देऊर (सध्या साताराजिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात) गावचे असणारे रघूजीराजे भोसले कर्तुत्व आणि पराक्रमाच्या बळावर बंगाल राज्यात दहशत बसवली होती,नागपूरचे संस्थानिक राजे भोसले झाले.(१६९५ - १४ फेब्रुवारी १७५५)


भोसले राजवंशाचे रघूजीराजे भोसले

(१६९५ - १४ फेब्रुवारी १७५५)

नागपूरकर भोंसले कुटुंब हे मूळचे हिंगनी ( बेर्डी जवळ )हिंगनी - बेर्डी .येथील मूळचे असे सदर्भ सुद्धा आहेत. परंतु कोरेगाव येथील देऊर गावची पाटील की या भोसले यांना होती , 1728 मध्ये रघुजी भोंसले यांना देण्यात आला होता. छत्रपती शाहू महाराज . रघुजी बिंबाजी पाटील (भोंसले) हिंगनी ऐतिहासिक नोंदी नोंदवल्या आहेत.
देऊरला मुधाई देवी मंदिर व राजवाडा वगैरे त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा आहेत.
हे मराठा साम्राज्याचे नावाजलेले सरदार होते. ते रघूजी भोसले प्रथम,  नागपूर संस्थानाचे संस्थापक राघोजी भोसले या नावांनीही इतिहासात ओळखले जातात.

 त्यांनी छत्रपती शाहूंच्या कारकीर्दीत नेतृत्वगुण, कर्तुत्व आणि पराक्रमाच्या  जोरावर पूर्व-मध्य भारतात नागपूर साम्राज्यावर कब्जा केला.

 १८५३ मध्ये इंग्रजांनी ताबा घेण्यापर्यंत त्यांच्या पुढील वारसांनी नागपुरात राज्य केले होते.

👉 देवूर च्या भोसले कुटुंबाची पार्श्वभूमी

भोसले कुटुंब हे मूलतः देवर किंवा देवूर (सध्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात) गावचे प्रमुख होते.

 रघुजींचे आजोबा आणि त्यांचे दोन बंधू शिवाजी महाराजांच्या सैन्यांत लढले होते आणि त्यांच्यातील सर्वात प्रतिष्ठित लोकांना सैन्यात उच्च लष्करी पदे आणि बेरारमधील चौथांचा संग्रह बहाल करण्यात आला होते.

रघुजी अत्यंत धाडसी आणि शीघ्र निर्णयी असे मराठा सरदार होते.

👉त्यांनी शेजारील राज्यातील राजकारणिक समस्यांचा फायदा उचलत आपले धोरण आखले आणि आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण केल्या.

👉बंगाल, ओरिसा,कटक,चांदा, छत्तीसगड, आणि संबलपूर आपल्या अखत्यारीत आणले.

त्यांच्या सैन्याने दोनदा बंगालवर आक्रमण केले आणि कटकवर सुद्धा आपला अंमल स्थापित केला. सन १७४५ ते १७५५ दरम्यान त्यांनी चांदा, छत्तीसगड, आणि संबलपूर आपल्या अखत्यारीत आणले.

कर्नाटकातील त्रिचनापोलीच्या लढाईतील यशस्वी मोहिमेनंतर मराठा साम्राज्याने बंगालमधील मोहीम हाती घेतली.

👉रघुजींना या मोहिमेचे नेते बनवण्यात आले. १७२७ मध्ये मुर्शीद कुली खानच्या मृत्यूनंतर त्या भागात अंदाधुंदीच्या परिस्थितीचा यशस्वीपणे वापर करून राघूंईंनी रघुजींनीओरिसा आणि बंगालच्या काही भागावर कायमचा कब्जा केला.

बंगालच्या नवाबाने मराठ्यांना सुवर्णरेखा नदीपर्यंतचा प्रदेश आणि बंगालची २० लाख रुपये (पश्चिम बंगाल आणि बांगलादेश दोन्हीसह) आणि बिहार (झारखंडसह) साठी १२ लाख कर मान्य केला. अशा प्रकारे बंगाल मराठा साम्राज्यात सामील झाले.


दोस्त अली खानने चंदासाहेबांना तिरसव्यपुरम राजाच्या विरोधात मोर्चा काढायला सांगितलं. तेव्हा तिरसव्यपुरमच्या राजाने मराठा साम्राज्याची मदत मागितली. लवकरच मुघल सेना आणि मराठा सरदार रघुजींच्या कमानीत मराठा सेना दमलेचररी येथे भिडल्या. हि मुघल आणि मराठा शैब्यातली एक मुख्य लढाई म्हणून प्रसिद्ध आहे. या लढाईत रघुजींनी दोस्त अली खानाचा पाडाव करून कर्नाटकेत तीन वर्षांपर्यंत कब्जा मिळवला


१४ फेब्रुवारी १७५५ रोजी रघुजींचे निधन झाले. निधनानंतर जानोजी नागपूरच्या गादीवर उत्तराधिकारी म्हणून आले.

२६ जानेवारी १७७४ रोजी रघुजींचे दोन पुत्र जानोजी आणि मुधोजी ह्यांच्यात सत्तेवरून पाचगांव येते लढाई झाली. या लढाईत मुधोजींनी जानोजींचा वध केला आणि आपला मुलगा रघुजी द्वितीय ह्याला गादीवर बसवले.

भाम, उमरावती, हिंगणी बेरडी, पांडववाडी, नागपूर इ. अनेक शाखा नागपूरकर भोसलेंच्या इतिहासात नमूद आहेत.

संदर्भ :-

 "Forgotten Indian history: The brutal Maratha invasions of Bengal".

 SNHM. Vol. II, pp. 209, 224.

 Fall Of The Mughal Empire- Volume 1 (4Th Edn.), J.N.Sarka

 "पांचगांव के मैदान में भोसले राजपरिवार के संस्थापक रघुजी भोंसले के पुत्रों की सेनाएं आपस में भीड़ी थी". २१ एप्रिल २०१८ रोजी पाहिले.

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

कुलाचारासाठी आवश्यक असलेल्या या माहितीला राजे घाटगे उर्फ घाडगे राजवंशातील सर्व वंशजांनी जतन करून ठेवावी...