सांगलीचा इतिहास इ. स.* *१०२४ ते इ. स.**१९७७ :-*

*सांगलीचा इतिहास इ. स.* *१०२४ ते इ. स.*
*१९७७ :-*
१०२४ :-
गोंक या शिलाहार राजाच्या ताब्यात '
मिरिच' (मिरज) व ' करहाटक' (कराड) व
दक्षिण कोंकण हा प्रांत होता. यातच
सांगलीचा भूभाग समाविष्ट होता.
१२०५ :-
शिलाहार राजा गंगादित्य याने मिरज
भागांत इसकुडी येथे तलाव बांधला.
कोल्हापूर, मिरज, शेडबाळ व तेरदाळ येथे
याबाबतचे शिलालेख आहेत.
१२५० - १३१८ :-
देवगिरीच्या यादव राजानी या भागावर
राज्य केले त्यावेळी ' मिरिच' प्रांतात तीन
हजार गांवे होती.
१३१९ - १३४७ :-
दिल्लीच्या खिलजी व
तुघलकानी या भागावर राज्य केले.
१३४८ - १४८९ :-
बहामनी सुलतानानी या भागावर राज्य
केले.
१४९० - १६५९ :-
विजापूरच्या अदिलशहाने या भागावर
राज्य केले. यावेळी मिरज प्रांत रायबाग
महालात होता.
१६५९ :-
छत्रपती शिवाजी महाराजांचा सेनापती नेताजी पालकर
याने हा भाग जिंकून घेतला. परत अदिलशहाने
हा भाग जिंकून घेतला.
१६७२ :-
पन्हाळयापासून मिरजे पर्यंतचा सर्व भाग
शिवाजी महाराजांनी जिंकला. या नंतर
मुसलमान सरदार विजापुरास निघून गेले.
तेव्हापासून या भागाची सरदारकी मिरजेचे
सरदार कदम यांच्याकडे होती.
१७३०:-
बाजीराव बल्लाळ पेशवे यांनी मिरजेचे
सरदार इंद्रोजी कदम
यांच्या पागेची फडणीशी गोविंद
हरी पटवर्धन यांना दिली.
१७३६:-
सरदार इंद्रोजी कदम हे दिल्लीवरील
मोहिमेत कामास आले. ते निपुत्रिक होते. पुणं
मुक्कामी त्याची मोठी पागा होती.
आजही या पागेला `हुजूर पागा' असे नांव
आहे.
१७४१ :-
सरदार इंद्रोजी कदम
यांच्या पागेची सरदारकी गोविंद
हरी पटवर्धन यांना देण्यात आली.
१७६१ :-
माधवराव पेशवे यांनी गोविंद हरी पटवर्धन
यांना फौजेच्या खर्चाकरिता मिरजेचा किल्ला व
आसपासची कांही ठाणी दिली.
१७६४ :-
गोविंद हरी पटवर्धन व त्यांचे पुतणे परशुराम
रामचंद्र व निळकंठ त्रिंबक यांचे नांवे आठ
हजार स्वार ठेवण्याकरिता २५ लक्ष
मुलुखाचा बहडा करुन दिला.
१७६८:-
गोविंद
हरी यांनी आपल्या वडिलंच्या स्मारकाकरिता सांगलीची सहाशे
बिघे जमीन स्वतंत्र काढून हरीपूर हे गांव
वसविले व ते गांव शंभर ब्राह्मणांना अग्न्हार
दिले. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी हे
गांव बसविण्यास मंजुरी दिली. यानंतर
हरीपूर हे क्षेत्र झाले. या टुमदार
गावाची त्यावेळची लोकसंख्या दोन हजार
होती व सांगलीची लोकसंख्या मात्र एक
हजार होती. यावेळी हरीपूर हे
सांगलीपेक्षा मोठे होते.
१७७१ :-
मिरज मुक्कामी गोविंद हरी पुत्रशोकाने
निधन पावले.
