Posts

देऊर (सध्या साताराजिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात) गावचे असणारे रघूजीराजे भोसले कर्तुत्व आणि पराक्रमाच्या बळावर बंगाल राज्यात दहशत बसवली होती,नागपूरचे संस्थानिक राजे भोसले झाले.(१६९५ - १४ फेब्रुवारी १७५५)

Image
भोसले राजवंशाचे रघूजीराजे भोसले (१६९५ - १४ फेब्रुवारी १७५५) नागपूरकर भोंसले कुटुंब हे मूळचे हिंगनी ( बेर्डी जवळ )हिंगनी - बेर्डी .येथील मूळचे असे सदर्भ सुद्धा आहेत. परंतु कोरेगाव येथील देऊर गावची पाटील की या भोसले यांना होती , 1728 मध्ये रघुजी भोंसले यांना देण्यात आला होता. छत्रपती शाहू महाराज . रघुजी बिंबाजी पाटील (भोंसले) हिंगनी ऐतिहासिक नोंदी नोंदवल्या आहेत. देऊरला मुधाई देवी मंदिर व राजवाडा वगैरे त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा आहेत. हे मराठा साम्राज्याचे नावाजलेले सरदार होते. ते रघूजी भोसले प्रथम,  नागपूर संस्थानाचे संस्थापक राघोजी भोसले या नावांनीही इतिहासात ओळखले जातात.  त्यांनी छत्रपती शाहूंच्या कारकीर्दीत नेतृत्वगुण, कर्तुत्व आणि पराक्रमाच्या  जोरावर पूर्व-मध्य भारतात नागपूर साम्राज्यावर कब्जा केला.  १८५३ मध्ये इंग्रजांनी ताबा घेण्यापर्यंत त्यांच्या पुढील वारसांनी नागपुरात राज्य केले होते. 👉 देवूर च्या भोसले कुटुंबाची पार्श्वभूमी भोसले कुटुंब हे मूलतः देवर किंवा देवूर (सध्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात) गावचे प्रमुख होते.  रघुजींचे आजोबा आणि त्यांचे दोन बं

रांगणा किल्ल्याची/प्रसिद्धगडाची गडदुर्गा “रांगणाई देवी”🚩

Image
रांगणा किल्ल्याची/प्रसिद्धगडाची गडदुर्गा “रांगणाई देवी”...🙏🚩 किल्ले रांगणा उर्फ प्रसिध्दगड सहयाद्रीच्या धारेतून दक्षिणेस पसरलेल्या, पण घाटमाथ्यापासून अलग झालेल्या डोंगरावर तसेच देश, कोकण व गोवा यापासून जवळ मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे छत्रपतींच्या आवडत्या किल्ल्यामध्ये याचा समावेश होता म्हणूनच १७८१ च्या एका ऐतिहासिक कागदपत्रात, ‘येक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित नाहीतर सकल सावंत बारदेशावर उतरेल’ असा उल्लेख आलेला आहे गडाच्या रांगडेपणाच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हयात असलेल्या १३ किल्ल्यांमध्ये रांगण्याचा पहिला क्रमांक लागतो.... रांगणाई देवीचे मंदिर प्रशस्त आहे मंदिरात रांगणाई देवीची ढाल, तलवार, त्रिशूळ इत्यादी आयुधे घेतलेली मूर्ती आहे रांगणाईच्या उजव्या हाताला विष्णूची मुर्ती व डाव्या हाताला भैरवाची मूर्ती आहे या ठिकाणी एक फारसी शिलालेखाचा दगड आहे मंदिरासमोरच दीपमाळ आहे रांगणाई मंदिराच्या उजव्या बाजूला मारुतीचे मंदिर आहे जवळच कोरडी विहिर आहे.... “तू विश्वाची रचिली माया, तू शीतल छायेची काया तुझ्या दयेचा ओघ अखंडीत, दुरित लयाला नेई....” #जागर_स्त्रीशक्तीचा... ―――――――――――― _नवरात्रोत्सव_२०२

प्राचीन खंडोबा मंदिर आबवडे ता. खटाव जि. सातारा

Image

एका मंगल प्रसंगी कागल ज्युनिअर राजवाड्यात श्रीमंत अजितसिंहराजे यशवंतराव घाटगे ज्युनिअर (श्रीमंत राजर्षी शाहु महाराज यांचे पुतणे) व कागलकर ग्रामस्थ मंडळी

