निमसोड च्या ऐतिहासिक शिळा-शिल्पे,विरगळ, घुमट समाध्या, बारव, कोळेकर महाराजांच्या मठात संजीवन समाधी.
शिळा-शिल्पे,विरगळ, घुमट समाध्या, कोळेकर महाराजांची संजीवन समाधी व मठ, बारव 👉वीरगळ एखादा शूर योद्धा युद्धात मृत झाला तर त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ शिळा किंवा स्तंभ उभारले जातात ज्याला "वीरगळ" म्हणतात. साधारणतः तीन टप्प्यांत याची विभागणी केली जाते. सर्वात खालच्या भागात योद्धा शत्रूशी लढताना दाखवतात.(मोठ्या युद्धासाठी हत्ती,अंबारी,घोडे दाखवले जातात. पशुधन रक्षणासाठी युद्ध झाले असेल तर योद्ध्यापाठी पशु दाखवले जातात. काहीवेळा हिंस्र श्वापदांशी लढणारा योद्धा देखील दाखवला जातो.) त्याच्या वरच्या टप्प्यात शहीद योद्धा अप्सरांसह स्वर्गाकडे सहगमन करत असतो. तर सर्वात वरच्या भागात योद्धा स्वर्गात त्याच्या पुरोहितासोबत शिवलिंगाचे पुजन करताना दिसतो. वीर ज्या संप्रदायाचा असेल त्या देवतेची मुर्ती सर्वात वरच्या टप्प्यावर असते. यात प्रामुख्याने शिवलिंग, विष्णु, गणपती, देवी तर काही ठिकाणी जैन तिर्थंकर सुद्धा असतात. क्वचीत वीरगळींवर शिलालेखही कोरलेले असतात. वीरगळींचे गोधन वीरगळ, आत्मबलिदान निदर्शक वीरगळ असे अनेक प्रकार आहेत. अशा वीरगळ