Posts

लोकराजा श्रीमंत सयाजीराव राजेगायकवाड

Image
👉महाराजा सयाजीराव गायकवाड. 👉भारताच्या मातीमध्ये एक असा राजा जन्माला आला होता, ज्या राजाला राजेपद अनपेक्षितपणे मिळाले होते. परंतु अनपेक्षितपणे मिळालेले राजे पद कर्तुत्वाने अजरामर करणारा हा एकमेव राजा होता , त्यांचे नाव होते महाराजा सयाजीराव राजेगायकवाड. 1)सल्लागार नेमून कल्याणकारी योजना अंमलात आणल्या (१८८३). 2)न्यायव्ववस्थेत सुधारणा केल्या. 3)ग्रामपंचायतींचे पुनरुज्जीवन केले (१९०४); 4 )सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना सुरू करून (१८९३) अल्पावधीतच ती सर्व राज्यभर लागू केली (१९०६). अशा क्रांतिकारी निर्णय घेणारी राजे सयाजीराव गायकवाड यांची दूरदृष्टी मुळे बडोदा संस्थानाची कीर्ती भारतभर पसरली.  👉थोर समाज सुधारक म्हणून महाराजा सयाजीराव गायकवाड यांच नाव घ्यावाच लागत. 1पडदापद्धतिबंदी,  2बालविवाहबंदी,  3मिश्रविवाह, 4स्त्रियांचा वारसा, 5कन्याविक्रयबंदी, 6अस्पृश्यतानिवारण, 7विधवाविवाह इ. सुधारणा प्रत्यक्ष अंमलात आणल्या व तशी प्रशासनामध्ये तरतूद करून ठेवली व राबवली.  👉घटस्फोटासंबंधीचा कायदा सर्व भारतात पहिल्यांदाच त्यांनी जारी केला. 👉 (१८८२) दरम्यान हरिजनांसाठी 18 शाळा सुरु केल्या

मौजे लासुरणे तालुका इंदापुर वाघमोडे पाटील घराण्याचा ताम्रपट

Image
मौजे लासुरणे तालुका इंदापुर वाघमोडे पाटील घराण्याचा ताम्रपट

मंचर येथील पांडवकालीन बारव मधिल शिलालेख 🚩🚩🚩🚩🚩🚩

Image

राजाचे कुर्ले येथील 800वर्षा पूर्वीचा शिलालेख

Image
राजाचे कुर्ले  येथील राजे भोसले या राजवंशाची गढी. परंपरेने अक्कलकोट घराण्यात या वंशातील दत्तक घेतला जातो.  मोठ्या शिळांनी बनलेला, मातीचे मोठे भेंड वापरून केलेली तटबंदी असणारी भुईकोट किल्ला वाटावी अशी गढी बहामनी काळातील स्थापत्याच्या खुणा दाखवते.  याच गावातील श्री धाकुबाई मंदीरपरिसरात एक शीलालेखही आहे. सातारचे जिज्ञासा इतिहास संशोधन मंडळ गेल्या दोन दशकांपासून सातारा इतिहासाप्रती जनजागृतीचे कार्य करीत आहे . संस्थेच्या वतीने आजपर्यंत सातारा परीसरातील अनेक ऐतिहासीक वस्तू ,वास्तू , शिला लेखावर प्रकाशात आणून त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले आहेत . साधारण एक वर्षापूर्वी  सातारच्या प्राचीन इतिहासाच्या संकलनासाठी जिज्ञासाने  केलेल्या सर्वक्षणात संस्थेचे प्राचीन लिपी अभ्यासक धैर्यशील पवार यांना हा शिलालेख अढळला . कराडपासून 26 किलोमिटर आणि सातारपासून 34 किलोमीटरवर अंतरावर गिरीजा शंकराच्या पायथ्याला वसलेले राजाच कुर्ले नावाच  गाव आहे . या गावाच्या रचनेवरूनच ऐतिहासीक महत्व लक्षात येते .गावात इतिहास काळातील एक प्राचीन गढी आहे . ग्रामदैवत असणारे धाकूबाईच मंदिर , महादेव मंदिर , मारुती मं

