राष्ट्रकुट हे हिंदू असून शिवोपासक होते. अनेक शिवमंदिरे निर्माण केली असं उल्लेख मिळतात.
राष्ट्रकुट हे हिंदू असून शिवोपासक होते. कृष्णराजाचे कृष्णेश्वर हे कैलासलेणे हे एक शिवमंदिरच आहे. त्याव्यतिरिक्त त्यांनी अठरा शिवमंदिरे बांधल्याचा उल्लेख राष्ट्रकूटांच्या कोरीव लेखांतून येतो. वेरूळाप्रमाणेच घारापुरी येथे राष्ट्रकूट राजांनी कित्येक शिवकथा प्रसंग साकार केलेले आहेत याशिवाय इतरही अनेक शिवमंदिरे राष्ट्रकूट राजांनी बांधलेली होती.
त्यांच्या मंदिरांपैकी पहिल्या अमोघवर्षाने वसविलेल्या मान्यखेट राजधानीजवळ कागना व वेण्णीतोरा या नद्यांच्या संगमाजवळ राष्ट्रकूट काळातील एका दगडी दुर्गाचे अवशेष आढळले. आता गावही ओसाड झाला आहे. त्यात एक महादेवाचे व दुसरे जैन मंदिर आहे. जैन मंदिरात पार्श्वनाथ, महावीर आदी तीर्थंकरांच्या त्यांच्या लांछनांसह प्रमाणबद्ध मूर्ती आहेत. तिसरा कृष्ण (कार. ९३९-६७) या राजाने रामेश्वरम्पर्यंत प्रदेश पादाक्रांत करून तिथे आपला विजयस्तंभ उभारला.
रामेश्वरम्जवळ त्याने कृष्णेश्वर आणि गंडमार्तंडा ही दोन आणि कांची येथे कालप्रियाचे मंदिर बांधण्यासाठी गावे दान दिली. मार्कंडादेव येथील मार्कंडी अथवा मार्कंडेश्वर हे मंदिर गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगेच्या तीरावरील एक प्रसिद्ध शिवालय असून त्यावरच्या सुंदर शिल्पांमुळे ते विशेष उल्लेखनीय ठरले आहे. राष्ट्रकुट हे हिंदू असून शिवोपासक होते मार्कंडेश्वर मंदिरावर विपुल शिल्पांकन आहे. यांतील अर्ध्याहून अधिक मूर्ती शैव संप्रदायातील आहेत. त्यात शिव-पार्वतीसह श्रीगणेश, कार्तिकेय, भैरव इ. देव-देवता असून विष्णु-लक्ष्मी, सरस्वती, अन्नपूर्णा, विष्णुचे अवतार आणि रामायण-महाभारतातील प्रसंगांचेही शिल्पांकन आहे. याशिवाय नृत्यांगना-सुरसुंदरी तसेच दर्पणधारी, पुत्रवल्लभा, वृक्षी, शालभंजिका आणि पत्रलेखन किंवा केशरचना यांत तल्लीन असलेली अप्सरा यांचीही शिल्पे आहेत. मूर्तिसंभारात ज्यांना कामशिल्पे म्हणता येतील, अशी प्रणयी युगुले वा दंपती शिल्पे आणि नग्निका यांच्या मूर्ती आहेत. एकूण स्त्री-प्रतिमांत गतिमानता असून त्या मोहक आणि प्रमाणबद्ध आहेत. केवळ मार्कंडेश्वर मंदिराच्या मंडोवरावर तीन रांगांत सु. चारशे स्वतंत्र शिल्पे आहेत. येथील मंदिरांच्या काळाविषयी भिन्न मते असली तरी राष्ट्रकूटांची राजधानी मयुरखंडी म्हणजेच मार्कंडी असण्याचा संभव वा. वि. मिराशी व्यक्त करतात आणि राष्ट्रकूट राजा तिसरा गोविंद (कार. ७९४–८१४) याच्या कारकीर्दीत ही मंदिरे बांधली गेली असावीत, असे मत व्यक्त करतात. शिलालेखांच्या अक्षरवटिकेवरून व मूर्तीच्या किंचित स्थूल शरीरयष्टीवरून या मतास पुष्टी मिळते.
संदर्भ : 1. Altekar, A. S. Rashtrakutas and Their Times, Poona, 1967.
2. Ganguli, O. C. Goswami, A. The Art of the Rashtrakutas, Bombay, 1958.
3. Majumdar, R. C. Ed. The Age of Imperial Kanauj, Bombay, 1970.
5. Yazdani, Gulam, Ed. The Early History of the Deccan, Two Vols., London, 1960.
६. माटे, म. श्री. मराठवाड्याचे शिल्पवैभव, मुंबई, १९६४.
देशपांडे, सु. र.
Comments
Post a Comment