Image
एका मंगल प्रसंगी कागल ज्युनिअर राजवाड्यात श्रीमंत अजितसिंहराजे यशवंतराव घाटगे ज्युनिअर (श्रीमंत राजर्षी शाहु महाराज यांचे पुतणे) व कागलकर ग्रामस्थ मंडळी साभार 🙏 आदित्य सिंह निकम कोल्हापूर 

आई श्रीतुळजाभवानीमातेचा पलंग कोठून येतो पाहा ?*

Image
*आई श्रीतुळजाभवानीमातेचा पलंग कोठून येतो पाहा ?*  आई श्रीतुळजाभवानी महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांत तुळजाभवानीचे स्थान अतिशय वेगळे असून मंदिरातील वेगवेगळ्या प्रथा-परंपरा पाहिल्यास शेकडो वर्षांपासून चालत आलेले रीतीरिवाज आजही कायम आहेत. दळणवळणाची कुठलीही साधने उपलब्ध नसताना पूर्वीच्या काळी देवीच्या मानकऱ्यांनी किती कष्ट घेतले असतील याची कल्पना करू शकत नाही. पलंग, पालखी, बुधलीवाले, भुते, माया प्रताप, बोंबले यासारखी मंडळी नगर, पुणे, नाशिक, सोलापूर यांसारख्या दूरदूरच्या भागातून येऊन आपल्या सेवा आजही अखंडपणे बजावत असतात. विशेष म्हणजे सर्वांची जगन्माता आई तुळजाभवानी ज्या पालखीत बसून मिरवते व ज्या पलंगावर निद्रा घेते ते तयार करणारे हात एवढे छोटे आहेत की सर्वसामान्यांना काय पण मंदिर प्रशासनालाही त्यांच्या नावाची साधी कल्पनाही नाही. त्याचे कारण म्हणजे सेवा बजावण्याच्या मानपानातील असणारी गुंतागुंत.  तसे पाहिले तर देवाचा पलंग असो की पालखी या दोन्ही धार्मिकदृष्ट्या पवित्र असल्याने आपण कुठल्याही मंदिरात गेलो तर वापर झाल्यानंतर त्या वस्तू मंदिरातच कुठे तरी व्यवस्थितपणे सांभाळून ठेवून पुन्हा त्याचा

कामधेनु गाय भारतीय गोमाता

Image

बारव स्थापत्य

Image
बारव स्थापत्य :- भाग एक अगदी प्रारंभिक काळात लेण्यांच्या निर्मिती बरोबर "पाणीयपोढी" किंवा "पाणपाठी" म्हणजे पिण्याचे पाणी साठविण्याची टाकी आणि "न्हानकोढी" म्हणजे स्नानासाठी व अन्य उपयोगासाठी लागणाऱ्या पाण्याचा साठा करण्यासाठी विविध आकाराच्या टाक्या खांदण्यात आल्या. किल्ल्याची निर्मिती होत असताना सर्वप्रथम निश्चित जलस्रोताचा शोध घेऊन आवश्यक त्या ठिकाणी टाक्या व कूप तयार केल्याचं दिसतात. गोदावरी, कृष्णा, मांजरा, चंद्रभागा अशा नद्यांच्या परिसरात ज्याठिकाणी वसाहती निर्माण झाल्या तेथे प्रामुख्याने घाट बांधण्यात आले. निसर्गत उपलब्ध नदीच्या काठाचा योग्य उपयोग करून घेण्याच्या दृष्टीने अशा वैशिष्ट्यपूर्ण घाटांची निर्मिती सातवाहन काळापासून होत असावी, अन्य स्थानांवर नगर वसवताना मात्र भूगर्भातील जलाशयाचा शोध घेऊन विविध प्रकारचे आड, विहिरी, बारव व पोखरणी यांची निर्मिती करण्यात आली. दक्षिण भारतामध्ये रामेश्वर सारख्या जंबू द्विपावर जाणीवपूर्वक अनेक तीर्थ व पुष्करणी यांची निर्मिती झाली. महाराष्ट्रामध्ये लोणार  येथे उल्कापातातून निर्माण झालेल्या विवराच्या परिसरात अनेक बारवा