राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब
👉जिजाऊंचा करारी स्वभाव –
जाधव आणि भोसले या दोन्ही घराण्यांत एका प्रसंगावरून वैर निर्माण झाले होते.
या अशा अवघड प्रसंगानंतर, जिजाऊंनी आपल्या माहेरचे संबंध तोडले. सर्व नात्यांना बाजूला सारत कर्तव्य हाच आपला धर्म समजून शिवाजी राजांना योग्य प्रकारे वाढवण्यास सहयोग दिला.
हा असा प्रसंग कुठल्याही स्त्रीसाठी जीवन हेलावून ठेवणारा ठरला असता परंतु जिजाऊंनी आपल्या करारी आणि एकनिष्ठ स्वभावाने त्यावर मात केली.
👉कौटुंबिक कर्तव्ये आणि राज्यकारभार –
शिवाजी राजांना कसे घडवायचे याचे संपूर्ण ज्ञान जिजाऊंना होते. रामायण आणि महाभारतातील कथा जिजाऊ बाल शिवाजीला सांगत असत. महाभारतातील अनेक योद्ध्यांचे महात्म्य व त त्यांचे पराक्रम राजमाता जिजाऊ उत्तमरीत्या छत्रपती शिवाजींना समजावून सांगत.
राज्यकारभार आणि पुण्याची जहागीर सांभाळताना येणाऱ्या अडचणी, त्यावर केलेली मात हे गुण राजमाता जिजाऊंचा पुरस्कार करतात. काळाप्रमाणे नवनवीन संकल्प, राजकारण, डावपेच, सहकार या सर्व गोष्टी जिजाऊ पद्धतशीर हाताळत होत्या. या सर्व गुणांचे संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्यात देखील पाहायला मिळतात.
राज्य करीत असताना सामान्य लोक, दीन – दुबळे यांचा आधार फक्त राजाच असतो. जात-पात आणि धर्म हा वैयक्तिक प्रश्न असतो, त्याचा राजाच्या निर्णयात समावेश नसला पाहिजे.
सर्वधर्मसमभाव, रयतेची सेवा आणि त्यांचे प्रश्न सोडवणे हे राजाचे प्रथम कर्तव्य असते. वेगवेगळ्या पदांवर कार्यरत असणारे अधिकारी आणि सगेसोयरे हे लालसेने जर भांबावले तर खेळावे लागणारे राजकारण आणि कूटनीती हेदेखील राजासाठी किती महत्त्वाचे आहे असे बाळकडू राजमाता जिजाऊंनी राजे शिवाजी यांना लहानपणीच दिले.
👉जीवन कार्य:-
शिवाजी राजांचा राज्याभिषेक” हा विलक्षण सोहळा पाहून, महाराजांना ” छत्रपती ” बनल्याचे पाहून बारा दिवसांनी म्हणजे ज्येष्ठ कृ. ९ , शके १५९६, इ.स. १७ जून १६७४ या दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
स्वतंत्र स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड जिल्ह्यातील किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचड या गावी राजमाता जिजाऊंचे निधन झाले.
राजमाता जिजाऊ यांनी स्वराज्याचे दोन्ही छत्रपती घडवले. स्वतंत्र हिंदवी स्वराज्याचे स्वप्न ध्यानी मनी सतत तेवत ठेऊन ते प्रत्यक्ष साकार करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले.
Comments
Post a Comment