निमसोड च्या ऐतिहासिक शिळा-शिल्पे,विरगळ, घुमट समाध्या, बारव, कोळेकर महाराजांच्या मठात संजीवन समाधी.
शिळा-शिल्पे,विरगळ, घुमट समाध्या, कोळेकर महाराजांची संजीवन समाधी व मठ, बारव
👉वीरगळ
एखादा शूर योद्धा युद्धात मृत झाला तर त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ शिळा किंवा स्तंभ उभारले जातात ज्याला "वीरगळ" म्हणतात. साधारणतः तीन टप्प्यांत याची विभागणी केली जाते. सर्वात खालच्या भागात योद्धा शत्रूशी लढताना दाखवतात.(मोठ्या युद्धासाठी हत्ती,अंबारी,घोडे दाखवले जातात. पशुधन रक्षणासाठी युद्ध झाले असेल तर योद्ध्यापाठी पशु दाखवले जातात. काहीवेळा हिंस्र श्वापदांशी लढणारा योद्धा देखील दाखवला जातो.) त्याच्या वरच्या टप्प्यात शहीद योद्धा अप्सरांसह स्वर्गाकडे सहगमन करत असतो. तर सर्वात वरच्या भागात योद्धा स्वर्गात त्याच्या पुरोहितासोबत शिवलिंगाचे पुजन करताना दिसतो. वीर ज्या संप्रदायाचा असेल त्या देवतेची मुर्ती सर्वात वरच्या टप्प्यावर असते. यात प्रामुख्याने शिवलिंग, विष्णु, गणपती, देवी तर काही ठिकाणी जैन तिर्थंकर सुद्धा असतात. क्वचीत वीरगळींवर शिलालेखही कोरलेले असतात. वीरगळींचे गोधन वीरगळ, आत्मबलिदान निदर्शक वीरगळ असे अनेक प्रकार आहेत.
अशा वीरगळ निमसोड मध्ये महालक्ष्मी मंदिर, मारुती मंदिर, चंद्रसेन मंदिर, गावातील जोतिबा मंदिर सिद्धनाथ मंदिर. महादेव मंदिर इथे पहायला मिळतील.
👉सतीशिळा
पतीच्या निधनानंतर जर पतिव्रता स्त्री सती गेली तर तिच्या पवित्र स्मृतीप्रीत्यर्थ जी शिळा उभारली जाते तिला सतीशिळा म्हणतात. या सतीशिळेवर कोपरापासून काटकोनात दुमडलेला बांगड्या भरलेला हात असतो. त्या कोनात दोन स्त्रिया नमस्कार मुद्रेत बसलेल्या असतात.
👉नागशिळा
अनेक अभ्यासकांच्या मते महाराष्ट्र ही प्राचिन नागभुमी आहे. आजही अनेक ठिकाणी नागपूजा केली जाते. निमसोड मध्ये घाडगे आणि कंपनी एजन्सी समोर असणारी ही नागशिळा तशी अलिकडच्या काळातील आहे. गावकऱ्यांकडून नागपंचमीला नागाची पूजा याच ठिकाणी केली जाते.यालाच आपन नागोबा चा कट्टा असे म्हणत असतो.
👉विष्णुशिल्प
ह्या शिल्पातील विष्णुने हातांत शंख,चक्र आणि दंड (गदा ?) घेतलेले आहे तर एका हाताने काखेत महालक्ष्मीला उचलले आहे. विष्णुच्या उजव्या बाजूला गरुड तर डाव्या बाजूला हनुमान प्रार्थना मुद्रेत आहेत.
👉 महिषासुर मर्दिनी
👉गजलक्ष्मी_शिल्प
महालक्ष्मी मंदिरात हे गजलक्ष्मी शिल्प आहे. संपन्नतेचे प्रतिक म्हणून या शिल्पाकडे पाहिले जाते. दोन्ही बाजूला असलेले दोन हत्ती लक्ष्मीवर सोंड उंचावून कुंभातून अभिषेक करत आहेत. मधे दोन्ही हातात कमळ पुष्प घेतलेली लक्ष्मी पद्मासनात बसलेली आहे. मारूती मंदिरा शेजारी आहे .
निमसोड ता. खटाव जिल्हा सातारा ही प्राचिन नगरी आहे. मुख्य वसाहत असल्या कारणाने इथे नक्कीच अनेक युद्धं झाली असणार. त्याचेच प्रतिक म्हणून निमसोड मध्येही अशा अनेक वीरगळी आणि सतीशिळा पहायला मिळतात. पण सध्या या स्मृतीशिळांची अवस्था दयनीय झाली आहे. शिळा व त्या शूरांचा इतिहास धूळखात पडला आहे. ९५% गावकऱ्यांनी किंवा
मंदिरात जाणाऱ्या व्यक्तींनी कधीच ही शिल्प लक्षपूर्वक पाहिली नसतील हि एक मोठी शोकांतिका आहे.
वीरगळी जतन करून एक आदर्श निर्माण करु शकतो.
👉घुमट समाध्या
निमसोड नगरीमध्ये साधारण चार ते पाच घुमटाकृती समाध्या आहेत. याचा कालखंड कोणता याचा शोध घेणे महत्त्वाचा आहे. पश्चिम घाडगेमळा गावाकडे जात असताना दोन घुमट समाध्या आहेत.
भूषणगड रोड बडेखान मळा रोड लगत दोन मोठ्या घुमटाकृती समाध्या आहेत.
महावितरण कार्यालय निमसोड लगत दोन छोट्या समाध्या पहावयास मिळतात.
👉 कोळेकर महाराजांची संजीवन समाधी व मठ निमसोड.
👉 निमसोड हद्दीतील असलेले शिवकालीन बारव:-
✍️ ©®नितीन घाडगे
8888494588
खुप छान
ReplyDeleteधन्यवाद
Delete