१७७३ :-
वामनराव गोविंद पटवर्धन यांच्या नांवे
मिरज प्रांताचा बेहडा झाला.
१७७६ :-
वामनराव गोविंद पटवर्धन खानदेशात
स्वारीवर असताना वरणगांव मुक्कामी निधन
पावले. यांना पुत्र संतान नव्हते. म्हणून पांडुरंग
गाविंद पटवर्धन
यांना जहागिरीचा अधिकार मिळाला.
१७७७ :-
हैदरवर स्वारी करण्यास गेले असता पराभव
पावले. हैदरने त्यांना अटक केली. अटकेतच ते
नवज्वर होऊन निधन पावले.
१७७९ :-
हरिहर पांडुरंग पटवर्धन
यांना सरदारकीची वस्त्रे मिळाली.
१७८२ :-
हरिहर पांडुरंग यांचा ज्वराने मृत्यू झाला. ते
निपुत्रिक होते.
१७८३ :-
हरिहर पांडुरंग यांचे बंधु चिंतामणराव
आप्पासाहेब
यांना मिरजेच्या सरदारकीची वस्त्रे
मिळाली तेव्हा त्याचे वय आठ वर्षाचे होते.
म्हणून त्याचे चुलते गंगाधरपंत काम पहात होते.
१७८६ :-
नाना फडणीस मिरजेस आले होते.
१७९५ :-
निजाम व पेशवे यांच्या खडर्याच्या लढाईत
पटवर्धन यानी शौर्य गाजविले म्हणून
चिंतामणराव आप्पासाहेब यांचे नावे २५
हजार ५२१ रुपयांचा नवा सरंजाम
बेहडा पेशव्यांनी करुन दिला.
१७९९ :-
दुसरे बाजीराव पेशवे यांनी मिरज
जहागिरीच्या वाटण्या करण्यास
परवानगी दिली.
१८०१ :-
सांगली हे राजधानीचे गांव झाले. म्हणजेच
श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब सांगलीस
आले. गणेशदुर्गाच्या बांधकामास प्रारंभ
केला.
१८०६ :-
सांगलीच्या श्रीगणपती मंदिराची आखणी झाली.
१८०७ :-
सांगलीच्या पेठांची आखणी व
वसाहतीला प्रारंभ झाला.
१८०८ :-
पटवर्धनांतील वाटण्या पूर्ण झाल्या व
सांगली हे जहागिरीचे गांव निश्चित झाले.
१८११ :-
गणेशदुर्गाचे काम पूर्ण झाले.
१८१८ :-
इंग्रजांनी पेशव्यांचे राज्य घेतले व सर्व
सरदारांना व
जहागीरदारांना नोकरी करण्याचा हुकूम
केला.
१८२०:-
'मी इंग्रजांची नोकरी करणार नाही' असे
सांगून पहिले चिंतामणराव पटवर्धन यांनी १
लक्ष ३८ हजार ९९५ रुपयांचा मुलूख इंग्रजांस
तोडून दिला. त्यात हुबळी, तडस, बरडोल,
बामनगट्टे हे परगणे व गोपन
गोपची सरदेशमुखी व शहापूर
तालुका असा मुलुख दिला हा करार ईस्ट
इंडिया कंपनीशी बेळगांव येथे झाला.
१८२१ :-
सांगली शिळा प्रेस
छापखान्याची स्थापना.
१८३४ :-
सांगलीत टांकसाळ सुरु करुन
नाणी पाडण्यात येऊ लागली.
१८३८ :-
धुंडीराव चिंतामणराव पटवर्धन
यांचा जन्म.१८४२दिवाणी व
फौजदारी अधिकार
असलेल्या न्यायाधिशांची सांगलीत नेमणूक
झाली. पण यावेळी कायदेकानून अस्तित्वात
नव्हते. जुन्या वहिवाटीवरुन न्यायदान होत
असे.
