वसंतगडावर असलेल्या चंद्रसेन महाराजांच्या मंदिरामुळे उजाळा मिळतो.
धार्मिकतेच्या दृष्टीने रामायणात डोकावताना प्रभू रामचंद्र, सीतामाता आणि बंधू लक्ष्मण वनवासात असताना त्यांचा वावर या शहरासह परिसरात राहिला असल्याच्या अख्यायिका सांगितल्या जातात. त्याला वसंतगडावर असलेल्या चंद्रसेन महाराजांच्या मंदिरामुळे उजाळा मिळतो. गडावरील वनराईत तपश्चर्या करीत असताना लक्ष्मणाकडील खड्ग शस्त्र नजर चुकीनं लागल्याने चंद्रसेनचे दोन्ही हात कोपरापासून तुटले.तरीहीत्या अवस्थेत तप पूर्ण करुन भगवान महादेवाचे चंद्रसेन आवतार आहेत. लक्ष्मणाने व राम देवांनी चंद्रसेनला कुलदैवत म्हणून तुझी पुजा केली जाईल असा वर दिला. त्यानुसार गडाच्या आसपासच्या काही गावांचे कुलदैवत म्हणून चंद्रसेन महाराजांची आजही तितक्याच भक्तीभावाने पूजा अर्चा केली जाते. मंदिरात सध्या असलेल्या मूर्तीच्या मुखवटा पाठीमागे असलेल्या पुरातन मुर्तीचे दोन्ही हात तुटलेल्या अवस्थेत दाखवले असून ते आजही पहायला मिळत असल्यामुळे या अख्यायिकेला दुजोरा मिळतो. अनेक घरंदाज मराठे घराणी चंद्रसेनाला आपले कुळदैवत मानतात.चंद्रसेन देवांची मूर्ती हीं रामायण काळातील आहे . जोगेश्वरी माता आणि चंद्रसेन महाराज यांचा विवाह लावण्याची प्रथा आहे. त्यामुळे, मंदिरातील चंद्रसेन महाराजांच्या मूर्तीला एक हात नाही. त्यांच्या उजव्या बाजूँस जोगेश्वरी मातेची मूर्ती आहे, तर डाव्या बाजूस जानाईदेवीची मूर्ती आहे. ही जानाईदेवी चंद्रसेन देवाची बहीण आहे, असे काहींचे मत आहे.चद्रसेन देवांची उपासना वा वारी केल्यास सर्व दुःख,बाधा दूर होतें.असा अनेकांना अनुभव आहे.
भक्तांनी चंद्रसेन देवाची मंदिरे आपआपल्या गावी बांधली आहेत. त्यात निमसोड, रायगाव, धोडवाडी, पलसगाव, कोळ, पुसेसावली, विटा, खोडद अशा अनेक गावात चंद्रसेन मंदिरे आहेत.मुळचे राष्ट्रकूट वंशज असणारे राणा राठोड याचें पुत्र कामराज यांनी घाटगे किताब मिळवत जागीर व मनसब वंशपरंपरागत मिळवली.याच कामराज राजेघाटगे यांच्या वंशज शाखा असानारे व चंद्रसेन देवाला कुळदैवत मानणारे निमसोड गावी राजेघाडगेंमंडळीनी चंद्रसेन देवांची 3मंदीरे उभारली आहेत.
@©®नितीन घाडगे 8888494588
Comments
Post a Comment