दरवर्षी आषाढी वारीत बैलजोडीला मान असतो. हा मान आपल्याला मिळावा यासाठी अनेक मालक इच्छुक असतात. त्यात जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे अध्यक्ष, विश्वस्त आणि प्रमुखांसोबतच सात वारकरी बैलजोडीच्या निवड समितीत असतात.
बैलजोडीची निवड कशी केली जाते?
- बैलजोडी मालक शेतकरी असायला हवा.
- मालकांच्या कुटुंबियांची माहिती घेतली जाते.
- कुटुंबीय वारकरी आणि माळकरी असायला हवेत.
- वारीत सक्रिय सहभाग असायला हवा.
- बैलांच्या अनेक जाती आहेत. त्यात सोरटी, जरशी आणि खिल्लार या बैलांच्या जातीचा समावेश आहे. त्यात खिल्लार जातीच्या बैलांची निवड केली जाते.
- खिल्लार जातीचे बैल रांगडे असतात. त्यामुळे या बैलांना प्राधान्य दिलं जातं.
- वशिंडाचा आकार तपासला जातो.
- बैलाचे शिंग सारखे असायला हवेत.
- पायाला किंवा शरीराला कोणतीही दुखापत नसावी.
- साधारण कसलेल्या बैलाला प्राधान्य दिलं जातं.
- गुडघे आणि पायांना कोणत्याही प्रकारचा त्रास नसावा.
- पायाची नखं सारखी असावी.
पालखी रथाला जोडण्यासाठी सक्षम बैलजोडींचा शोध घेण्यासाठी इच्छुक बैलजोडी मालकांकडून अर्ज मागविण्यात आले होते.
यात पालखी रथाला जुंपण्यसाठी जवळपास १८ बैलजोडी मालकांचे अर्ज आले होते. तर चौघड्याच्या गाडीसाठी चार बैलजोडी मालकांनी अर्ज केले होते.
जगदगुरु संत तुकाराम महाराज आषाढी पायी वारी पालखी सोहळा 2023 निमित्त पालखी सोहळ्याच्या रथाच्या बैलजोडीचा मान पिंपळे सौदागर येथील प्रगतिशील शेतकरी "श्री. महेंद्र बाळकृष्ण झिंजुर्डे", “श्री.महेश बाळकॄष्ण झिंजुर्डे यांच्या राजा आणि सोन्या बैलजोडीला मिळाला.
गेल्या अनेक वर्षापासून ज्या दिवसाची वाट झिंजुर्डे कुटुंब पाहत होतं तो क्षण अखेर आलाय. या दोन्ही बैलांची उंची आणि त्यांचा रुबाब पाहून त्यांची निवड करण्यात आली आहे. 17 बैलजोडीपैकी दोन बैलजोडींची निवड करण्यात आलीये.
मागील तीन वर्षांपासून झिंझुर्डे कुटुंबिय अर्ज करत होते. मात्र यावर्षी त्यांना मान मिळाल्याने इच्छा पूर्ण झाल्याचं महेंद्र झिंझुर्डे म्हणाले. झिंझुर्डे यांनी सात लाखांना राजा आणि सोन्या नावाची बैलजोडी विकत घेतली होती. ही बैलजोडी कर्नाटकहून त्यांनी विकत घेतली होती. साधारण महिन्याला पाच हजार रुपये या बैलांच्या संगोपनाचा खर्च आहे.
दरम्यान आपल्या बैल जोडीला संत तुकाराम महाराजांच्या पालखीला जोडण्याचा मान मिळाल्याने साक्षात पांडुरंगाचे दर्शन झाल्याची भावना झिंजुर्डे कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात आली
पुण्याजवळच्या पिपळे सौदागर सारख्या आधुनिक शहरी भागात आज ही परंपारिक रूढी,परंपरा,शेती,आणि मातीची सेवा करणारे व्यवसायीक महेंद्र व महेशशेठचे वडील प्रगतशील शेतकरी कै.बाळकृष्ण झिंजुर्डे यांचा पशुसंवर्धनाचा आणि सेवेचा वारसा आणि मुलांना केलेल्या आदर्श संस्कारामुळेच झिंजुर्डे बंधु नी नित्य नियमाने जपला या सेवेचे फळ म्हणूनच यंदाच्या जगतगुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्या निमित्त झिंजुर्डे परीवाराच्या राजा व सोन्या या बैल जोडीला मान लाभला आहे.याचा सर्वांना अभिमान आहे.
झिंजुर्डे परिवार व पिंपळे सौदागर ग्रामस्थांच्या वतीने या बैलजोडींची पारंपरिक पद्धतीने भव्य मिरवणूक काढन्यात आली.
पंढरपूर वारीसाठी वारकऱ्यांची जय्यत तयारी सुरू आहे. ही तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी बैल जोड्यांची निवडही करण्यात आली आहे.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी राजा-सोन्या अन् सोन्या-खासदार बैलजोडीला मान.
एकूण 18 बैलजोड्यांचे अर्ज आले होते. त्यापैकी देहूतील सुरेश मोरे आणि पिंपळे सौदागरच्या महेंद्र झिंझुर्डे यांच्या बैलजोडीची निवड झाली आहे. या दोन्ही वारकरी कुटुंबाला पहिल्यांदा हा मान मिळाला आहे. दोन्ही कुटुंबियांना पहिलाच मान मिळाल्य़ाने कुटुंबियांचं स्वप्न पूर्ण झाल्याच्या भावना झिंझुर्डे आणि मोरे कुटुंबियांनी व्यक्त केल्या आहेत.
जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या ३३८ व्या पालखी सोहळ्यातील बैल जोडीचा मान देहू गावातील सुरेश दिगंबर मोरे व पिंपळे सौदागर येथील महेंद्र बाळकृष्ण झिंजुर्डे यांच्या बैल जोडीला मिळाला आहे.
चौघड्यासाठी बैल जोडीचा मान चिंबळी तालुका खेड येथील सत्यवान ज्ञानेश्वर जैद यांच्या बैल जोडीला मिळाला असल्याची माहिती जगद्गुरु संत तुकाराम महाराज संस्थानकडून प्रसिद्धी पत्राद्वारे देण्यात आली आहे.
मिरवणुकीतील व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लींक कॉपी करून youtube ला सर्च करा.
https://www.youtube.com/live/oWmjB-BBUCQ?feature=share
https://youtu.be/IftWKX-DHn0
https://youtu.be/ETUxlU2z1pU
http://nitinghadage.blogspot.com/2023/06/blog-post_84.html
लेखन :-नितीन घाडगे.
Comments
Post a Comment