१८४३ :-विष्णुदास भावे यांनी सांगलीस
मराठी रंगभूमीस प्रारंभ केला.
१८४४ :-
चैत्र शुध्द
दशमीला सांगलीच्या श्रीगणपतीची प्रतिष्ठापना केली.
१८४६-१८५० :-
मिरज मळा, गणपती मळा, तात्यासाहेब
मळा, उपळावी व खरशिंग येथील
आंब्याच्या बागा लावल्या. सांगलीत
आमराई तयार केली.
१८५० :-
हरीपूर हे गांव बुधगांवकर पटवर्धनांकडे गेले.
१८५१ :-
मुन्सफ न्यायालये प्रथम स्थापन झाली. याच
साली पहिले चिंतामणराव आप्पासाहेब हे
सांगली मुक्कामी निधन पावले.
१८५३ :-
कृष्णा नदीस महापूर आला.
१८५५ :-
सांगलीत
पहिला सरकारी दवाखाना निघाला.
१८६० :-
मोठा दुष्काळ पडला.
१८६१ :-
सांगलीत सार्वजनिक शिक्षणास प्रारंभ
झाला.
१८६३ :-
मराठी शाळा व वाचनालय याची सुरुवात.
१८६४ :-
सांगली शहर सफाई कचेरी स्थापन.
१८६५ :-
सांगलीत पहिली इंग्रजी शाळा व व्याकरण
शाळा निघाली.
१८६५ :-
वेदशास्त्र शाळेची स्थापना. या वेदशास्त्र
विद्यालयात १) ऋग्वेद २) यजुर्वेद ३) न्याय ४)
व्याकरण ५) ज्योतिष हे शिक्षण देणार्या ५
पाठशाळा काढण्यात आल्या.
१८६८ :-
सांगली नगर वाचनालयाची स्थापना.
१८७२ :-
सांगली शहराचा पहिला सिटी सर्व्हे
झाला तसेच याच साली अपील कोर्ट
नेमण्यात आले.
१८७६ :-
अडमिनिस्ट्रेटर मेजर वेस्ट
यांनी सांगली म्युनिसिपालिटी स्थापन
केल्याचे जाहिर केले, याच सालात
ट्रेझरी ऑफिसर नेमण्यात आला.
यापूर्वी पथक फडणीस संस्थानचा हिशोब
पहात होता.
१८७७ :-
मोठा दुष्काळ पडला.
१८७८ :-
दुष्काळामुळे शाळा ओस पडल्या.
१८८४ :-
गणेशदुर्गमध्ये दगडी कमान बांधली.
१८८७ :-
लॉर्ड रीसाहेबांची सांगलीस भेट.
१८८७ :-
पुणे मिरज रेल्वे फाटा आला. याच
साली काकडवाडीहून 'सायफन' पध्दतीने
सांगली शहरास स्वच्छ पाणी पुरवठा सुरु
झाला.
१८८९ :-
सांगली म्युनिसिपालिटीने
आगीचा पहिला बंब खरेदी केला.
१८९१ :-
सांगली शहराची लोकसंख्या तेरा हजार
झाली याच साली मिरज - कोल्हापूर रेल्वे
लाईन सुरु झाली व पोस्ट ऑफिस सुरु झाले.
१८९२ :-
हायस्कूलला ड्राईंग क्लास जोडला.
१८९३ :-
सांगली स्टेट बँक सुरु झाली.
१८९५ :-
हायस्कूलला स्कूल फायनल क्लास जोडला.
१८९८ :-
सांगलीत पहिली प्लेगची साथ आली. २
हजार १५९ माणसे मयत झाली.
१९०१ :-
श्रीमंत धुंडिराव तात्यासाहेब निधन पावले.
याच साली सांगलीचे अँडमिनिस्ट्रेटर म्हणून
प्रथमच ब्रिटीश अधिकारी सोडून अच्युत
भास्कर देसाई यांना नेमण्यात आले. कारण
दुसरे चिंतामणराव आप्पासाहेब अज्ञान होते.
