Posts

३० मार्च १६६५ रोजी...,इतिहास प्रसिद्ध असा पुरंदरचा वेढा सुरु झाला...

३० मार्च १६६५ रोजी..., इतिहास प्रसिद्ध असा पुरंदरचा वेढा सुरु झाला... मोगलांनी पुरंदर आणि रुद्रमाळ या दोन किल्ल्यांच्या मध्ये चांगलेच ठाण मांडले होते याचे नेतृत्व करत होते मिर्ज़ाराजा जयसिंग आणि दिलेरखान शिवाय मोगलांची फिरती सैन्ये ही स्वराज्यात सतत संचार करत दिसेल ते उद्ध्वस्त करत होती मोगलांनी १४ एप्रिल १६६५ साली रुद्रमाळ जिंकून घेतला त्यामुळे पुरंदर किल्ल्याचा खालचा भाग मोगलांच्या ताब्यात आला आता मोगलांनी तोफा डागण्यास सुरूवात केली आणि किल्ल्याचे पाच बुरुज हस्तगत केले मराठ्यांची शिबंदी अतिशय अडचणीत होती या युद्धाने आपल्या मुलखाचा आणि मनुष्यबळाचा नाश होत आहे हे लक्षात येताच महाराजांनी २० मे रोजी आपले वकील रघुनाथ बल्लाळ यास मिर्ज़ाराजा जयसिंगयाकडे पाठवले आणि शस्त्रसंधीची मागणी केली त्यानुसार काही अटीवर छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्ज़ाराजे जयसिंग यांची भेट झाली... छत्रपती  शिवाजी महाराज जयसिंगाच्या छावणीत येताच पुरंदरच्या पायथ्याशी वेढा देऊन बसलेल्या दिलेरखानास व कीरतसिंगास इशारा केला गेला आणि त्यांनी पुन्हा किल्ल्यावर हल्ला चढ़वला मराठे हल्ला परतवून लावण्याची शिकस्त करत होते एकामागुन एक

गावडे घराण्यातील ऐतिहासिक समाध्या

Image

वाल्हे ,ता. पुरंदर ,जि. पुणे येथून 5 कि.मी. वर असलेल्या हर्णी गावाजवळील डोंगरावर असलेले श्री हर्णेश्वराचे सुंदर मंदिर

Image

लोकराजा श्रीमंत सयाजीराव राजेगायकवाड

Image
👉महाराजा सयाजीराव गायकवाड. 👉भारताच्या मातीमध्ये एक असा राजा जन्माला आला होता, ज्या राजाला राजेपद अनपेक्षितपणे मिळाले होते. परंतु अनपेक्षितपणे मिळालेले राजे पद कर्तुत्वाने अजरामर करणारा हा एकमेव राजा होता , त्यांचे नाव होते महाराजा सयाजीराव राजेगायकवाड. 1)सल्लागार नेमून कल्याणकारी योजना अंमलात आणल्या (१८८३). 2)न्यायव्ववस्थेत सुधारणा केल्या. 3)ग्रामपंचायतींचे पुनरुज्जीवन केले (१९०४); 4 )सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाची योजना सुरू करून (१८९३) अल्पावधीतच ती सर्व राज्यभर लागू केली (१९०६). अशा क्रांतिकारी निर्णय घेणारी राजे सयाजीराव गायकवाड यांची दूरदृष्टी मुळे बडोदा संस्थानाची कीर्ती भारतभर पसरली.  👉थोर समाज सुधारक म्हणून महाराजा सयाजीराव गायकवाड यांच नाव घ्यावाच लागत. 1पडदापद्धतिबंदी,  2बालविवाहबंदी,  3मिश्रविवाह, 4स्त्रियांचा वारसा, 5कन्याविक्रयबंदी, 6अस्पृश्यतानिवारण, 7विधवाविवाह इ. सुधारणा प्रत्यक्ष अंमलात आणल्या व तशी प्रशासनामध्ये तरतूद करून ठेवली व राबवली.  👉घटस्फोटासंबंधीचा कायदा सर्व भारतात पहिल्यांदाच त्यांनी जारी केला. 👉 (१८८२) दरम्यान हरिजनांसाठी 18 शाळा सुरु केल्या

मौजे लासुरणे तालुका इंदापुर वाघमोडे पाटील घराण्याचा ताम्रपट

Image
मौजे लासुरणे तालुका इंदापुर वाघमोडे पाटील घराण्याचा ताम्रपट

मंचर येथील पांडवकालीन बारव मधिल शिलालेख 🚩🚩🚩🚩🚩🚩

Image

राजाचे कुर्ले येथील 800वर्षा पूर्वीचा शिलालेख

Image
राजाचे कुर्ले  येथील राजे भोसले या राजवंशाची गढी. परंपरेने अक्कलकोट घराण्यात या वंशातील दत्तक घेतला जातो.  मोठ्या शिळांनी बनलेला, मातीचे मोठे भेंड वापरून केलेली तटबंदी असणारी भुईकोट किल्ला वाटावी अशी गढी बहामनी काळातील स्थापत्याच्या खुणा दाखवते.  याच गावातील श्री धाकुबाई मंदीरपरिसरात एक शीलालेखही आहे. सातारचे जिज्ञासा इतिहास संशोधन मंडळ गेल्या दोन दशकांपासून सातारा इतिहासाप्रती जनजागृतीचे कार्य करीत आहे . संस्थेच्या वतीने आजपर्यंत सातारा परीसरातील अनेक ऐतिहासीक वस्तू ,वास्तू , शिला लेखावर प्रकाशात आणून त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले आहेत . साधारण एक वर्षापूर्वी  सातारच्या प्राचीन इतिहासाच्या संकलनासाठी जिज्ञासाने  केलेल्या सर्वक्षणात संस्थेचे प्राचीन लिपी अभ्यासक धैर्यशील पवार यांना हा शिलालेख अढळला . कराडपासून 26 किलोमिटर आणि सातारपासून 34 किलोमीटरवर अंतरावर गिरीजा शंकराच्या पायथ्याला वसलेले राजाच कुर्ले नावाच  गाव आहे . या गावाच्या रचनेवरूनच ऐतिहासीक महत्व लक्षात येते .गावात इतिहास काळातील एक प्राचीन गढी आहे . ग्रामदैवत असणारे धाकूबाईच मंदिर , महादेव मंदिर , मारुती मं