आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳

⛳ *⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ जुलै १६५९*
स्वराज्यावर चालून आलेला "अफझलखान" हा मलवडीहून "वाई" येथे दाखल झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ जुलै १६६०*
छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडच्या वेढ्यातून निसटले
छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडाहून निघाले. रात्री दहाचा सुमार होता. आषाढी पौर्णिमेची ही रात्र होती. (दि.१२ जुलै १६६०) पण चंद्र काळ्याकुट्ट ढगांच्या आड लोपला होता. महाराज पालखीत बसलेले होते. पालखी मावळ्यांनी उचलली. महाराजांसोबत होते "हिरडस मावळ" मधील "बांदल सेना". त्या बांदल सेनेचे नेतृत्व करत होते "बाजी बांदल" आणि "रायाजी बांदल" सोबत बाजीप्रभू, शंभुसिंह जाधवराव होते. ६०० मावळेही निघाले. आणी एक रिकामी पालखीही निघाली. पाऊस, वादळ, विजा अखंड चालू होत्या. पालखी जरा आडवाटेने गडाखाली उतरत होती. हेर रस्ता दाखवायला पुढे चालले होते. सिद्दी जौहरची छावणी पूर्णपणे गाफील बनलेली होती. शिवाजी उद्यांच शरण येणार आहे ! मग कशाला या वादळी पावसापाण्यात मोर्चावर उभे राहा ? करा उबदार आराम ! अगदी असाच गाफील विचार करून शाही मोर्चेवाले ढिले बनले होते. झाडाझुडपातूंन अन् खोगळ्यांतून महाराजांची पालखी धावत होती.पाऊस पडत होता. आभाळ गडगडत होते. छाताडे धडधडत होती. विजा लखाकत होत्या. पालखी धावत होती. नजरा धास्तीने भिरभिरत होत्या. छावणीच्या सांदिसपाटीतून ती पालखी बेमालूमपणे वेढा भेदून गेली.वेढापासून पालखी पुष्कळच दूर गेली. एवढ्यात घात झाला ! जौहरच्या हेरांनी पालखी ओळखली. आता ? त्या रिकाम्या पालखीत आता एक महाराजांसारखा दिसणारा एक जवान बसला. ती पालखी घेऊन १५ - २० लोक मुख्य रस्त्याने धाऊ लागले. आणि महाराजांची पालखी बाजी प्रभुंनी एकदम आडमार्गाने विशाळगडाकडे न्यायला सुरूवात केली.शत्रुचा पाठलाग अटळ होता. अन् खरोखरच जौहरची फौज सिद्दी मसाउदच्या बरोबर पाठलागावर निघाली. एकदम त्यांनी पालखीला गराडले. त्यांनी मावळ्यांना विचारले की, आत कोण आहे ? उत्तर मिळाले की पालखीत शिवाजी राजे आहेत. पालखी सकट महाराज कैद झाले अन् सिद्दीच्या छावणीत दाखल झाले. सिद्दीसमोर मान खाली घालून उभे राहिले. पण जाणकारांनी ओळखले ! काही गडबड आहे. चौकशी झाली. अन् कळले - की हा तर शिवा न्हावी आहे. ताबडतोब स्वराज्याच्या त्या शिलेदारांची गर्दन उडाली.पुन्हा सिद्दी मसाऊद पाठलागावर निघाला. नुसताच मनस्ताप - पश्चात्ताप - चिडचिड आणि वडवड. घोड्याला टाच मारून आवघे एल्गारत निघाले...वाटेतील गुढगा - गुढगा चिख्खल तुडवीत.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ जुलै १६६०*
वीर शिवा काशिद स्मृतिदिन
शिवा काशिद यांचे स्वराज्यासाठी बलिदान.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ जुलै १६७४*
छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांशी मित्रत्त्वाचा तह केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ जुलै १६७७*
"दक्षिण दिग्विजय मोहीम"
छत्रपती शिवराय तिरूमलवाडीत मुक्कामी.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ जुलै १६७८*
पोर्तुगीजानी चौथचा कर भरण्याच्या बाबतीत टंगळमंगळ चालविली असली तरी पोर्तुगीजांविरूद्ध महाराजानी शस्त्रबलाचा उपयोग केला नाही. त्यावेळी कल्याण भिवंडी भागात त्यांचे आठदहा हजार सैन्य होते. त्यांची इच्छा असल्यास त्याना पोर्तुगीजाच्या अमलाखालचा मुलुख घेता आला असता पण त्यानी तसे केले नाही की, पोर्तुगीजाकडे चौथचा कर मागण्याचेही सोडले नाही. पोर्तुगीजानी त्याना शेवटपर्यंत उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचा एक नमुना पुढील प्रमाणे आहे. गोव्याचा गव्हर्नर आंतोनियु पाईश द सांद हा शिवाजी महाराजांचे पोर्तुगीजाकडील वकील पितांबर शेणवी याना दि. १२ जुलै १६७८ रोजी
लिहितो: 'गोव्याचे राज्य हे कुणाचे मांडलिक नाही. त्यामुळे शिवाजी राजे यांनाना चौथचा कर आम्ही भरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र एक गोष्ट खरी की, दमणमधील आणि उत्तरेकडील काही खेड्यांचे चोर दरोडेखोरापासून रक्षण व्हावे म्हणून चौतिया राजाशी एक करार करण्यात आला होता. परंतु त्या कराराचा गोव्याच्या राज्याशी काही संबंध नाही. तरी देखील पितांबर शेणवी यानी शिवाजी राजे यांना ना विदित करावे की त्यानी चौथबाबत दमणच्या कॅप्टनशी वाटाघाटी कराव्या. तो जर त्याना चौथचा कर देण्यास तयार असेल तर आमची त्याला हरकत नाही.'