१९०२ :-
सांगलीत वेदशाळेस ज्योतिष
शास्त्राची जोड देण्यात आली.
१९०३ :-
पोलिटिकल एजंट यानी दरबार भरवून
सांगली संस्थानचे मालक श्रीमंत दुसरे
चिंतामणराव आप्पासाहेब झाले असल्याचे
जाहीर केले.
१९०४ :-
अडमिनिस्ट्रेटर देसाई यांनी संस्थानात
लोकल बोर्ड व स्कूल बोर्ड निर्माण केले व
पागा खर्च कमी केला. याच
साली सांगली पांजरपोळ
संस्थेची स्थापना झाली. कै. विष्णू रामचंद्र
राजवाडे यांनी सांगलीत
खाजगी मालकीचा पहिला चिंतामणी छापखाना सुरु
केला.
१९०५ :-
प्लेगची दुसरी साथ
आली साली अँडमिनिस्ट्रेटर कॅप्टन बर्क
यांची नेमणूक झाली. याच
साली म्युनिसिपालिटीने स्टीम रोड रोलर
खरेदी केला. हळद वायदे बाजार प्रारंभ.
१९०७ :-
मिरज - सांगली रेल्वे फाटा सुरु झाला.
१९०८ :-
श्री गजानन मिल्सची स्थापना.
१९१० :-
दुसरे चिंतामणराव आप्पासाहेब यांच्याकडे
कॅप्टन बर्क यांनी संस्थानचा कारभार
सोपविला व खर्च इंग्लंडला निघून गेले.
१९०५-१९१० :-
अँडमिनिस्ट्रेटर क्रॅप्टन बर्क
यांची कारकिर्द :- १) रयत सभा स्थापन
केली. २) शहरात व संस्थानात प्राथमिक
शिक्षण मोफत व सक्तीचे केले. ३) १९०८
साली वखारभाग स्थापून व्यापारास
उत्तेजन दिले. ४) कृष्णा नदीचे पाणी पंपाने
नळात घेऊन टाकीत साठवून त्याचा नळाने
घरोघरी पुरवठा केला. ५) संस्थानात व
शहरात शाळा व कचेर्या यांच्या सुंदर
इमारती बांधल्या. ६) सांगली शहराचे
सौंदर्य वाढविले.
१९११ :-
पेवाचे संडास बंद होऊन भंगी संडास सुरु झाले.
१९१३ :-
वॉटर वर्क्सची स्थापना. याच
साली प्लेगची चौथी साथ आली.
१९१४ :-
४ ते ६ ऑगस्ट कृष्णा नदीस महापूर आला.
शहरात तीन दिवस पाणी होते . ४ डिसेंबर
रोजी पहिली खाजगी माध्यमिक
शाळा सुरु. (सिटी हायस्कूल)
१९१६ :-
५ ऑक्टोबरला सांगली बँकेची स्थापना.
१९१७ :-
मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन
कॉलेजची स्थापना व उच्च शिक्षणास
प्रारंभ.
१९२० :-
२० फेब्रुवारीस सांगलीत ज्योतिष संमेलन
लोकमान्य टिळक यांची भेट, याच
साली लाकूड वखार भाग (टिंबर एरिया ) व
शिवाजी नगर वसाहतीस सुरवात. १२
नोव्हेंबरला महात्मा गांधींची सांगलीस भेट.
व्यापारी मोफत वाचनालय
कोनशिला गांधींनी बसविली.
१९२१ :-
सांगलीत जैन महिला आश्रमाची स्थापना.
१९२२ :-
दक्षिण संस्थांनी प्रजा परिषद चळवळ.
सांगली संस्थान प्रजापरिषद पहिले
अधिवेशन, अध्यक्ष मंगसुळी.
