३० मार्च १६६५ रोजी...,इतिहास प्रसिद्ध असा पुरंदरचा वेढा सुरु झाला...
३० मार्च १६६५ रोजी...,
इतिहास प्रसिद्ध असा पुरंदरचा वेढा सुरु झाला...
मोगलांनी पुरंदर आणि रुद्रमाळ या दोन किल्ल्यांच्या मध्ये चांगलेच ठाण मांडले होते याचे नेतृत्व करत होते मिर्ज़ाराजा जयसिंग आणि दिलेरखान शिवाय मोगलांची फिरती सैन्ये ही स्वराज्यात सतत संचार करत दिसेल ते उद्ध्वस्त करत होती मोगलांनी १४ एप्रिल १६६५ साली रुद्रमाळ जिंकून घेतला त्यामुळे पुरंदर किल्ल्याचा खालचा भाग मोगलांच्या ताब्यात आला आता मोगलांनी तोफा डागण्यास सुरूवात केली आणि किल्ल्याचे पाच बुरुज हस्तगत केले मराठ्यांची शिबंदी अतिशय अडचणीत होती या युद्धाने आपल्या मुलखाचा आणि मनुष्यबळाचा नाश होत आहे हे लक्षात येताच महाराजांनी २० मे रोजी आपले वकील रघुनाथ बल्लाळ यास मिर्ज़ाराजा जयसिंगयाकडे पाठवले आणि शस्त्रसंधीची मागणी केली त्यानुसार काही अटीवर छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्ज़ाराजे जयसिंग यांची भेट झाली...
छत्रपती शिवाजी महाराज जयसिंगाच्या छावणीत येताच पुरंदरच्या पायथ्याशी वेढा देऊन बसलेल्या दिलेरखानास व कीरतसिंगास इशारा केला गेला आणि त्यांनी पुन्हा किल्ल्यावर हल्ला चढ़वला मराठे हल्ला परतवून लावण्याची शिकस्त करत होते एकामागुन एक मराठे ठार होत होते छत्रपती शिवाजी महाराज आणि जयसिंग हे पाहत होते शेवटी पुरंदरच्या लोकांची कत्तल करू नका, किल्ला खाली करू असा योग्य विचार करत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले काही लोक मोगल अधिकारी गाजी बेग या मोगल अधिकार्याबरोबर पुरंदर किल्ल्याकडे पाठवले तेंव्हा हे युद्ध थांबले पुरंदरवर त्यावेळी एकंदर ७००० माणसे होती त्या सर्वांची कत्तल महाराजांच्या या योग्य निर्णयामुळे टळली...
छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्जाराजे जयसिंग यांची भेट झालेली इतिहासात नोंद असलेली तारीख आहे ११ जून १६६५...
Comments
Post a Comment