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ जुलै १६८०*
मुंबईकर इंग्रजांच्या पत्रातील नोंद
छत्रपती संभाजी महाराजांनी गादीवर आल्यावर छत्रपती राजाराम महाराजांना अतिशय दयाळूपणे (with all kindness) वागवल्याचा उल्लेख ही १२ जुलै १६८० च्या मुंबईकर इंग्रजांच्या नोंदीत मिळतो त्याच बरोबर छत्रपती संभाजी महाराजांनी येसाजी दाभाडे ह्यांस छत्रपती राजाराम महाराजांच्या ताईनातीत नेमले. ह्याची नोंद ही  दभाडेंच्या हकीकतीत  मिळते. 
छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सिंहासन रीक्त न ठेवता महाराणी येसूबाईंनी राजाराम महाराजांना १२ फेब्रुवारी १६८९ रोजी सिंहासनावर बसवले. परंतु छत्रपती राजाराम महाराज सिंहासनावर छत्रपती संभाजी महाराजांच्या बालपुत्राचा अधिकार मानत असल्याने व तो अज्ञान असल्याने त्यांनी केवळ स्वतःचे मंचकारोहन करून घेतले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ जुलै १७३७*
"वसईचा पाठीराखा...  जंजिरे धारावी" 
धारावी मराठ्यांनी घेतली हे कळताच पोर्तुगीजांनी मे १७३७ रोजी आठशे सैन्यासह जोरदार हल्ला केला. वसई हे समोरच असल्याने पोर्तुगीजांना रसद पुरवठ्यास कोणताच अडथळा आला नाही. मराठ्यांनी जोरदार प्रतीकार केला परंतु अखेर मराठ्यांना माघार घ्यावी लागली. या समरात अणजूरकर नाईकांनी मोठा पराक्रम केला. मात्र अणजूरकरांकडील लोक मोठ्यासंख्येने धारातिर्थी पडले. मराठ्यांनी माघार घेतली परंतु ते जवळपासच्याच भागात दडून राहीले. मराठ्यांचा खाडीतील हा धोकादायक वावर रोखण्यासाठी कडदीनने मुर्ध्याला एक ठाणे बांधवून त्यावर तोफा तैनात करण्याचा हुकूम केला. हे काम कार्व्हालो नामक अधिकार्‍याने दिनांक १२ जुलै सन १७३७ रोजी पूर्ण केले. या कामानंतर कार्व्हालो मोठ्या आत्मविश्वासाने खाडी ओलांडून मराठ्यांच्या प्रांतात तोफा, सैन्य आणि मोठी रसद घेऊन घुसला. मराठ्यांनी त्यास बरेच आतपर्यंत येऊ दिले. सावज टप्यात आल्याबरोबर मराठ्यांनी अचानकपणे हल्ला केला. पोर्तुगीजांचा पार  धुव्वा उडवला. जमीन व आकाश दोन्ही बाजूंनी मराठ्यांनी पोर्तुगीजांना घेरले. कार्व्होलो आला मराठी मुलुख घ्यायला पण पदरची धारावीही गमावून बसला.
"फिरंगी याने मुरगाव येथे माडीस वेढा घालून खाडीचे तोंड धरून धारावीचे बेट घ्यावे हा विचार करून फौज मुर्ध्यास उतरली. शत्रू दारूगोळा तोफसुध्दा आला; तेव्हा खंडोजी माणकर, रामजी महादेव व मुरारजी नाईक वगैरे यांनी फिरंग्यांचा मोड केला. तोफा आठ पाडाव केल्या. फिरंगी यांचे मनुष्य पाचशे मारले व काही बुडवले. तेव्हा धारावीही हाती लागले."

