कदम वाडा, साप गाव (ता.कोरेगाव,जि. सातारा)

कदम वाडा, साप गाव (ता.कोरेगाव,जि. सातारा)

महाराष्ट्र म्हणजे पराक्रमी पुरुषांची, नेतृत्वाची आणि त्यातून जन्माला आलेल्या सरदारांची  भूमी. प्रसंगी दिल्लीच्या गादीला घाम फोडला तो या सरदारांनी मग त्यांनी लेच्यापेच्या सारखं का राहावं. 

त्यांनी आपला रूतबा राखला च पाहिजे, आणि तो दिसतो त्यांनी त्याकाळी बांधलेल्या वाड्यातून. मग तो वाडा भोरचा , जतच्या डफळ्यांचा, किंवा साप गावातील कदमांचा असो. हे वाडे साक्ष देतात ती मराठ्यांच्या वैभवाची, कर्तृत्वाची, सामर्थ्याची. 

साप गावात एका कडेला डौलदार उभा असणारा हा वाडा बघता क्षणी मनात भरतो.  समोर भलेमोठे बुरुज त्यात कोंदलेला अणकुचीदार टोकांचा दरवाजा त्याचा वर नगारखाना. चांगली ५ फूट रुंदीची तटबंदी आणि ६ बुरुजांनी बंधिस्त आहे हा वाडा. 

वाडा २ मजली आहे आणि त्यात लाकडावर केलेले कोरीव काम अत्यंत देखणे आहे. तटबंदीच्या आत चौकोनी टाके आणि गोल विहीर आहे. वाडा अगदी एका भुईकोट किल्ल्यासारखा आहे. मुख्य वाडा २ चौकांचा व २ मजली आहे. 

वाड्यात दुसऱ्या मजल्यावर बैठक अजून सुस्थित आहे तीवरील लाकडी खांब आणि कोरीव काम रॉयल फील देतात. मुख्य गोष्ट अशी जाणवली की मूळ वाड्याला २ भिंती आहेत. बाहेरील भिंतीच्या आत ३-४ फुटावर अजून एक भिंत आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक सरदार होते. त्यापैकी एक कदम सरदार. ऐतिहासिक साधनात फारशी माहिती नाही मिळत कदम सरदार यांच्या विषयी. पण उपलब्ध माहिती अशी की वाड्याचे सध्याचे मालक ग्वाल्हेर ला राहतात. 

महादजी बरोबर जे सरदार उत्तरेत गेले व स्थाईक झाले त्यापैकी हे कदम सरदार. यांचा मूळ पुरुष इंद्रिजी कदम शाहू महाराजांच्या काळात मराठा सैन्यात होता. १७३७ मध्ये बाजीरावांनी झिल तलावाजवळ मोगलांचा जो पराभव केला त्यात "इंद्रोजी कदम यांसी बोटास गोळी लागोन दोन बोटें उडोन गेलीं" अस उल्लेख आहे. बार्शी पानगाव हून रामराजे यांनी आणण्यासाठी जी विश्वासू मंडळी गेली होती त्यात इंद्रोजी कदम देखील होते.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४