१९२२ :-
महात्मा गांधी यांचे सांगलीस आगमन.
१९२५ :-
मुंबई इलाक्याचे गर्व्हनर ना. सर फ्लेड्रिक
राइस यांची सांगली शहरास भेट व
नगरपालिकेतर्फे त्यांना मानपत्र समर्पण.
१९२७ :-
कॉलर्याची मोठी साथ.
१९२८ :-
सांगली नगरपालिकेच्या आयुर्वेदिक
दवाखान्यास प्रारंभ.
१९२९ :-
प्लेगची साथ.
१९२९ :-
१८ नोव्हेंबर कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाचे
उद्घाटन, हस्ते व्हाईसराय लॉर्ड आयर्विन.
१९३० :-
१७ मे राऊंड टेबल कॉन्फरन्सला चिंतामणराव
पटवर्धन यांचे प्रयाण.
१९३० :-
सांगली मेडिकल असोसिएशनची स्थापना.
१९३१ :-
बटलर कमिशन सांगलीत आले.
१९३२ :-
प्लेगची साथ
१९३३ :-
१) सांगली महिला परिषदेची स्थापना, २)
महिला शिक्षण मंडळामार्फत
मुलींच्या स्वतंत्र हायस्कूलची सुरवात, ३)
कराचीचे कार्पोरेशनचे मेअर
जमशेटजी नवरोसजी मेहता यांची नगरपालिकेस
भेट.
१९३३ :-
भाई परमानंद व डॉ मुंजे यांची सांगलीस भेट.
डॉ. आंबेडकर यांची सांगलीस भेट.
१९३४ :-
कै. रामनारायण शेठ लड्डा यांनी सांगलीत
बालाजी मिल सुरु केली.
१९३५ :-
सांगलीत बाल क्रीडा उद्यानाची सुरुवात.
१० मे सांगलीत ज्युबिली इलेक्ट्रिकल
वर्क्सच्या कामाला प्रारंभ.
१९३७ :-
सांगलीस प्रेस अँक्ट लागू
झाला याचवेळी 'दक्षिण महाराष्ट्र' व
'विजय'ही साप्ताहिके निघू लागली.
याचवेळी शहरात वीज सुरु झाली.
१९३८ :-
दक्षिण संस्थान प्रजापरिषद सांगलीत
भरली. या परिषदेस वल्लभभाई पटेल,
कमलादेवी चट्टोपाध्याय;
पट्टाभी सितारामय्या हजर होते.
१९३९ :-
लोकनियुक्त अध्यक्ष
असण्यासंबंधीची सांगली नगरपालिकेची घटना मंजूर
झाली.
१९४० :-
पंडित जवाहरलाल नेहरु यांची सांगलीस
खाजगी कामास्तव भेट.
१९४१ :-
३० सप्टेंबर सांगली बँकेचा रौप्य महोत्सव.
१९४१ :-
२ नोव्हेंबर डॉ. आंबेडकर दुसर्यांदा सांगलीत
आले. त्यांचा सांगली बारतर्फे सत्कार
झाला.
१९४२ :-
राधाकृष्ण यांची सांगलीस भेट.
१९४२ :-
च्या चळवळीतील श्रीमती अरुणा असफअली,
श्री. अच्युतराव पटवर्धन यांच्यासारखे
क्रांतीकारक सांगलीत आश्रयासाठी होते.
१९४२ :-
१४ ऑगस्ट ४२ सांगलीच्या जुन्या स्टेशन
चौकात क्रांतीकारकांविरुध्द गोळीबार.
१९४३ :-
२४ जुलै १९४३ श्री. वसंतरावदादा पाटील
यांनी तुरुंग फोडले. त्याच
दिवशी आण्णा पत्रावळे व बाबुराव जाधव
हुतात्मा झाले व
श्री वसंतरावदादा यांच्या खांद्यातून
गोळी जाऊन ते जखमी झाले.