उद्योग रत्न रतनजी टाटा यांना मनाचा मुजरा

Image
🙏 श्री.रतनजी टाटा यांना मानाचा मुजरा 🙏   काल कोथरूड इथे आपल्या आजारी कर्मचाऱ्याला भेटण्यासाठी चक्क आदरणीय #रतन_टाटा सर स्वतः भेटायला आले होते. कितीही मोठं आणि यशस्वी झाला तरी आपल्या भूतकाळात ज्यांनी साथ दिली त्यांना कधीच विसरू नये हाच बोध रतन टाटा यांनी आपल्या सर्वांना दिला.  यावरून माणसाची आपल्या मातीशी असलेली नाळ किती जोडली गेली आहे ते दिसून येते. फक्त पैसा असून उपयोग नाही, माणूसकी असायला हवी. खरच या साधेपणामुळे आपल्या बद्दल आदर आणखी वाढला सर. खरच तुम्हाला वंदन करावस वाटत सर.🙏 #ratantata

कागल हाऊस या नावाने प्रसिद्ध असलेल्या परिसरातील ऐतिहासिक वास्तू

Image
जवळपास एक शतकाहून अधिक वर्षापूर्वी बांधलेली आणि त्या काळात कागल हाऊस या नावाने प्रसिद्ध असलेल्या परिसरातील ऐतिहासिक अशी व सर्व सोयीनियुक्त इमारत  स्व. बापूसाहेब घाटगे महाराज यांनी त्यावेळी शासनास (जिल्हा परिषदेसाठी) दिली. इ.स. 1910 साली बापूसाहेब महाराज यांच्या अध्यक्षतेखाली बांधलेल्या या वास्तूचे आता नूतनीकरण करण्यात येणार आहे. ही बातमी आम्हाला आजच समजली. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या जनक घराण्याशी या इमारतीचे नाते ऋणानुबंधाचे आहे.  विशेष म्हणजे आज बापूसाहेब महाराज यांची जयंती आणि याच बापूसाहेब महाराजांनी बांधलेल्या या सुंदर अशा वास्तूचे जिल्हापरिषदेमार्फत नूतनीकरण करण्यात येणार असल्याची बातमी आजच समजावी, हा एक सुंदर असा योगायोगच!.

स्वराज्याचे शिलेदार सुर्यराव ​काकडे

Image
सुर्यराव ​काकडे  सुर्यराव हे,छत्रपती शिवरायांचे बालपणीचे मित्र होते. अशा अनेक नोंदी आहेत. रोहिडा व जावळी सर करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. शिवाजी महाराजानी ‘सुरराव काकडे दोन हजार हासम जावळीवर रवाना केले.’असा मोर्‍याच्या बखरीमध्ये उल्लेख आहेत. सुर्यराव यांनी गाजविलेली साल्हेरची लढाई इतिहासात प्रसिध्द आहे. शिवरायांनी १६७१ मध्ये बागलाण मोहिम काढली आणि साल्हेर जिंकून घेतला. त्या मोहिमेची वार्ता दिल्लीच्या पातशहाला मिळाली.ते एकून पातशहा कष्टी झाला,नि म्हणाला,’ काय इलाज करावा,लाख लाख घोडाचे सुभे रवाना केले ते बुडवले नामोहरम होऊन आले.आता कोण पाठवावे ‘तेव्हा पातशहाने ‘शिवाजी जोवर जिवंत तोवर दिल्ली आपण सोडीत नाही’असा विचार केला आणि इखलासखान व बहोलोलखान यांस बोलावून वीस हजार स्वारांनिशी सालेरीस रवाना केले. मग इखलासखानाने येऊन साल्हेरला वेढा घातला.हे वर्तमान जेव्हा राजांना कळले तेव्हा मोगलाईत पाठवलेले आपले सरनौबत प्रतापरावांना जासूदाकरवी कळविले ‘तुम्ही लष्कर घेऊन सालेरीस जाऊन बेलोलखानास धारून चालविणे आण कोकणातून मोरोपंत पेशव्यांनाही हशमानिशी रवाना केले.’हे इकडून येतील तुम्हीही वरघाटी कोकणातून ये