स्वातंत्र्यासाठी क्रांतीज्योत तेवत ठेवणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांची आज जयंती त्या निमित्ताने विनम्र अभिवादन.#क्रांतिसिंहनानापाटीलजयंती #क्रांतिसिंह #स्वतंत्रलढा #प्रतिसरकार

१९४६-१९४७ पर्यंत सातारा सांगली भागातील १५०० हजार पेक्षा बहुदा जास्त गावात स्वतंत्र घोषित करून आशिया खंडातील पहिलं प्रतिसरकार स्थापन करणारे, स्वतंत्र फौज निर्माण करणारे, स्वतंत्र न्याय निवाडे, तंटे मिटवणारे, गावगुंड आणि दरोडेखोरांना , फितुरांना पकडून त्यांच्या पायामध्ये एक विशिष्ट प्रकारचा पत्रा ठोकायचे. त्यामुळे लोक या प्रति सरकारला पत्री सरकार असे म्हणू लागले.इंग्रज त्याना पकडण्यासाठी मोठं मोठी इनामे लावत.भूमिगत चळवळ निर्माण करून नांनानी प्रतिसरकारची स्थापना केली. प्रतिसरकारची स्थापना झाल्यावर ग्रामीण खेडेगावातनी इंग्रजांचं अस्तित्व नावापुरते राहिले. नाना पाटील यांनी तरुण कार्यकर्तेयांची संघटन करून स करून इंग्रजांपुढे जबरदस्त आव्हान दिल.नाना बराच काळ भूमिगत राहून प्रति सरकार चालवत होते.

 क्रांतिसिंह नाना पाटील हे छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी बिकट प्रसंगाला कसे तोंड दिलं. असं कित्येकदा भाषणामध्ये संदर्भ देऊन सांगत असत..

 एक असा प्रसंग आला..की क्रांतीसिंह नाना पाटलांच्या आईच निधन झालं...

 त्यामुळे संपूर्ण गावाला इंग्रजांनी वेडा दिला. भूमिगत असणारे क्रांतिसिंह नाना पाटील. आपल्या आईच्या अंत्यसंस्कारासाठी येथील. मग हे इंग्रज त्यांना पकडणार. त्यासाठी इंग्रजांनी संपूर्ण गावाला वेढा दिला.

 क्रांतिसिंह नाना पाटील यांना प्रति सरकार च्या हेर खात्यामार्फत दुःखद बातमी समजली.आपल्या आईचा अंत्यविधीला आपल्याला जावंच लागेल. हे इंग्रज सहजासहजी आपल्याला जाऊन देणार नाहीत.

 त्यामुळे क्रांतिसिंह नाना पाटलांनी गनिमी कावा करायचा ठरवलं.
 छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा कैदेमधून कशी सुटका करून महाराष्ट्रात आले. हा इतिहास नक्कीच नाना माहिती असणार. त्यामुळेच की काय....
 धाडसी बेत आकला...

 पावसाळ्याचे दिवस होते. गावात लाकडं नाहीत. त्यामुळे बाहेरून लाकडं आणावी लागतील. असं प्रति सरकार यांच्या कार्यकर्त्यांनी आणि संपूर्ण गावाने नियोजन केलं. ठराविक मंडळी इंग्रजांना विनंती करून लाकडं आणण्याचा बहाणा करून बाहेर पडली नानापर्यंत पोहोचले. आणि त्यांनी क्रांतीसिंह नाना पाटलांना चक्क लाकडाच्या बारदानी पोत्यामध्ये बसुवून बाजूने लाकडं लावून. अनेक पोत्यांमधून नजर चुकून क्रांतिसिंह नाना पाटील वेशांतर करून स्मशानभूमीपर्यंत पोहोचवले . आणि आईला अंत्यसंस्कार विधी पार पाडून इंग्रजांच्या वेढ्यातून बाहेर पडून सही सलामत भूमिगत झाले.

 अशा कित्येक हुलकावण्या देऊन त्यांनी इंग्रजांना सळो करून सोडलं. त्यांच्या प्रतिसरकाराला महिलांचा पण मोठा पाठिंबा होता. त्यांच्या लष्करामध्ये अनेक महिला सहभागी झाल्या होत्या आणि बंदुकी चालवन देशाचं रक्षण करण्याच धाडस करून प्रयत्न करत होत्या.

 क्रांतिसिंह नाना पाटलांनी पुढे विविध विभागांची स्थापना केली होती.
 
त्यातल्या एका दलाचे-तुफान दलाचे- फील्ड मार्शल जी.डी. लाड (बापू) आणि कॅप्टन आकाराम (दादा) पवार होते.

 या दलाची कुंडल या ठिकाणी कार्यशाळा अर्थात युद्ध शाळा होती. पाच हजारापेक्षा जास्त जेवाणाच्या दोनशे शाखा स्वतंत्र पूर्व काळात सुद्धा काम करत होत्या.

 चाकू,तलवार,कोयते,जांबिया परंपरागत हत्याराबरोबरच पिस्तूल बॉम्ब गोळे फिरण्याचे प्रशिक्षण होते.

बाजारव्यवस्था.
अन्नधान्य पुरवठा.
लोक न्यायालय.
लोकांची पिळवणूक करणाऱ्या जुलमी दरोडेखोर, सावकार, पाटील यांनासुद्धा कडक शिक्षा अशी अनेक लोक उपयोगी उपक्रम नानांनी राबवले होते.

 पत्री सरकारच्या माध्यमातून नानांनी तुफान सेना या नावाची सेना सैन्यदल स्थापना केली होती.

 ब्रिटिशांचे खजिने, हत्यारे,रेल्वे,पोस्ट अश्या सेवावर हल्ले करून इंग्रजांना नामोहरण करण्याचे तंत्र अवलंबलं होतं.

स्वातंत्र्यासाठी क्रांतीज्योत तेवत ठेवणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांची आज जयंती त्या निमित्ताने विनम्र अभिवादन.

#क्रांतिसिंहनानापाटीलजयंती #क्रांतिसिंह #स्वतंत्रलढा #प्रतिसरकार Nitin Appaso Ghadage

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४