१९४३ :-
मध्ये सांगलीत नाट्य शताब्दी महोत्सव
साजरा झाला. या महोत्सवानिमित्त
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे सांगलीत आगमन.
७ ऑगस्ट ४३ नामदार श्रीनिवास
शास्त्री यांचे सांगलीत आगमन.
१९४४ :-
११ ऑगस्ट रॅगलर र. पु. परांजपे
यांची हायकमिशनर म्हणून सांगलीस भेट, २६
सप्टेंबर ४४ रोजी पुण्याचे माजी मेजर
बाबूरावजी जगताप यांची सांगलीस भेट.
१९४४ :-
ऑगस्टमध्ये विजयसिंह
मॉन्टेसरी शाळेची स्थापना.
१९४४ :-
२ जून ४६ सांगलीस स्वातंत्र्यवीर सावरकर
यांची २२ डिसेंबर ४६ डॉ सी. व्ही. रामन
यांची सांगलीस भेट.
१९४७ :-
सांगली शहराचा पहिला मास्टर प्लॅननुसार
झाला.महाराष्ट्र एज्युकेशन
सोसायटीच्या धोंडुमामा साठॆ
यांनी सांगलीस न्यू इंजिनिअरिंग कॉलेज
स्थापन केले.( त्याचेच पुढे १९५५ मध्ये वालचंद
इंजिनिअरिंग कॉलेज असे नामकरण करण्यात
आले.)
१९४७ :-
१५ ऑगस्ट ४७ सांगलीत स्वातंत्र्योत्सव
साजरा.
१९४८ :-
७ मार्च ४८ श्रीमंत चिंतामणराव
आप्पासाहेब राजेसाहेब सांगली यांनी रुपये
३५ लाखाचा ट्रस्ट करुन
तो सांगली नगरपालिकेच्या स्वाधीन केला.
१९४८ :-
१ फेब्रुवारी महात्मा गांधी वधोत्तर
सांगलीत प्रचंड जाळपोळ.
१९४८ :-
८ मार्चला सांगली संस्थान स्वतंत्र भारतात
विलीन झाले. अँडमिनिस्ट्रेटर श्री देसाई हे
आले. सांगली ही दक्षिण
सातारा जिल्ह्याची राजधानी झाली.
१९५० :-
१५ जानेवारीस बॅ. मुकुदराव जयकर
यांची सांगलीस भेट. ३० ऑगस्टला सांगलीस
मार्केट अँक्ट लागू झाला. मिलिटरी बॉईज
होस्टेलची सांगलीत स्थापना.
प्लेगची साथ.
१९५१ :-
महात्मा गांधीच्या पुतळयाचे मुंबईचे मेयर स.
का. पाटील यांच्या हस्ते अनावरण.
१९५२ :-
सांगली नगरपरिषदेत श्री. बाळासाहेब
चव्हाण यांची चिठ्ठ्या टाकून
नगराध्यक्षपदी निवड. रिमांड
होमची स्थापना. भारताचे
सरसेनापती जनरल के. एम.
करिआप्पा यांची सांगलीस भेट.
१९५४ :-
९ जानेवारीस भारताचे उपराष्ट्रपती डॉ.
सर्वपल्ली राधाकृष्णन यांची सांगलीस भेट.
१९५५ :-
२५ मे ला अ. भा. कॉंग्रेस अध्यक्ष ढेबरभाई
यांच्या हस्ते कॉंग्रेस
भवनची कोनशीला बसविण्यात आली.
१९५६ :-
सांगलीच्या शेतकरी सहकारी साखर
कारखान्याची स्थापना.
१९५७ :-
शंकरराव देव यांचे सांगलीत आगमन.
१९५८ :-
सांगली महिला परिषदेचा रजत महोत्सव,
राज्यपाल श्रीप्रकाश अध्यक्ष म्हणून हजर.