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ जुलै १७७७*
एक दुर्लक्षित पेशवीण... गंगाबाईचा मृत्यू
गंगाबाई म्हणजे नारायण राव पेशव्यांची पत्नी , आजही त्यांच्या  बद्दल फारच कमी माहीती मिळते ....
कृष्णजी हरी साठ्यांची ही कन्या २२ एप्रिल १७६३ पेशव्याची सुन होऊन शनिवार वाड्यात आली ..नारायण राव आणि गंगाबाई चे लग्न सिंहगडावर झाले ..अवघा १०  वर्षाचा संसार  .. आणि मग ३० ऑगस्ट १७७३ ला नारायण रावांची हत्या झाली... मृत्युच्या वेळेस नारायण राव १८ वर्षाचे म्हणजे गंगा बाई १५-१६  वर्षाच्या असाव्यात... पती निधनाच्या दुःखा ने त्यांनी प्रचंड आक्रोश केला , आपल्या थोरल्या जाऊ बाई रमा बाई प्रमाणे त्यांना सती जायचे होते ... पण पोटात पेशवे घराण्याचा वंश वाढत होता त्या मुळे त्यांना सती जाण्या पासुन रोखले गेले ...

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ जुलै १७७८*
मराठा आरमाराचे वैशिष्ट्य
(फ्रेंच परराष्ट्रीय वकील पल्लेबो द सेंट लुबीन याचा कार्यकाळ
१९ सप्टेंबर सन १७७६ ते १२ जुलै सन १७७८)
मराठ्यांच्या जहाजबांधणी कारागीरांच्या कौशल्याबद्दल पल्लेबो द सेंट लुबीन हा कट्टर फ्रेंच राष्ट्रभावनेने भारलेला फ्रेंच परराष्ट्रीय वकील काय नमूद करतो ते पहा -

"मराठ्यांचे जहाजबांधणी कारागीर हे अतिशय कुशल आहेत. फ्रेंच कारागीरांपेक्षाही त्यांची हातोटी उत्तम आहे. ते हळुवारपणे काम करतात; पण कारागीरी इतकी उत्तम आहे की, जहाजास ३० - ४० वर्षेतरी नुकसान पोहचत नाही."

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ जुलै १७९९*
रणजितसिंग यांनी लाहोर ताब्यात घेतले व ते पंजाबचे सम्राट झाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*१२ जुलै १८६३*
स्मरण इतिहासाचार्यांचे
इतिहासाचार्य वि. का. तथा विश्वनाथ काशिनाथ राजवाडे ह्यांचा आज जन्मदिवस
(मृत्यू - ३१ डिसेंबर १९२६)
राजवाड्यांचा जन्म जुलै १२, १८६३ रोजी महाराष्ट्रात पुण्यात झाला. बी.ए. पर्यंतचे शिक्षण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये काही दिवस शिक्षक म्हणून काम केले. इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट ग्रंथांचे भाषांतर करून ते प्रकाशात आणण्यासाठी त्यांनी 'भाषांतर' नावाचे मासिक सुरू केले हाते.राजवाडे म्हणायचे - ''ज्ञानार्जनाची हौस असेल तर माझी मराठी भाषा पाश्चिमात्य लोक शिकतील; माझ्या ग्रंथांची पूजा करतील. मी परकीय भाषेत माझा ग्रंथ लिहिणार नाही. मी कीर्तीला हपापलेला नाही.''
१८९८ साली त्यांनी लिहिलेल्या 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' या ग्रंथाचा पहिला खंड प्रकाशित झाला. ह्या ग्रंथाचे २२ खंड हे मराठा साम्राज्याच्या इतिहासाच्या अभ्यासासाठीचे महत्त्वाचे साधन मानले जाते. जुलै ७, १९१० रोजी भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना त्यांच्या पुढाकाराने झाली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड*
*सह्याद्री प्रतिष्ठान,महाराष्ट्र.*

*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩

Comments

Popular posts from this blog

घाटगे उर्फ घाडगे घराणे ईतीहास

पाच छत्रपती चा सहवास लाभलेले सर सेनापती धनाजी जाधवराव वंशावळ व ईतिहास

श्री सिद्धनाथ जोगेश्वरी यात्रा निमसोड २०२४ १४/११/२४