राणी कि वाव

राणी कि वाव : अहमदाबाद पासून जवळपास १२५ कि.मी. पाटण या प्राचीन सोळंकी राजवंशाची राजधानी असलेल्या ठिकाणी असलेली हि विहीर जी आपल्या अतिशय सुंदर, घडीव आणि अप्रतिम शिल्पकलेने भारतातील सर्व विहिरींची राणी असा बिरुद मिरवते ती हि राणी कि वाव (विहीर). 
हा प्राचीन खजिना केवळ एका अवचित आलेल्या सरस्वती नदीच्या पुराने, पूर्ण विहीर गाळाने भरून गेल्यामुळे मुस्लिम आक्रमकांच्या तावडीतुन सुटला त्यामुळेच आज आपल्याला येथे असलेल्या सगळ्यामूर्ती या अखंडित स्वरूपात बघायला मिळतात, भगवान विष्णूच्या १२ अवतारांचे, अप्सरांचे, तात्कालिक समाजजीवनाचे अतिशय कलापूर्ण शिल्पांच्या स्वरूपात आपणास बघायला मिळते. आजही त्या काळातील भारतीय शिल्पकलेने केलेली प्रगती बघून आश्चर्यचकित व्हायला होते, हि शिल्पकला इसवी सन  पूर्वी भगवान गौतम बुद्धाच्याहि अगोदर चालू झाली आणि मग १२-१३ शतकापर्यंत आपल्या अत्तुच्य शिखरावर पोचून मुस्लिम आक्रमणानंतर नष्ट झाली. त्यानंतर शिवकाळातील आणि पेशवाई मध्ये निर्माण झालेली मंदिरे हि शिल्पकलेच्या दृष्टीने वाकाटक, शालिवाहनकालिन, चालुक्य कालीन, यादवकालीन मंदिरांपेक्षा खूपच खुजी वाटतात. आपल्यामध्ये इतिहासाबद्दल एवढी अनास्था आहे कि चांगले पदवीधर लोक ही मग चालुक्यकालीन आणि शालिवाहनकालिन  मंदिरांना पण हेमाडपंती म्हणून मोकळे होतात जेंव्हा कि हेमाडपंत हा यादव राजघराण्याचा प्रधान मंत्री होता आणि यादव घराणे हे खूपच नंतर आले. अशी हि आपली मंदिरे, लेणी ज्या निसर्गाच्या कोपापासून आणि आक्रमकांच्या विध्वंसापासून, काळाच्या तडाख्यातुन बचावली आहेत ती मंदिरे इतिहासाबद्दलच्या अनास्थेमुळे जर्जर अवस्थेत आहेत, बऱ्याच प्राचीन लेणी मध्ये प्रेमवीर आपली नावे कोरून ठेवतात, प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार करतोय असे म्हणत टाईल्स लावून मोकळे होतात.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४