शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇*११ जुलै १६५९*
⛳ *आजचे शिव'कालीन ऐतिहासीक दिनविशेष* ⛳
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*११ जुलै १६५९*
शंभूराजांच्या जन्मानंतर सईबाई महाराणीसाहेब अंथरुणाला खिळल्या. देव पाण्यात ठेवणे, देवाला कौल लावणे, देशोदेशीचे वैद्य सारे करून झाले परंतू कशाचाच निभाव लागत नव्हता सईबाइंची प्रकृती खालावतच होती, तिकडे स्वराज्य गिळंकृत करायला आलेल्या अफजलखानाने सर्वत्र धुमाकूळ घातला होता. अशा परिस्थितीतच हवा पाळत म्हणून दि. ११ जुलै १६५९ रोजी राजे जिजाऊ आणि सईबाई यांसमवेत प्रतापगडी आले.
अफझलखानाशी लढण्यासाठी "छत्रपती शिवराय" राजगडहून प्रतापगडावर आले. कारण स्वराज्याच्या भूमीवर न लढता, स्वराज्याच्या सीमेवर लढून स्वराज्याची हानी वाचवायची होती महाराजांना.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*११ जुलै १६६७*
मिर्झाराजेंवर विषप्रयोग करुन हत्या
दिलेर आणि मिर्झाराजे हे दोघेही औरंगजेबाकरीता आणि मोगली तख्ताकरीता जिवाचं रान करीत होते. या दोघांच्याही आयुष्याची अखेर कशी झाली ? हताश आणि दु:खमय. याच मिर्झाराजाला औरंगजेबाने उदयराज मुन्शी या, मिर्झाराजाच्याच नोकराकडून विष घालून पुढे (दि. ११ जुलै १६६७) बुऱ्हाणपूर येथे मारले. आणि दिलेरचं काय झालं ? आयुष्यभर त्याने औरंगजेबाची जीव उगाळून सेवा केली. पुढे संभाजीराजांच्या विरुद्ध मांडलेल्या युद्धात दिलेर असाच लढत होता. मराठे हरत नव्हते. मोगलांना यश मिळत नव्हते. चिडलेल्या औरंगजेबाने दिलेरलाच दोष दिला. ‘तुमच्याच अंगचोरपणामुळे आपण हार खातो आहोत‘ असा आरोप औरंगजेबाने घेतला. (इ. १६८५ ) त्यावेळी दिलेरनं मान खाली घातली. त्याला काय यातना झाल्या असतील त्या त्यालाच ठाऊक. आयुष्यभर ज्याची सेवा केली , तो आपल्याला अंगचोर म्हणतोय.
दिलेरने आपल्या तंबूत एकांती विष पिऊन आत्महत्या केली. हे पाहिल्यावर आठवावेत शिवाजीराजे. त्यांचे कैसे बोलणे होते ? कैसे चालणे होते ? त्यांची सलगी देणे कैसे असे ? तानाजी , कान्होजी जेधे , जिवा महाला , बाजी प्रभू , दौलतखान , बाळ प्रभू चिटणीस , येसबा दाभाडे , धाराऊ गाडे , हिरोजी फर्जद अन् असेच कितीतरी हिरे आणि हिरकण्या महाराजांच्या हृदयातच जाऊन बसलेल्या दिसतात.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
*संदर्भ :- सह्याद्रीचे अग्नीकुंड*
*सह्याद्री प्रतिष्ठान,महाराष्ट्र.*
*"जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय सह्याद्री"* 🚩
Comments
Post a Comment