१९५९ :-
१४ मे ला विनोबा भावे यांची सांगलीत
पदयात्रा. १३
ऑक्टोबरला श्रीमती इंदिरा गांधी यांचा अखिल
भारतीय कॉंग्रेस अध्यक्षा म्हणून सांगलीत
आगमन
१९६० :-
हि. हा. चिंतामणराव पटवर्धन कॉलेज ऑफ
कॉमर्सची स्थापना.
१९६१ :-
कृष्णा नदीस मोठा महापूर आला.
सांगली नगरपालिकेची नवीन इमारत
वापरात आली.
१९६२ :-
१. भारताचे पंतप्रधान म्हणून पंडित
जवाहरलाल नेहरु यांची सांगलीस भेट.
२. जिल्हा परिषदेची स्थापना.
यापूर्वी जिल्हा लोकल बोर्ड होते.
३. ३१ जुलै ला मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
श्री. यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते
अश्वारुढ शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे
उद्घाटन.
१९६३ :-
सांगली आकाशवाणी केंद्राची स्थापना.
नवीन सिव्हिल हॉस्पिटलच्या इमारतीचे
मुख्यमंत्री श्री कन्नमवार यांच्या हस्ते
उद्घाटन.
१९६४ :-
१ जूनला नगरपालिका प्राथ. शिक्षण
मंडळाची स्थापना.
१९६५ :-
सांगलीत सहकारी चित्रपटाची स्थापना.
२३ फेब्रुवारीस राजेसाहेब चिंतामणराव
आप्पासाहेब पटवर्धन यांचे निधन.
१९६६ :-
२३ ऑक्टोबरला सांगली बँकेचा सुवर्ण
महोत्सव.
१९६७ :-
२६ जानेवारीस श्री वसंतदादा पाटील
यांना पद्मभूषण किताबाने गौरविले गेले
शासकीय अपंग बालक संस्था स्थापना.
१९६७ :-
११ डिसेंबरला सांगलीत
भूकंपाचा मोठा धक्का.
१९६९ :-
सांगली (जिल्हा)
नगरवाचनालयाचा शतसांवत्सरिक महोत्सव.
१९६९ :-
विलिंग्डन महाविद्यालयाचा सुवर्ण
महोत्सव.
१९७० :-
जिल्हा परिषद सांगलीची नवीन अद्ययावत
इमारत बांधली.
१९७१ :-
१२ एप्रिल ७१ मिरज सांगली रेल्वे लाईन बंद
झाली.
१९७१ :-
१५ एप्रिल ७१ सांगली ब्रॉडगेज स्टेशन झाले.
१९७२-१९७३ :-
दुष्काळ.
१९७४ :-
१३ मार्च ७४ महाराष्ट्राचे राज्यपाल
अलियावर जग यांची सांगली नगरपरलिकेस
भेट.
१९७४ :-
१० ऑक्टोबर ७४ बिहारचे राज्यपाल आर.
डी. भंडारे यांची सांगली नगरपालिकेस भेट.
१९७४ :-
१७ डिसेंबर ७४ नगरपालिका नवीन
कायद्याप्रमाणे नगराध्यक्षांचा थेट
निवडणूक या पध्दतीने डॉ. देवीकुमार देसाई
यांचा प्रथम नगराध्यक्ष म्हणून निवड.
१९७६ :-
फेब्रुवारी मार्च सांगलीत
मोठी टायफाईडची साथ.
१९७६ :-
२ सप्टेंबर ७६ सांगलीचे प्रसिध्द लेखक
वि.स.खांडेकर निधन पावले. १३ नोव्हेंबर
पद्मभूषण वसंतदादा यांचा शष्ट्यब्दीपूर्त
ि समारंभ. ६ डिसेंबर क्रांतिकारक
नाना पाटील यांचे निधन.
१९७७ :-
१७ एप्रिल ७७ वसंतरावदादा महाराष्ट्र
राज्याचे मुख्यमंत्री झाले.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४