आखाडेच्या गावडाची कुडाळच्या शिंदे देशमुखांकडून पाठराखण - प्रस्तुत पत्र हे सन १७२७ ते १७९९ दरम्यानचे आहे. यातील मुख्य विषय असा कि "जाणू धनगर गावडा यांनी त्यांच्या विधवा मुलीचा पुनर्विवाह केला त्यासाठी तत्कालीन परवानगी हि मोकासदाराकडून घेण्यात आली होती.
- आखाडेच्या गावडाची कुडाळच्या शिंदे देशमुखांकडून पाठराखण - प्रस्तुत पत्र हे सन १७२७ ते १७९९ दरम्यानचे आहे. यातील मुख्य विषय असा कि "जाणू धनगर गावडा यांनी त्यांच्या विधवा मुलीचा पुनर्विवाह केला त्यासाठी तत्कालीन परवानगी हि मोकासदाराकडून घेण्यात आली होती. परंतु सरकारकडून नव्याने रुजू झालेल्या अधिकाऱ्याने त्याची परवानगी न घेता हा पुनर्विवाह करवला म्हणून संबंधित मोकदमवर दोन रुपये, जोशी भटावर दोन रुपये व जाणू गावडाच्या बायकोच्या डोईवर दगड देवून वर त्याला चार रु दंड ठोठावला. इथून मागे अशी चिट्टी आणली नाही त्यामुळं कुडाळच्या गोविंदराव शिंदे देशमुखांनी यात हस्तक्षेप करून धनगरांकडून वसूल केलेला दंड परतवण्यात यावा आशा आशयाच हे पत्र आहे. दंड परत न केल्यास धनगर गाव सोडुन परागंदा होतील असेही म्हटले आहे." या पत्रातून तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा उलगडा होतो. एकतर इतक्या दुर्गम भागातील (सध्याचा जावळी तालुका) धनगर समाजात विधवा पुनर्विवाहाला परवानगी होती. हे पत्र इतकं महत्वाचे आहे की तत्कालीन समाजातील प्रत्येक घटकाचा स्तर सहज समजतो. काल भोर संस्थानच्या शेअर केलेल्या पोस्ट वर देशमुखी बाबत