आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*१३ जून १६६५
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१३ जून १६६५*
पुरंदरची युद्धबंदी झाल्यानंतर तहासाठी राजेश्री शिवाजीराजे आणि मिर्झाराजे यांच्या गाठीभेटी झाल्या यावेळी मिर्झाराजांचा तळ पुरंदराच्या पायथ्याशी होता.
त्यानंतर राजांनी दिलेरखानाशी पुरंदर माचीवर जाऊन गाठीभेटी केल्या व औपचारिकतेचे बोलणे झाले निरोपाचे विडे दिले गेले, त्यानंतर राजे पुन्हा मिर्झाराजांकडे आले..
दि. १३ जून रोजी रात्री मिर्झाराजे व महाराज यांनी तहाचा पाच कलमी मसुदा पक्का केला त्यानुसार :
१. महाराजांकडे लहान-मोठे २३ किल्ले, त्यातील १ लाख होणा (५ लाख रुपये) वसुलासह, शाही कृपेचे प्रतिक म्हणून ठेवण्यात येतील. यापुढे महाराजांनी औरंगजेबाविरुद्ध बंडखोरी करू नये वा मोगली मुलुख लुटू नये. .
२. दख्खनच्या सुभ्यात कुठलीही शाही कामगिरी महाराजांवर सोपविल्यास ती त्यांनी पूर्ण करावी..
३. शिवाजीपुत्र संभाजीला मोगलांची पंचहजारी मनसबदारी बहाल करण्यात येईल.
त्यांच्या वतीने (शंभूराजांचे वय यावेळी फक्त आठ वर्षांचे होते.)
प्रती-शिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेतोजी पालकरास सदैव दख्खच्या सुभेदाराच्या तैनातीत राहावे लागेल..
४. विजापुरी तळ कोकणातील ४ लक्ष होनांचा मुलुख व ५ लक्ष होनांचा विजापुरी बालाघाटी मुलुख महाराजांना बहाल करून तसे फर्मान मोगल बादशहाने त्यांना द्यावे व असे फर्मान मिळाल्यास महाराजांनी मोबदल्यात ४० लक्ष होन खंडणी, सालीना ३ लक्ष होनांच्या हप्त्याने बादशहाला द्यावी..
५. तळ कोकण व बालाघाटातील निजामशाहीचे २३ किल्ले व त्याखालील ४ लक्ष होन वसुलीचा मुलुख शिवाजीकडून घेऊन मोगल साम्राज्यास जोडण्यात यावा.
हाच तो पुरंदरचा इतिहासप्रसिध्द तह...
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१३ जून १७००*
औरंगजेब स्वतः सज्जनगड बघण्यास गडावर पोचला. दख्खन स्वारीवर असलेल्या औरंगजेबाने सज्जनगड ९ जून रोजी जिंकला होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१३ जून १७५७*
राज्यपदाच्या लोभापुढे कुराणाची शपथ लटपटली. इंग्रज आपली फौज घेऊन मुर्शिदाबादेवर चाल करून गेले. सिराजउदौला आपली फौज घेऊन प्लासी येथे गेला. (१३ जून १७५७)
इंग्रजांची फौज त्यावेळी १००० युरोपियन २१०० हिंदी सैनिक आणी ९ मोठ्या तोफा इतकी होती.
याउलट सुभेदार सिराजउदौला जवळ ५०००० पायदळ १०००० घोडेस्वार आणी ५० मोठया तोफा शिवाय फ्रेंचांचा तोफखाना सोबत होता. ठरल्याप्रमाणे लढाई सुरू झाली आणी मिरजाफर बहुतेक सर्व फौज घेऊन इंग्रजांस जाऊन मिळाला. या आकस्मित आपत्तीने सुभेदार घाबरून थोड्या इमानी लोकांसोबत राजवाड्यात पळून गेला. इंग्रजांच्या पाठलागामुळे सुभेदार फकिराच्या दिन वेशात एका खिडकीतून रात्रीत पळून एका बगिच्यात लपून बसला. हि बातमी मिरजाफरला समजली. शेवटी सुभेदाराला पकडण्यात आले.जाफरचा मुलगा सीरन याने सिराजउदौलास ठार केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१३ जून १८१७*
पुणे करार
पण ८ मे १८१७ रोजी एलपीस्टन ने पुणे शहरास वेढा दिला आणि नाकेबंदी केली. मग मात्र पेशव्याने त्रिंबकजीस पकडन्यासाठी जाहीरनामे काढले आणि सिंहगड, पुरंदर, वसई हे किल्ले इंग्रजांच्या स्वाधीन केले. मग एलपीस्टनने वेढा उठवला. यावेळी इंग्रजांनी रावबाजी बरोबर एक करार केला तो पुणे करार म्हणून ओळखला जातो. या कराराद्वारे इंग्रजांनी पेशव्याच्या उरल्या सुरल्या मुसक्याही आवळल्या.
कराराची कलमे खालील प्रमाणे .
पुणे तह - १३ जून १८१७
१. वसईचा तह कायम राहील शिवाय ,
२. पेशव्याने त्रिंबकजीस गंगाधर शास्त्र्याचा खुनी म्हणून मान्य केले आणि त्यास इंग्रजांचे स्वाधीन करण्यास कबुली दिली .
३. त्रिंबकजिस अटक होईपर्यंत त्याचे कुटुंब इंग्रजांच्या ताब्यात राहील .
४.सरदार , दौलतदार यांच्या कडील अकाबारनीस कारकून , वकील यांस पेशव्याने दरबारी ठेऊ नये . काही सवाल जबाब करावयाचे असले तर ते इंग्रजां मार्फत करावे .
५.इंग्रजांशी स्नेह असलेल्या करवीर , सावंतवाडीकर पेशव्याचा काही हक्क सांगू नये .
६. रावबाजीने इंग्रजांचे ५००० स्वर , ३००० पायदळ , तोफखाना यांचा खर्च चालवून ते स्वतः पाशी ठेवावे . त्यासाठी तोडून दिलेल्या ३४ लक्ष मुलुखावर आणि किल्यावर हक्क चालवू नये .
७. अहमद नगर च्या किल्ल्या भोवतालची ४००० हात चौफेर जमीन पेशव्याने इंग्रजांस द्यावी . इंग्रजी छावणीच्या बाजूची कुरणे कही करी द्यावी .
८. इंग्रज तैनाती फौजेपेक्षा कितीही फौज पेशव्याच्या मुलुखात ठेवतील त्यास पेशव्याने हरकत घेऊ नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*१३ जून १८१८*
मालेगावचा भुईकोट ब्रिटिशांच्या ताब्यात
१३०० सैनिक व २५० बंदूकधारी घेऊन ब्रिटिश अधिकारी लेफ्टनंट मॅकडॉवल निकराने लढत होता. पण मालेगावचा भुईकोट किल्ला काही हाती येईना. त्यावेळी किल्ल्यात अरब सैनिक होते. गुप्तहेरांकरवी ब्रिटिशांनी दारूगोळा ठेवलेल्या जागेची माहिती मिळविली व तोफांनी तेथील तटबंदी उडवली. दारूगोळा जळून खाक झाला. १३ जून १८१८ मध्ये हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात आला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड*
*सह्याद्री प्रतिष्ठान,महाराष्ट्र.*
*जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री* 🚩
Comments
Post a Comment