रांगणा किल्ल्याची/प्रसिद्धगडाची गडदुर्गा “रांगणाई देवी”🚩
रांगणा किल्ल्याची/प्रसिद्धगडाची गडदुर्गा “रांगणाई देवी”...🙏🚩
किल्ले रांगणा उर्फ प्रसिध्दगड सहयाद्रीच्या धारेतून दक्षिणेस पसरलेल्या, पण घाटमाथ्यापासून अलग झालेल्या डोंगरावर तसेच देश, कोकण व गोवा यापासून जवळ मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे छत्रपतींच्या आवडत्या किल्ल्यामध्ये याचा समावेश होता म्हणूनच १७८१ च्या एका ऐतिहासिक कागदपत्रात, ‘येक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित नाहीतर सकल सावंत बारदेशावर उतरेल’ असा उल्लेख आलेला आहे गडाच्या रांगडेपणाच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हयात असलेल्या १३ किल्ल्यांमध्ये रांगण्याचा पहिला क्रमांक लागतो....
रांगणाई देवीचे मंदिर प्रशस्त आहे मंदिरात रांगणाई देवीची ढाल, तलवार, त्रिशूळ इत्यादी आयुधे घेतलेली मूर्ती आहे रांगणाईच्या उजव्या हाताला विष्णूची मुर्ती व डाव्या हाताला भैरवाची मूर्ती आहे या ठिकाणी एक फारसी शिलालेखाचा दगड आहे मंदिरासमोरच दीपमाळ आहे रांगणाई मंदिराच्या उजव्या बाजूला मारुतीचे मंदिर आहे जवळच कोरडी विहिर आहे....
“तू विश्वाची रचिली माया, तू शीतल छायेची काया
तुझ्या दयेचा ओघ अखंडीत, दुरित लयाला नेई....”
#जागर_स्त्रीशक्तीचा...
――――――――――――
Comments
Post a Comment